@NHAI_Official Urgent intervention for chronic traffic congestion on Kalyan Shil Road & Shilphata Highway corridor. During peak hrs, commuters regularly spend more than 2 to 3 hrs for a journey that should normally take less than 45 min
Conduct a joint inspection of the corridor.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबत एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत मतदारसंघात सुरू असलेल्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी एमएमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त (१)
पी. वेलारासू यांची मुख्य उपस्थिती होती.
- मेट्रो - १२ प्रकल्पाचे काम जलदगतीने मतदारसंघात सुरू आहे. मात्र याला अधिक गती देऊन यावरून डबल डेकर पद्धतीने मार्ग जाणार असून यावरील फ्लायओव्हरचे काम देखील तातडीने सुरू करण्यात यावे, अशा सूचना यावेळी दिल्या. तसेच फ्लायओव्हरचे काम पूर्ण होऊ पर्यंत स्थानक साठी लागणारी जमीन अथवा इतर परवानगी प्रक्रिया मार्गी लावून स्थानक उभारणीचा मार्ग ही मोकळा होईल. जेणेकरून सर्व काम प्रगतीपथावर राहील.
- मेट्रो १२ विस्तारीकरण - कल्याण-तळोजा मेट्रो १२ च्या सुरू असलेल्या कामाला गती देण्यासोबतच शिळफाटा-मुंब्रा-कळवा मार्गे ठाणे अशी १२ ब विस्तारित मार्गिका प्रस्तावित करून त्याचे काम जलदगतीने कशा पद्धतीने करता येईल याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना दिल्या.
- तसेच या डबल डेकर मधील फ्लायओव्हरचे काम सुरू करून त्यावर जाण्यासाठी आणि तेथून खाली उतरण्यासाठी मार्ग तयार करण्याचे ही नियोजन करण्याचे आदेश दिले.
- याचसमवेत मेट्रो ५, ५ अ, ५ ब तसेच १४ कांजूरमार्ग - बदलापूर मार्गिका या महत्वकांक्षी मेट्रो मर्गिकांचे काम जलदगतीने पुढे नेण्यात यावे अशा सूचना दिल्या.
- कल्याण पूर्व यू-टाईप व श्रीमलंग रस्ता - या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादन जलदगतीने पूर्ण करून बाधित नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन, तसेच पुढील टप्प्यात क्लस्टर योजनेच्या माध्यमातून घरे व व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.
- ऐरोली-काटई फ्रीवे - काटई नाका येथील बोगद्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासोबतच फ्रीवेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर या मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या ऑक्टोबर मध्ये दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक अधिक गतीने होण्यास मदत होईल.
- एक्सेस कंट्रोल मार्ग - बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली या शहरांना जोडणाऱ्या एक्सेस कंट्रोल मार्गाच्या आरेखनाचा आढावा घेऊन पूर्व-पश्चिम भागांना जोडणी, तसेच डबल डेकर मार्ग व मेट्रो १४ सोबत त्याची जोडणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
- कल्याण रिंग रोड - डोंबिवली आणि टिटवाळा यांच्यातील प्रवास सुलभ करणाऱ्या कल्याण रिंग रोडच्या विविध टप्प्यांचा आढावा घेऊन टप्पा ३ साठी भूसंपादन आणि उर्वरित टप्प्याचे काम पूर्ण करून तातडीने पूर्ण करण्याच्या सक्तीच्या सूचना यावेळी दिल्या.
- अंबरनाथ-बदलापूर-उल्हासनगर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प - संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील शेड उभारणी, यंत्रसामग्री आणि उर्वरित कामांचा आढावा घेऊन प्रकल्पाला विलंब न करता पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तर येत्या नोव्हेंबर मध्ये हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
- अंबरनाथ सॅटिस प्रकल्प - रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे ८० कोटी रुपयांच्या सॅटिस प्रकल्पासाठी आवश्यक जागा, प्रशासकीय मान्यता आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घेऊन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- तसेच डोंबिवली सॅटिस प्रकल्प काम देखील लवकर सुरू करण्याच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
- तर उल्हासनगर महापालिकेच्या माध्यमातून सॅटिस प्रकल्प बाबत आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबत एक बैठक घेऊन पुढील नियोजन करण्याच्या सूचना केल्या.
- याच समवेत वाहतुकीच्या दृष्टीने राबविण्यात येणारे प्रकल्प उभारणीवेळी मध्ये येणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मर बाबत उपाययोजना राबविण्यात याव्या, यासाठी देखील यावेळी उपाययोजना राबविण्याचे सूचना केल्या.
- पत्री पुल तिसरा याची उभारणी सुरू असून यासाठी लागणाऱ्या उर्वरित जागेचे देखील भूसंपादन पूर्ण करावे, अशा ही सूचना दिल्या.
याप्रसंगी आमदार राजेश मोरे, कल्याण डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम, माजी आमदार राजू पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपमहापौर अमर लुंड, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळ विविध महापालिका, प्रशासकीय संस्था यांचे अधिकारी, अभियंते तसेच शिवसेनेचे स्थानिक महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील नगरसेवक उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
कल्याण-शिळफाटा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; भूमिपुत्रांना १३८.४५ कोटींचा मोबदला.
कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जमीन गेलेल्या भूमिपुत्रांचा तब्बल ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला मोबदल्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. प्रकल्पबाधितांना १३८.४५ कोटी रुपयांचा मोबदला देण्याचा निर्णय झाला असून, अत्यंत समाधानाचा क्षण आहे. या प्रश्नासाठी गेल्या काही काळापासून राज्य शासन आणि संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळाल्याशिवाय कल्याण-शिळफाटा रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण वेगाने पुढे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे हा प्रश्न केवळ भूसंपादनाचा नव्हता, तर भूमिपुत्रांना न्याय देण्यासोबतच लाखो नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याचा होता.
आज या प्रयत्नांना यश आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते भूमिपुत्रांना आज मोबदला पत्र सुपूर्द करण्यात आले. उर्वरित टप्प्याचाही मोबदला लवकरच वितरित केला जाणार आहे.
कल्याण-शिळफाटा हा कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबईला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्याचे सहापदरीकरण आणि काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर काटई नाका, पलावा चौक आणि शिळफाटा परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. लाखो नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्यास मदत होईल.
या कामामुळे कल्याण-शिळफाटा मार्गावरील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून, मेट्रो १२ आणि मेट्रो १२-अच्या कामालाही याचा फायदा होणार आहे.
यावेळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली चौधरी, मनसेचे माजी आमदार राजू पाटील तसेच स्थानिक नगरसेवक आणि जमिनमालक उपस्थित होते.
#Shivsena #Drshrikanteknathshinde