लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख करणारे MPSC चे महाभ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी मोठमोठे मोर्चे झाले, पण अद्यापही भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा झालेला नाही. पुण्यातल्या ७ सप्टेंबर रोजीच्या विद्यार्थ्यांच्या भव्य आक्रोश मोर्चात अध्यक्षांचा राजीनामा न झाल्यास पुन्हा आंदोलनाची घोषणा विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार गणेशोत्सव झाल्यानंतर २६ सप्टेंबरपासून पुण्यात विद्यार्थ्यांसमवेत मी स्वत: आंदोलनाला बसणार असून याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे कळवण्यात आलंय.
भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन स्वच्छ प्रतिमा असलेले अध्यक्ष नेमावेत ही विद्यार्थ्यांची प्रामाणिक भावना आहे. भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा, दिलेल्या शब्दाप्रमाणे २०२६ मध्ये ७० हजारांची मेगाभरती तत्काळ सुरू करावी आणि राजस्थानप्रमाणे १०० रु. च्या कार्डवर वर्षभर परीक्षा या तीन प्रमुख मागण्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी सहकार्य करावं. नोटिसा द्यायच्याच असतील तर कोणत्याही विद्यार्थ्यांला त्रास न देता मला नोटिसा द्या!
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय हा होणारच असल्याने सर्वांनी विद्यार्थ्यांच्या एकजुटीला सहकार्य आणि ताकद द्यावी.
मा. मुख्यमंत्री महोदय
@Dev_Fadnavis
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा झाला. विशेष म्हणजे या मोर्चात कोणताही राजकीय नेता सहभागी नव्हता, तरीही विद्यार्थ्यांची अफाट गर्दी होती.
पुण्यातील मोर्च्यानंतर हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप भाजपा आणि त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, संभाजीनगरच्या मोर्चाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे कि हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा आहे.
विद्यार्थी राज्यभर स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या मनात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विश्वासघात झाल्याची भावना आहे आणि त्यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारने आरोप-प्रत्यारोपात वेळ न घालवता विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि त्यांच्याशी थेट संवाद साधावा.
कारण आज ही फक्त एक ठिणगी आहे…
या ठिणगीचा वणवा व्हायला फार वेळ लागणार नाही.
@RahulGandhi@NANA_PATOLE@INCHarshsapkal@supriya_sule@vishwajeetkadam@mpsc_office@satejp
मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग @mpsc_office ,
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 होऊन 3 - 4 महिने उलटले, तरीही निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. ही आयोगाची पहिली वर्णनात्मक (Descriptive) मुख्य परीक्षा असली, तरी केवळ 139 पदांसाठी उत्तरपत्रिका तपासण्यास इतका विलंब का होत आहे, याचे उत्तर लाखो स्पर्धा परीक्षार्थी मागत आहेत.
आयोगाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार जुलै 2026 मध्ये निकाल अपेक्षित होता. आज 28 जुलै संपत आला, तरी निकालाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. आयोग स्वतः जाहीर केलेले वेळापत्रक पाळणार आहे का? या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे नियोजन विस्कळीत होत आहे, पुढील भरती परीक्षांची तयारी प्रभावित होत आहे आणि मानसिक ताण प्रचंड वाढत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन ही आयोगाची मूलभूत जबाबदारी आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चा निकाल जाहीर करावा किंवा विलंबाची अधिकृत कारणे व निश्चित निकालाची तारीख जाहीर करावी. लाखो विद्यार्थ्यांना अनिश्चिततेत ठेवणे योग्य नाही.
@INCHarshsapkal@bhimanwar@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#MPSC #Rajyaseva2025 #MPSCStudents #Maharashtra
अन्न व औषध प्रशासन विभागातील 'औषध निरीक्षक (गट-ब)' भरती परीक्षेतील पेपरफुटीबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून संबंधितांविरोधात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सांगितले आहे.
#महाराष्ट्रलोकसेवाआयोग
#औषधनिरीक्षकपरीक्षा
#MPSC
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला घाबरून पुण्यात जमावबंदी लागू करणारे सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना काय उत्तर देणार? भरतीच्या जाहिराती काढता येत नाहीत, पेपरफुटी रोखता येत नाही; पण विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी कलम १४४ लागू करता येते!
ही जमावबंदी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आहे की सरकारच्या भीतीपोटी?
मा. देवेंद्रजी @Dev_Fadnavis
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याऐवजी, आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा. ३१ जुलैपर्यंत ५० ते ६० हजार पदांच्या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करा आणि राज्यातील लाखो परीक्षार्थींना न्याय द्या.
प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर जमावबंदी लावून प्रश्न सुटत नाहीत; रोजगाराच्या जाहिराती काढूनच प्रश्न सुटतात! सरकारने विद्यार्थ्यांना घाबरू नये - विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता करावी.
जब जब सरकार डरती है, पोलीस को आगे करती है !!!
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@INCMaharashtra
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
@MahaDGIPR महाराष्ट्र राजपत्रित व राजपत्रित गट अ गट ब गट क "पूर्व व मुख्य" परीक्षा #ऑफलाईन्स (OMR )वरच घेण्यात यावी ऑनलाइन Online (CBT)व Normalization रद्द करा कृपया विद्यार्थी हित लक्षात घ्यावी
'महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (#MPSC) परीक्षा ऑनलाइन नको, ऑफलाईन हवी' या मुख्य मागणीसाठी लातुरमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे.
एमपीएससी ऑनलाइन परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांवर बळजबरीने लादली जात आहे. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. लातुरसह राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता सरकारने ऑफलाइन परीक्षेबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी माझी मागणी आहे.
.
.
#OfflineExam #Latur #maharashtra
.
.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@mieknathshinde@LaturDm@INCMaharashtra
एमपीएससीच्या परीक्षा संगणकाधारित (ऑनलाईन) पद्धतीने घेण्याच्या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या मते, परीक्षा पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही त्यांची रास्त अपेक्षा आहे.
या मागणीला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई येथील एमपीएससी मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, या आंदोलनाला विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांनी सक्रिय पाठिंबा द्यावा, असे मी सर्वांना आवाहन करतो.
#mpsc #mpscexam #offline
ज्या तरुणांच्या बळावर सत्तेची गणिते मांडली जातात, तोच उद्याचा भविष्य असलेला एमपीएससी चा विद्यार्थी आज भर पावसात आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर आंदोलनाला बसला आहे. हे चित्र केवळ दुर्दैवी नाही, तर या सरकारच्या संपूर्ण नाकर्तेपणाचा आणि असंवेदनशीलतेचा जाहीर पुरावा आहे.
निवडणुकीपूर्वी सत्तेच्या मोहासाठी मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि आता अंमलबजावणीची वेळ आली की पळ काढायचा, हाच या सरकारचा एककलमी कार्यक्रम बनला आहे. मंत्र्यांच्या पोकळ दाव्यांना कंटाळून आज राज्यातील तरुण वर्ग रस्त्यावर उतरण्यास विवश झाला आहे.
एमपीएससीने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षाच्या मनमानी परिपत्रकाचा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नॉर्मलायझेशन प्रक्रियेचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. हा केवळ विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा विषय नाही, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी चाललेला खेळ आहे.
आमच्या या स्वाभिमानी तरुणांवर होणारा हा अन्याय आम्ही कदापि खपवून घेणार नाही, हा आमचा सरकारला स्पष्ट इशारा आहे. आम्ही पूर्ण ताकदीने सर्व आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत!
@mpsc_office
#mpscstudentsprotest #mpsc #MaharashtraGovernmentFailures #CancelNormalization
Sunday Wisdom!नागरी सेवेसाठी वैकल्पिक विषय वगळण्याचा #MPSC चा निर्णय समपातळीवर निकोप स्पर्धेसाठी स्तुत्य. परीक्षेचे पावित्र्य ती ऑनलाइन की ऑफलाइन यावर नव्हे तर आयोजक यंत्रणांची अंगभूत सचोटी,सज्जता व सुरक्षा प्रणालीवर ते निर्भर. ऑनलाइन पूर्व परीक्षेवर काहींचा आक्षेप पूर्वग्रहातून!
Sunday Wisdom!मुख्यपरीक्षा एक मात्र पात्रता निश्चितीस्तव ऑनलाईन पूर्व परीक्षा दोन/तीन?गुणवर्धनास्तव अतिरिक्त पूर्व परीक्षांंमधे कालापव्यय,जास्तीच्या परिक्षेमुळे गुुण समानीकरणात वाढीव क्लिष्टता,यामुळे उमेेदवारांंत वाढणारी अस्वस्थता टाळण्यासाठी एकच #MPSC पूर्वपरीक्षा पुरेशी!
विद्यार्थ्यांचा #MPSC च्या ऑनलाईन परिक्षेला विरोध असताना सरकार एव्हढा हट्ट कुणासाठी करत आहे? विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन #MPSC ची ऑनलाईन परीक्षेचा निर्णय तातडीने रद्द करा.
@mpsc_office@bhimanwar
@PatilKailasB@Mpsc_Andolan घरा घरात BJP विरोधात कार्यकर्ते तय्यार करायचं काम या ऑनलाईन exam मुळे होत आहे ,
मुख्यमंत्री साहेबांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन तत्काळ ऑफलाईन exam घेण्या बद्दल बैठक घेऊन निर्णय घ्यावा? BJP सरकार ने विद्यार्थी पाठीमागे उभे रहावे? @Dev_Fadnavis@Devendra_Office@ShelarAshish
@PatilKailasB स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सभागृहात ठामपणे आवाज उठवल्याबद्दल मनःपूर्वक आभार. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत ऑफलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशन रद्द करण्याची भूमिका मांडल्याबद्दल लाखो MPSC विद्यार्थ्यांच्या वतीने आपले अभिनंदन व धन्यवाद. 🙏
@PatilKailasB स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सभागृहात ठामपणे आवाज उठवल्याबद्दल मनःपूर्वक आभार. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत ऑफलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशन रद्द करण्याची भूमिका मांडल्याबद्दल लाखो MPSC विद्यार्थ्यांच्या वतीने आपले अभिनंदन व धन्यवाद. 🙏
स्पर्धा परीक्षांवर प्रयोग नको; एमपीएससीची गट 'क' परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा..
राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा एमपीएससीचा गट 'क'च्या परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी सभागृहाद्वारे सरकारकडे मागणी केली..
स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, समान संधी आणि विश्वासार्हता सर्वात महत्त्वाची आहे. मात्र ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशनमुळे विद्यार्थ्यांच्या मनात गुणांकनाबाबत शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेतील फरक, तांत्रिक बिघाड, सर्व्हर डाऊन होणे, परीक्षा केंद्रांतील गैरव्यवहार आणि खासगी यंत्रणांवर वाढणारे अवलंबित्व यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते..
राज्यात यापूर्वी विविध भरती प्रक्रियांमध्ये पेपरफुटी, तांत्रिक त्रुटी आणि गैरव्यवहाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळविण्याऐवजी ऑनलाईन पद्धत लादणे योग्य नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये पूर्ण पारदर्शकता आणि गुणवत्तेला न्याय देण्यासाठी पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे..
एमपीएससी ही विद्यार्थ्यांच्या विश्वासाची संस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांच्या संघटनांची भूमिका आणि तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन गट 'क'च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा. तसेच नॉर्मलायझेशन प्रणाली रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना समान आणि न्याय्य संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली..
@mpsc_office@Mpsc_Andolan
#पावसाळी_अधिवेशन #विधानभवन #VidhanBhavan
#monsoonsession2026
@AbhiPawarBJP@AbhiPawarBJP जी विरोधी नेत्याला जे करायचं आहे किंवा जे बोलत आहे ते बोलून द्या. तुम्ही विद्यार्थ्यांना शब्द दिला आहे की विद्यार्थ्याच्या #शेवटपर्यंत बाजूने राहाल.
तुम्ही #ऑफलाइन परीक्षेसाठी काय प्रयत्न करणार आहात हे एकदा स्पष्ट सांगा म्हणजे यानंतर कोणताही #वाद होणार नाही.
स्पर्धा परिक्षेची तुलना प्रवेश परिक्षेसोबत करणे जरा जोखमीचे.तुुलनात्मक गुणवत्ता निश्चितीसाठी विशीष्ट पूर्वपरीक्षेत हजर उमेदवारांचे एकाच संधीतील प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता गुुणांची सिमारेषा निश्चित करणे उचीत.गुुणवर्धनासाठी अतिरिक्त पूर्वपरीक्षां अनावश्यक व वेळखाऊ ही!