MES-2026 मधील स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) संवर्गासाठी तब्बल 0 पदे दर्शविण्यात आली आहेत. राज्यातील हजारो अभियंता विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे.
राज्यात अनेक विभागांमध्ये स्थापत्य अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असताना भरतीत एकही पद न देणे अत्यंत चिंताजनक आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून MES-2026 मध्ये रिक्त पदांचा समावेश करत सुधारित मागणीपत्र तात्काळ MPSC कडे पाठवावे, ही विनंती.
@INCHarshsapkal@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@girishdmahajan@RVikhePatil@SanjayDRathods@GulabraoRPatil@cbawankule
#MES2026 #CivilEngineering #MPSC #MaharashtraJobs #रोजगार
@Dev_Fadnavis साहेब
सामान्य प्रशासन विभागाने जाहिर केलेल्या 'भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा' शासन निर्णयात WRD #कनिष्ठ_अभियंता (स्था/वि/यां) याचे अद्यावत सेवाप्रवेश नियम नमूद आहे.
मग Gazette Notification अजूनही का प्रसिद्ध करण्यात येत नाहि ???
@CMOMaharashtra@RVikhePatil
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) भरती 2023 चा संथ कारभार आता असह्य झाला आहे!
📌 जाहिरात : 13/08/2023
📌 परीक्षा : 10/08/2025
📌 गुणवत्ता यादी : 08/10/2025
📌 निवड यादी : 10/02/2026
निवड यादी जाहीर होऊन अनेक महिने उलटले, तर जाहिरात प्रसिद्ध होऊन जवळपास 3 वर्षे पूर्ण होत आली आहेत. हजारो उमेदवारांनी अभ्यास, वेळ आणि पैसा खर्च करून ही प्रक्रिया पूर्ण केली, मात्र अद्याप नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत.
तरुणांच्या आयुष्याशी आणि करिअरशी असा खेळ का? निवड झालेल्या उमेदवारांना आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार?
@midc_india ने तात्काळ नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावेत. बेरोजगार युवकांना वेठीस धरण्याचे काम थांबवावे.
“निकाल लागला, निवड झाली; आता नियुक्ती कधी?”
@INCHarshsapkal@samant_uday@degree_holders@Mpsc_Andolan
#MIDC #MIDCRecruitment #MaharashtraJobs #Employment #RecruitmentDelay #महाराष्ट्र #नोकरी #युवक_न्याय #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
@KapilChavan021@ilovepdf_com@ibps_official@PMCPune The first page of the pdf is a separate document cautioning appeared candidates from falling for touts and job scam. This was attached to the result pdf.
A free online tool was used for merging. What is your point? Care elucidating?
@PMCPune
@RVikhePatil (१) सुशिक्षित आणि रोजगार मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठि साहेब आणि विभाग काहि सकारात्मक भुमिका घेणार नाहित.
विनंती करू करू विद्यार्थी बेहाल झालेत पण साहेबांना काहि फरक पडेना झालायं.
गरीब शेतकरी कुटुंबातील मुल आहे
आमदार खासदार Seat नसते. @BJP4Maharashtra
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
विषय : MPSC जाहिरात क्र. 133/2025-26 अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी शून्य पदे दर्शविल्याबाबत तातडीने सुधारित मागणीपत्र पाठवून रिक्त पदांचा समावेश करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) जाहिरात क्र. 133/2025-26 अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदसंख्येमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी "शून्य (0) पदे" दर्शविण्यात आली आहेत. ही बाब राज्यातील हजारो अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण करणारी असून राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत चिंताजनक आहे.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त झालेली माहिती, विभागीय आस्थापना अभिलेख तसेच विविध शासकीय कागदपत्रांमधून जलसंपदा विभागासह इतर विभागांमध्ये स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी संवर्गातील मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याचे स्पष्ट होते. असे असतानाही 2023, 2024 आणि 2025 या सलग तीन वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कोणतेही मागणीपत्र न पाठविणे अथवा शून्य पदांची मागणी करणे हे राज्यातील गुणवंत उमेदवारांवर अन्याय करणारे आहे.
जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण विकास, नगरविकास आणि इतर पायाभूत सुविधा विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सुरू असताना तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. परिणामी कामांच्या गुणवत्तेवर, देखरेखीवर आणि अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आपणास नम्र विनंती करण्यात येते की,
1. जलसंपदा विभागासह संबंधित सर्व विभागांमधील स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी संवर्गातील प्रत्यक्ष रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करून सार्वजनिक करावी.
2. उपलब्ध रिक्त पदांच्या आधारे सुधारित मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तातडीने पाठवून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 मधील पदसंख्या वाढवावी व रिक्त पदांचा समावेश करावा.
3. सेवाप्रवेश नियमांमधील प्रलंबित बदलांचा परिणाम न होणारी पदे तात्काळ भरती प्रक्रियेत समाविष्ट करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
4. गेल्या तीन वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी शून्य मागणीपत्र का पाठविण्यात आले याची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी.
राज्याच्या विकासासाठी आवश्यक असलेले तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. या विषयात आपण वैयक्तिक लक्ष घालून तातडीने सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस
अध्यक्ष : रोजगार व स्वयंरोजगार विभाग
मोबाइल क्र. ९८६७६ ९३५८८
@CMOMaharashtra@INCHarshsapkal@INCMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@girishdmahajan@RVikhePatil@degree_holders @mpsc_ofice @Mpsc_Andolan@PunyachiMPSC
#MPSC #MES2026 #CivilEngineering #Maharashtra
जलसंधारण विभागाच्या नव्या आकृतीबंधामुळे स्थापत्य अभियंते आणि कृषी अभियंते यांच्यात असंतोष निर्माण होणे ही केवळ पदोन्नतीची बाब नाही, तर विभागाच्या तांत्रिक क्षमतेशी आणि भविष्यातील जलसंधारण प्रकल्पांच्या गुणवत्तेशी संबंधित गंभीर बाब आहे.
राज्यातील बंधारे, तलाव, धरणसुरक्षा, साठवण रचना, पूरनियंत्रण आणि जलसंधारण प्रकल्पांमध्ये स्थापत्य अभियंत्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही संवर्गावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होत असेल, तर शासनाने संबंधित संघटनांशी सविस्तर चर्चा करून वस्तुनिष्ठ तांत्रिक समितीमार्फत या निर्णयाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
रोजगार, पदोन्नती आणि तांत्रिक गुणवत्तेचा समतोल राखत सर्व घटकांना न्याय देणारा मार्ग शोधणे ही सरकारची जबाबदारी आहे. संवादाऐवजी संघर्षाची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा.
@INCHarshsapkal@SanjayDRathods
#WaterConservation #EngineeringJustice #Maharashtra
#DhananjayShinde #Dhananjay_Shinde
मा. आयोगाचे मनःपूर्वक आभार 🌹🙏 परंतु अद्याप अनेक बाबी प्रलंबित आहेत जसे की परीक्षा पद्धती, नवीन जाहिराती आणि प्रलंबित निकाल. आपण याकडे देखील गांभीर्याने लक्ष द्याल हिच अपेक्षा 🙏
"Exam Scheme" देखील लवकरात लवकर जाहीर होणे गरजेचे आहे. @bhimanwar@mpsc_office@CMOMaharashtra
मुख्यमंत्री महोदयांनी मेगाभरतीची घोषणा करूनही जलसंपदा विभागाने अद्याप ना सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले ना आकृतीबंध प्रसिद्ध केला. सरकारने तत्परता दाखवून लवकर भरती पूर्ण करावी हि विनंती
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@girishdmahajan#WRD_JE
जलसंपदा विभागाने अद्याप ना सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले ना आकृतीबंध प्रसिद्ध केला.. मुख्यमंत्री महोदयांनी केलेली मेगाभरतीची घोषणा जलसंपदा विभागाने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. @Dev_Fadnavis@Aaple_Sarkarr@girishdmahajan@RVikhePatil