प्रति,
मा. प्रकाश आबिटकर
मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग
महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
विषय : आरोग्य विभागातील गट 'क' व गट 'ड' पदभरती तातडीने सुरू करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्रातील हजारो पात्र बेरोजगार युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना सार्वजनिक आरोग्य विभागातील गट 'क' व गट 'ड' मधील तांत्रिक व अतांत्रिक पदांची भरती अनेक महिन्यांपासून रखडलेली आहे. आरोग्य विभागाने काही महिन्यांपूर्वी “४५ दिवसांत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करू” असे आश्वासन दिले होते. मात्र, या मुदतीच्या तिपटीपेक्षा अधिक कालावधी उलटूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, राज्यातील अनेक ठिकाणी आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती व पायाभूत सुविधा तयार असूनही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ती केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याची परिस्थिती आहे. याचा थेट परिणाम ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवेवर होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने पुढील मागण्या करण्यात येत आहेत 1. गट 'क' व गट 'ड' मधील सर्व रिक्त पदांची अद्ययावत पदसंख्या जाहीर करून तात्काळ भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी.
2. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक व निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे वेळापत्रक जाहीर करावे.
3. तयार असलेल्या आरोग्य उपकेंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळाची तातडीने नियुक्ती करून ती पूर्ण क्षमतेने सुरू करावीत.
4. आरोग्य विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवावी.
5. ४५ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या पूर्वीच्या आश्वासनाची पूर्तता का झाली नाही, याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी.
या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही व स्पष्ट वेळापत्रक जाहीर केले नाही, तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने संबंधित कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येईल. बेरोजगार युवकांना रोजगार आणि महाराष्ट्रातील जनतेला सक्षम सार्वजनिक आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. शासनाने या प्रश्नाकडे तातडीने गांभीर्याने पाहून निर्णय घ्यावा, ही विनंती.
आपला,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस तथा अध्यक्ष
रोजगार व स्वयंरोजगार विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (MPCC)
@abitkar_prakash @INCMaharashtra@INCRojgar
#health #dhananjayshinde #recruitment
@abitkar_prakash @abitkar_prakash अपुरे मनुष्यबळ असतांना, कशी होणार आरोग्य व्यवस्था सक्षम? कसा हाईल निरोगी महाराष्ट्र? प्रलंबित जाहिरात प्रसिद्ध करूनच सक्षम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.@CMOMaharashtra@mieknathshinde@SMungantiwar
आरोग्य विभागातील भरतीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करा!
अधिवेशनात आरोग्य विभागातील भरतीची जाहिरात काढण्याची घोषणा करूनही अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. महिनोन्महिने परीक्षा देण्यासाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना केवळ तारीख पे तारीख आणि वेळकाढूपणा सहन करावा लागत आहे. सरकारने आता वेळकाढूपणा थांबवून तातडीने भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करावी आणि निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, ही आरोग्य विभाग भरतीची तयारी करणाऱ्या समस्त विद्यार्थ्यांची मागणी आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका. घोषणा नको, प्रत्यक्ष भरती सुरू करा!
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal@CMOMaharashtra
#आरोग्यभरती #MaharashtraJobs #StudentsJustice #रोजगार
मा. @mpsc_office@bhimanwar
यांना विनंती आहे की, 2026 पासून नवीन परीक्षा योजना जाहीर होईल, त्यात प्रतीक्षा यादी, एक उमेदवार एक पोस्ट , इत्यादी बाबींचा समावेश केला पाहिजे.
@AbhiPawarBJP@RRPSpeaks
https://t.co/h5SajqyvNq
@VRadhaIAS@acmemahesh I apologize for messaging you on Twitter, but all of us students felt this was the right way to reach out to you directly about our problems.
@VRadhaIAS@acmemahesh Although the library certificate course is only 6 months long, this course is eligible for the post of librarian/assistant librarian.
@VRadhaIAS@acmemahesh We have been preparing for the librarian/assistant librarian for a long time because we were previously eligible for the librarian position, but now we are very disappointed to be ineligible.
@VRadhaIAS@acmemahesh Dear mam as per new RR in MPSC. We diploma holders were previously eligible for the post of librarian/Assistant librarian but now we have been disqualified... please make us diploma holders eligible for the post of librarian/Assistant librarian.
@VRadhaIAS नवीन RR नुसार MPSC च्या LIBRARIAN पदासाठी पात्र होतो म्हणून मी खूप दिवसापासून Librarian या पदासाठी तयारी करत आहे, तरी मेहेरबान मॅडम नी आम्हा अपात्र झालेल्या Diploma विद्यार्थ्यांना librarian या पदासाठी पात्र करावे व आमच्या कष्टाचे फळ आम्हाला मिळावे ही आपणास नम्र विनंती
नगर परिषद सेवा प्रवेश नियम मध्ये आरोग्य सहायक या पदासाठी 2 वर्षे अनुभवाची जाचक अटी मुळे अनेक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहणार आहे. अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
कृपया सदरील अट रद्द करण्यात यावा
@mieknathshinde@RRPSpeaks@Dev_Fadnavis@Dhananjay4INC@AbhiPawarBJP
राज्यातील रखडलेली नोकरभरती करण्याचे सरकारला आवाहन
महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेदरम्यान राज्यातील रोजगार आणि नोकरभरतीवर प्रश्न उपस्थित करताना विविध विषयांवर बोट ठेवले.
राज्यसरकारकडून दाओसमध्ये परकिय गुंतवणुक झाल्याची विविध आकडेवारी जाहीर केली होती. राज्यात होणारी गुंतवणुकीतून 15 लाख रोजगार निर्माण होण्याचा महायुतीच्या दाव्यातून किमान 1 लाख नोकऱ्या जरी निर्माण झाल्या तरी समाधानकारक असल्याची वस्तूस्थिती अधोरेखित केली.
तसेच एमपीएससीद्वारे भरली जाणारी पदे आणि राज्यातील किमान अडीच लाख जागांवरील नोकरभरतीचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात आला नाही. तो आला असता तर एमपीएससी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आश्वासक वाटल असतं असाही मुद्दा मांडला.
@MPLodha भ्रष्ट योजना आहे फक्त भ्रष्टाचार करून निवड केलेल्या व्यक्ती अधिकारी होणार आणि गरीबाची मेहनत करुन परीक्षा देणारी मुलं भिकारी होणार !!!! जाहीर निषेध !
@MPLodha साहेब तुमची योजना चांगली आहे परंतु 6 महिन्यानंतर कायमस्वरूपी करण्याचा निर्धार हा स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या गोर गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, त्यात प्रशिक्षण घेणारे गरीब नसून सर्व राजकीय नेते यांच्या जवळील कार्यकर्त्यांचे मुले आहेत मग सामान्य विद्यार्थ्यांनी जायचे कुठे
अमरावती जिल्ह्यातील MPSC क्लर्क भरती प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी माझी भेट घेऊन या भरती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबद्दल त्यांच्या व्यथा मांडल्या.
MPSC क्लर्क या पदासाठी जानेवारी 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती,पूर्व परीक्षा एप्रिल 2023 मध्ये पार पडली तर मुख्य परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये झाली.
या परीक्षेसाठी कौशल्य चाचणी जुलै 2024 मध्ये पूर्ण झाली आहे परंतु कौशल्य चाचणी दरम्यान किबोर्ड खराब आल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे व याच कारणामुळे काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयात (MAT) दाद मागितली आहे परंतु MAT ने भरती प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही.
सदर भरती प्रक्रियेसाठी आतापर्यंत 20 महिन्यांचा कालावधी लोटला आहे तरीही अद्याप ही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही यामुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे.कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय न होऊ देता लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.
अनेक अडचणींचा सामना करत गोरगरिबांची मुलं आपल्याला नोकरी मिळेल या आशेने परीक्षा देत असतात परंतु भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एवढा मोठा कालावधी लागणं ही खेदजनक बाब आहे.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde तसेच मा. उपमुख्यमंत्री
@dev_fadnavis व @AjitPawarSpeaks यांना विनंती आहे की आपण या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे.