राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२६, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा-२०२६ आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा-२०२६ पुढे ढकलण्याचा एमपीएससीचा निर्णय.
@mpsc_office#प्रसिद्धीपत्रक#MPSC#CompetitiveExams
पती-पत्नी हे संसाररुपी रथाची दोन चाकं असतात, असं म्हटलं जातं. पण माझ्यासाठी कुंती ही केवळ दुसरं चाक नाही तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा आणि संघर्षाचा मुख्य कणा आहे. तिच्या साथीमुळंच आमचा कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय रथ न अडखळता अविरत सुरुय. योगायोग म्हणजे माझ्यासोबतच आज या दुसऱ्या चाकाचाही अर्थात माझ्या सुख-दुखाःतील भागीदार असलेल्या पत्नी कुंतीचाही वाढदिवस आहे. ती माझ्या पाठीशी किती खंबीरपणे उभी असते, याचा प्रत्यय मला गेल्याच आठवड्यात आला. MPSC च्या विद्यार्थ्यांचं पूर्वनियोजित आंदोलन हे २७ तारखेला होतं, आंदोलन किती दिवस चालेल याचा नेम नव्हता. मनात विचार आला की कुंतीच्या वाढदिवसाच्या दिवशीही आपण रस्त्यावर आंदोलनाला बसलो तर कुंतीला काय वाटेल? याबाबत तिच्याशी बोललो तेंव्हा तिने दिलेलं उत्तर मनाला भिडणारं होतं.
ती सहज म्हणाली, ‘‘वाढदिवस तर दरवर्षीच येतो पण आंदोलनात तुमच्या असण्याने लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य सावरणार असेल, त्यांचं स्वप्न साकार होणार असेल आणि महाराष्ट्राला नवनवीन उंचीवर घेऊन जाणारे स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी मिळण्यास मदत होणार असेल तर वाढदिवसाच्या दिवशीही तुम्ही आंदोलन केलं तर उलट त्याचा मला आनंदच होईल आणि अभिमानही वाटेल.’’ तिचे हे शब्द ऐकून तिच्याविषयीचा आदर शतपटीने वाढला आणि आमची केमिस्ट्री किती परफेक्ट जुळलीय याचीही पुन्हा प्रचिती आली. आता योगायोगाने आंदोलनच २ ऑक्टोबरपर्यंत पुढं ढकललं त्यामुळं वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण कुटुंबालाच वेळ देता येतोय याचा आनंदच आहे.
आता माझ्या कर्तव्याला स्वतःचंच कर्तव्य मानणाऱ्या समजुतदार आणि परफेक्ट Better Half ला हृदयपूर्वक Full शुभेच्छा..! तिची भक्कम साथ कायम मिळावी आणि तिला निरामय आरोग्य लाभावं, ही ईश्वरचरणी प्रार्थना..!
📍 मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व)
#थेटप्रसारण
राज्य भरती सुधारणा उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्ष अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा प्रसिद्धी माध्यमांशी संवाद…
#LIVE
https://t.co/Mme4RJcJM9
@Nikhil_A_Patil@Nikhil_A_Patil सर क्लासेस प्रेरित ज्यांचे UPSC attempt संपलेले आहेत आणि जी मुलं मुळात UPSC च करत आहेत आणि MPSC कडे बॅकअप म्हणून बघत आहेत अशा केवळ काही मुलांच न ऐकता लाखो विद्यार्थ्यांच्या मनातील Objective पॅटर्न 2027 पासूनच लागू करावा ही नम्र विनंती 🙏
@Nikhil_A_Patil कृषिसेवेसह इतर सर्व परीक्षा २०२७ पासूनच Objective पद्धतीने झाल्याचं पाहिजेत!!
यासाठी आपण प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपले धन्यवाद!!
परंतु लवकरच याबाबतचे नोटिफिकेशन यायला हवे..हा मुद्दा आपण लावून धरावा🙏
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने होत होती.
आज मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकतेने समजून घेतल्या असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास आहेच.
यासोबतच राज्यसेवा तसेच इतर परीक्षांच्या Objective Pattern ची विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करण्यात आलेल्या 75,000 जागांच्या भरतीबाबतही मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्याचा विचार हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम असला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मकतेने संवाद साधून त्यावर मार्ग काढण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच महत्त्वाचा आहे.
विद्यार्थीहितासाठी संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक मार्ग हाच आमचा प्रयत्न.!
:- निखिल पाटील
@Dev_Fadnavis@mpsc_office@CMOMaharashtra
@DescriptiveMPSC@CMOMaharashtra@mpsc_office@GAD_Maharashtra@VRadhaIAS म्हातारे ज्यांचे upsc चे attempt संपले आहेत, ते आता काही descriptive घेणाऱ्या class वाल्यांकडून पैसे घेऊन विद्यार्थी हितासाठी काम करणाऱ्या समितीवर descriptive pattern ठेवण्यासाठी दबाव आणत आहेत.
दळवी समितीने याच क्लासवाल्यांच्या प्लॅटफॉर्म वरून descriptive चा प्रचार केला होता.
प्रिय @OFFICER_CLUB11,
तुमचा निर्णय तत्त्वतः योग्य असला, तरी वेळेमुळे प्रश्न निर्माण होतात.
यापूर्वी आंदोलनांना पाठिंबा आणि लोकप्रतिनिधींच्या पोस्ट शेअर केल्या. मग २ ऑक्टोबरच्या ऐतिहासिक #MPSC आंदोलनाच्या तोंडावर ही तटस्थ भूमिका नेमकी का?
तटस्थता योग्य, पण वेळही बोलकी असते!
देशातील संविधानाने प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिलेल्या अधिकाराचा निवडणूक आयोगाने SIR मोहिमेच्या माध्यमातून कसा खून केला, मनमानी पद्धतीने मतदार यादीत बोगस मतदारांची नावं कशी समाविष्ट केली, खऱ्या मतदारांची नावं कशी वगळण्यात आली आणि भाजपाला जिंकून आणण्यासाठी कसा हातभार लावला, याची प्रेझेंटेशनसह माहिती देणारी सविस्तर पत्रकार परिषद मुंबईत घेतली. हे संपूर्ण प्रेझेंटेशन सोबतच्या लिंकमध्ये प्रत्येकाच्या माहितीसाठी देत आहे. भविष्यात हे टाळायचं असेल आणि संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवून लोकशाही आणि संविधानाचंही संरक्षण करायचं असेल तर याचा प्रत्येकाला गांभीर्याने विचार करावा लागेल..
https://t.co/6EsLXQB4qX