राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मिडिया विभागाचे प्रमुख महादेव बालगुडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करुन सरकारने जेलमध्ये डांबलं, पण अखेर न्यायालयाने त्यांना जामीन दिला, याबाबत मा. न्यायालयाचे मनापासून आभार! बालगुडे यांनी राज्याविरुद्ध युद्ध पुकारलं किंवा देशाची एकता-अखंडता धोक्यात आणणारी कृती केली असं कुठंही दिसत नसल्याचं स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आणि सरकारवर टीका करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे, अशा शब्दांत सरकारची कानउघाडणीही केली.
खुद्द न्यायालयानेच कान उपटल्याने आतातरी सरकार ताळ्यावर येईल आणि विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकणार नाही, ही अपेक्षा! गुन्हा खोटा असला तरी जामीन मिळण्यास वेळ लागला परिणामी त्यांच्या कुटुंबाला खूप काही सहन करावं लागलं, याची आम्हाला कायम खंत राहील.
@Dev_Fadnavis@Mahadev_Balgude
निश्चयाचा महामेरू।
बहुत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू।
श्रीमंतयोगी।।
अष्टपैलू, अष्टावधानी, जाणता राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
#शिवजयंती#जय_शिवराय#छत्रपतीशिवाजीमहाराज
कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करून सरकारने क्रांतीकारक पाऊल उचलले आहे. सरकारच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्वागत करत आहे.
खरतरं, तत्कालीन सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला तेंव्हा पासून राष्ट्रवादी युवक काँग्रेस बेरोजगार तरूणांच्या भावनां सोबत होती. आम्ही तत्कालीन सरकारला देखील हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली होती.
राज्यातील बेरोजगार युवकांच्या या संघर्षाला यश आले याचे समाधान आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस भविष्यात बेरोजगार युवकांच्या मागण्या आणि भावनां सोबत सदैव खांद्याला खांदा लावून लढण्यास कटीबध्द आहे. कंत्राटी भरती रद्द करण्याचा हा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा आणि @Dev_Fadnavis जी यांचे आभार आणि धन्यवाद.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्रातील जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांना न्याय व हक्क मिळावा यासंदर्भात सभागृहात आज औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.
#mumbai#Maharashtra#MonsoonSession2023
आमचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सूरज दादा चव्हाण आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना।।
@surajvchavan
ज्यांच्या ठाम भूमिकेमुळे महाराष्ट्र विधिमंडळात राज्यातील महिला व बालिकांसाठी 'शक्ती' विधेयक मंजूर झाले, त्या राज्याच्या महिला व बालकल्याण विकास विभागाच्या कार्यक्षम मंत्री, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री,
मा.सोनाली(वहिनी) प्राजक्त तनपुरे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना..!!
@TanpureSonali@prajaktdada
महाराष्ट्राचे दमदार राज्यमंत्री
मा.ना.प्राजक्त दादा तनपुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपणास उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना..!
@prajaktdada@TanpureSonali
राहुरीच्या मा.नगराध्यक्षा मा.डॉ.सौ.उषाताई तनपुरे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लोभो हीच प्रार्थना..!
@prajaktdada@TanpureSonali