प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य,.
विषय: संयुक्त गट ब, गट क आणि राज्यसेवा 2024 परीक्षेसाठी जागावाढ करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित संयुक्त गट ब आणि गट क परीक्षांच्या जाहिरातींचा गेल्या वर्षभरात मोठा विलंब झाला आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांच्या संधींवर परिणाम होत आहे. त्या अनुषंगाने, या परीक्षांसाठी विक्रमी जागावाढ करण्यात यावी ही विनंती.
तसेच, राज्यसेवा 2024 परीक्षेत उपजिल्हाधिकारी, DySP, तहसीलदार व इतर सर्व संवर्गातील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तरीही, अद्याप या पदांसाठी मागणीपत्र आयोगाकडे पाठवले गेलेले नाही. त्यामुळे या सर्व रिक्त पदांचे मागणीपत्र तातडीने MPSC कडे पाठवावे आणि या परीक्षेसाठीही जागावाढ करण्यात यावी.
उमेदवारांच्या भविष्यासाठी ���ा निर्णय तातडीने घेऊन न्याय द्यावा ही विनंती.
धन्यवाद!
धनंजय रामकृष्ण शिंदे
@Dev_Fadnavis @iambadasdanve @CMOMaharashtra
@AAPMaharashtra @Mpsc_Andolan
@degree_holders
@mpsc_office
#Combine_जागावाढ_2024
🔶🔶🔶🔶
निवडणुकीच्या अतिव्यस्त schedule मधून अम���ल्य वेळ काढून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ @NANA_PATOLE
यांनी स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात महासंवाद साधला व अनेक वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली.
त्यानंतर मा.नानाभाऊनी या सर्वांना न्याय देण्यासाठी खालील महत्वपूर्ण घोषणा केल्या ज्याद्वारे लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना नक्कीच सुगीचे दिवस येऊन उज्ज्वल भविष्याची दारे खुली होतील यात शंका नाहीच.
1.
🔶🔶 #MPSC उमेदवारांसाठी
👉 केरळच्या धर्तीवर #MPSC चे सक्षमीकरण करण्यात येईल.
👉 राज्यसेवा मुख्य 2024 जाहिरात
आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक पदांची जाहिरात असेल.
👉 संयुक्त अराजपत्रित मुख्य 2024 जाहिरात
#PSI :- गेल्या दशकातील सर्वोच्च PSI पदभरती केली जाईल
#STI :- गेल्या दशकातील सर्वोच्च STI
पदभरती केली जाईल
👉 सरकारच्या नाकर्तेपणामुळे संयुक्त अराजपत्रित 2024 जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा आली.
साहजिकच हजारो उमेदवारांना age limit cross केल्यामुळे फॉर्म भरता येत नाही.
त्यांच्यासाठी तात्काळ निर्णय घेऊन त्यांना परीक्षेसाठी पात्र करण्याचा योग्य
निर्णय घेतला जाईल.
👉 दळवी समितीच्या राज्यसेवा मुख्य साठीच्या #UPSC चा Copy paste syllabus शिफारशी रद्द करण्यात येतील.
व नवीन समिती नेमून सध्याच्या objective pattern mains syllabus मध्ये गरज पडल्यास समिती म्हणेल त्याप्रमाणे काही बदल करून
objective pattern continue करण्यात येईल.
सर्वांना समान न्याय् व संधी मिळेल.
👉 बार्टी,सारथी, अमृत,महाज्योती व आदिवासी बा��धवांची TRTI
यात सुरु असलेला गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्यात येईल.
यात जे कुणी संचालक/
क्लासचालक/मध्यस्थ /दलाल दोषी आढळतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
2.
🔶🔶 सरळसेवा उमेदवारांसाठी
👉कंत्राटीकरण पदभरतीचा जी आर फक्त नावाला रद्द करण्यात आला.तरी खुलेआम कंत्राटी पदभरती केली जात आहे.
उदा:- आरोग्य विभाग भरती
तात्काळ हे सर्व बंद करण्यात येईल.
कोणत्याच परिस्थितीत राज्यात
कंत्राटी पदभरती केली जाणार नाही
👉 पोलीस भरती
:- टप्प्याटप्प्याने रेकॉर्डब्रेक पोलीस भरती करण्यात येईल
👉 जलसंपदा पदभरती केली जाईल
👉 BMC सहित इतर मनपा पदभरती केली जाईल
👉 आदिवासी बांधवांवर होत असलेला अन्याय थांबवून पदभरती करण्यात येईल
👉 रखडलेल्या सरळसेवा पदभरती करण्यात येत���ल
👉 येणारी प्रत्येक सरळसेवा परीक्षा
#MPSC मार्फतच घेण्यात येतील
👉 1000 रुपये परीक्षा शुल्कापासून
कायमची मुक्तता मिळेल
👉 कोणत्याच जाहिरातीत उच्च शिक्षण
हे अडसर ठरणार नाही ,याची काळजी घेतली जाईल .
👉 जुनाट सेवाप्रवेश नियम बदलून त्यात काळानुरूप बदल करण्यात येतील.
👉 आवश्यक त्या विभागाचे नवीन आकृतीबंध तयार करण्यात येतील.
👉 पदभरती जाहिरातीतील अनावश्यक व जाचक अटी वर निर्बध घालण्यात येत��ल
👉 बोगस दिव्यांग व बोगस खेळाडू प्रमाणपत्रावर आळा घालण्यासाठी कठोर पाऊले उचलली जातील
खऱ्या��ुऱ्या दिव्यांग व खेळाडूंना न्याय मिळेल
3.
🔶🔶 शिक्षक बांधवासाठी व शिक्षणाच्या हक्कासाठी
👉 शिक्षण-सेवक पद रद्द करण्यात येईल.
हजारो शिक्षक बांधवांकडून वारंवार
मा.नानाभाऊंकडे ही मागणी करण्यात
येत होती.
👉 समूहशाळा व दत्तकशाळा संदर्भातील जाचक जीआर रद्द करण्यात येईल.
@mpsc_office
"गट 'क' लिपिक टंकलेखक तसेच कर सहायक पदासाठी जाहिरात जानेवारी २०२३ मध्ये निघाली होती. यानंतर एप्रिल २०२३ मध्ये पूर्व परीक्षा झाली आणि तब्बल ८ महिन्यांनंतर डिसेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेचा निकाल देखील उशिराने लागला. १ ते ��३ जुलै २०२४ दरम्यान स्किल टेस्ट पार पडली. स्किल टेस्ट होऊन ��रेच दिवस उलटले आहेत.
@mpsc_office विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर स्किल टेस्टचा निकाल जाहीर करावा ही विनंती!
#MPSC #ClerkTypistResult #SkillTest #StudentsRights #MPSCUpdates
@mieknathshinde
@NanaPatole @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
आज महाराष्ट्रातील नवनियुक्त शिक्षक व अभियोग्यताधारक तीन महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत:
1) शिक्षण सेवक पद रद्द करा!
2) रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांना सेवेत घ्या!
3) पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित शिक्षक भरती तात्काळ करा!
शिक्षकांचा हा लढा न���याय आणि हक्कांसाठी आहे. आम्ही या लढ्याला संपूर्ण पाठिंबा देत आहोत.
#मा_नाना_पटोले साहेबांनीही या मागण्यांना पाठिंबा दिला आहे, आणि काँग्रेस पक्ष नेहमीच शिक्षकांच्या बाजूने ठामपणे उभा राहील.
"शिक्षकांचा सन्मान म्हणजेच भविष्याचा पाया"
आपण सर्वांनी या लढ्यात सहभागी होऊन शिक्षण क्षेत्रातील हा अन्याय दूर करावा!
@mieknathshinde @Dev_Fadnavis
@NANA_PATOLE @AjitPawarSpeaks
@PawarSpeaks @Jayant_R_Patil
@satejp @atullondhe
@dvkesarkar
@CMOMaharashtra
#शिक्षणसेवक_रद्द_कर��� #रयत_शिक्षणसंस्था #शिक्षकभरती_तात्काळ_करा #शिक्षकांचे_हक्क #CongressSupportsTeachers #NanaPatole #BaliramDole #JusticeForTeachers
MPSC च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासापेक्षा अधिक वेळ आयोगाच्या मनमानीपणाशी लढण्यातच खर्च होतो अनेकदा
25 तारखेला परीक्षा आहे, आता अवघे तीन दिवस उरले असतानाही निर्णय घेतला जात नाही
आधीच आपल्याकडे सरकारी नोकऱ्यांची कमतरता त्यात परीक्षा संस्थांची अशी असंवेदनशीलता... विद्यार्थ्यां���्या बाजूने विचार करणारे लोक आयोगात नसतातच का?