महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची जाहिरात ७ महिने उशिराने आली असून वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ आहे. यामुळे अनेक विद्यार्थी, विशेषतः ग्रामीण भागातील मुले-मुली अपात्र ठरत असल्याबाबतचे निवेदन विद्यार्थ्यांनी...१/५
जाहिरात क्र.128/2025 अराजपत्रित गट ब # ASO फक्त 3 पदे आणि STI अराखीव पदे चक्क 0 राज्य सरकारने या दोन्ही पदामध्ये वाढ करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अनेक पदे रिक्त असून सुद्धा पदांमध्ये वाढ होताना दिसत नाही.कृपया या मध्ये वाढ करावी.
@CMOMaharashtra@MahaDGIPR@Dev_Fadnavis
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1846 कार्यकारी सहायक भरतीतील 425 हून अधिक उमेदवार अनुपस्थित/अपात्र ठरले आहेत. BMC आयुक्तांनी यावर विशेष लक्ष देऊन पुढील गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी तात्काळ प्रसिद्ध करावी व कागदपत्र तपासणी करावी. यासोबतच वैद्यकीय तपासणी झालेल्या उमेदवारांना त्वरित नियुक्ती द्यावी!
@mybmc@mieknathshinde
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्यावतीने जून २०२५ मध्ये टायपिंग चाचणी घेण्यात आली, परंतु अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. हा निकाल २० ऑगस्टपूर्वी जाहीर न झाल्यास हजारो पात्र उमेदवारांना MPSC Group - C 2024 च्या मुख्य परिक्षेचा अर्ज भरता येणार नाही आणि त्यांना एका मोठ्या संधीला मुकावे लागणार आहे. त्यामुळं महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने हा निकाल जाहीर करावा आणि सरकारनेही यामध्ये लक्ष द्यावं, ही विनंती!
@Dev_Fadnavis
जा.क्र.११७ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२५ काल प्रसिद्ध झालेल्या या जाहिराती मध्ये
राज्यकर निरीक्षक 279 पदापैकी 0 पदे खुला प्रवर्गासाठी साठी देण्यात आले आहेत.
अशी कशी आणि कोणती बिंदूनामावली वापरली शासनाने?
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#शून्यSTI
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - जाहिरात प्रसिध्द करण्यात आली.
जाहिरात पाहता महाराष्ट्रात खुल्या प्रवर्ग (open category) मध्ये जन्म घेणे पाप आहे का...?
STI च्या जाहिरातीत खुला प्रवर्गाला- 0 जागा...
@CMOMaharashtra#Mpsc
393+671=1064 एवढ्या जागा रिक्त असताना सुध्दा आज विधिमंडळात आयोगाने या जागा भरण्याच काही प्रयोजन नाही आणि #WaitingList लागणार नाही असं सांगितलं . जर आयोग स्वतः च बनवलेले नियम मोडत असेल तर आम्ही विद्यार्थ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा ?
#393
#WaitingList@mpsc_office@RRPSpeaks
@mpsc_office@Drsuvarnas मा. MPSC आयोग, गट क clerk 111/2023 हा निकाल आज जाहीर करावा ही विनंती . कृपया करून 7006 मुलांना आज दिलासा द्यावा. विद्यार्थी + 7k कुटुंब 2023 पासून वाट बघत आहे. कधी निकाल आणि जोइनिंग येते. खूप कष्टमय झालं आहे सगळ. आज
#निकाल#recomanadation letter.
विनंती.
काल आयोगाने गट क पूर्व 2024 ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध केली.
गट ब पूर्व परीक्षा निकाल लावण्यासाठी जो विलंब लावला तो गट क पूर्व ला लावू नये ही नम्र विनंती.
@mpsc_office
#MPSC मार्फत जानेवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक एकूण 7006 पदांपैकी आयोगाने 6613 पदांची तात्पुरती निवड यादी जाहीर केली होती. त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील 393 पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत. या 393 जागा अंतिम निवड यादीत समाविष्ट करून पूर्ण 7006 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणीसाठी #MPSC च्या काही युवांनी मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. त्यांचा हा विषय सरकारकडं माडण्याचं आश्वासन त्यांना दिलं.
#MPSC_Clerk लिपिक-टंकलेखक 2023 नियुक्ती बाबत आज विधानपरिषदेत विचारलेल्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर.
एकंदरीत असंच दिसतंय की सर्व परिस्थिती सत्ताधाऱ्यांना माहिती आहे, पण तरीही हेतुपूर्वक उमेदवारांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
@Dev_Fadnavis@mpsc_office
🛑 लिपिक टंकलेखक 2023
🔸 20 जाने 2023:- जाहिरात आली
🔸जवळपास अडीच वर्षे झाली, अद्याप अंतिम निकाल नाही.
🔸आता @mpsc_office ने 2 गोष्टींचा विचार करायला हवा.👇
1) हा विलंब योग्य आहे का?
2) पूर्व+मुख्य+कौशल्य चाचणी याऐवजी ➡️ एक चाळणी परीक्षा + कौशल्य चाचणी घेतली तर !
@Dev_Fadnavis
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ७००६ लिपिक - टंकलेखक पदांसाठी २०२३ ला मुख्य परीक्षा घेण्यात आलेली होती. या परीक्षेची अंतिम निवड यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवड यादीतील महाराष्ट्रभरातील विद्यार्थी हे संभ्रमावस्थेत आहेत. दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील काही विद्यार्थी याच संदर्भात येऊन भेटले होते. या विषयासंदर्भात आज विधानपरिषद विरोधी पक्ष नेते मा. अंबादासदादा दानवे यांची भेट घेतली. यावेळी सोबत विद्यार्थीही उपस्थित होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही अंतिम निवड यादी जाहीर होईल असे आयोगाने कळविले आहे. आता पुन्हा पुढची तारीख न मिळता अंतिम निवड यादी जाहीर व्हावी अशा सूचना मा. विरोधी पक्षनेते यांनी संबंधित विभागाला दिल्या!
#FightForRight
#MPSCStudents #लिपिक_टंकलेखक_भर्ती #विद्यार्थ्यांचा_हक्क #Transparency #JusticeForAspirants #ClerkRecruitmentDelay
प्रति,
मा. रजनीश शेठ
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बेलापूर
नवी मुंबई.
विषय: महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 – निकालातील अस्वीकार्य विलंबाबद्दल विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करत निषेध आणि तात्काळ अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी.
महोदय,
दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेली पूर्व परीक्षा आणि 17 डिसेंबर 2023 रोजी लिपिक-टंकलेखक पदांसाठी मुख्य परीक्षा पार पडली. परंतु, आज 06 जून 2025 पर्यंत, म्हणजे पूर्व परीक्षेनंतर 25 महिन्यांहून अधिक आणि मुख्य परीक्षेनंतर 18 महिन्यांहून अधिक काळ लोटूनही अंतिम निवड यादी जाहीर झालेली नाही. यामुळे महाराष्ट्रातील हजारो तरुण विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष, मानसिक ताण आणि निराशा निर्माण झाली आहे.
आज 6 जून 2025 रोजी आयोगाने प्रसिद्ध केलेले पत्र केवळ औपचारिक आणि दिशाभूल करणारे आहे. त्यात ना ठोस तारीख आहे, ना जबाबदारी स्वीकारली आहे, ना पारदर्शकता दिसते. हे विद्यार्थ्यांच्या भावनांचा अवमान करणारे आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख व्यथा:
1प्रदीर्घ प्रतीक्षा: अथक परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ अद्याप मिळालेले नाही.
2मानसिक अस्थिरता: निश्चित तारीख नसल्याने विद्यार्थी पुढील परीक्षांच्या तयारीत लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
3वयोमर्यादेचा अन्याय: विलंबामुळे काही विद्यार्थ्यांची नोकरीसाठीची वयोमर्यादा ओलांडली जाण्याचा धोका आहे.
4विश्वासघात: सरकार आणि आयोगाची ही ढिलाई विद्यार्थ्यांशी विश्वासघातासारखी आहे.
काँग्रेस पक्षाच्या ठाम मागण्या:
1लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल तात्काळ आणि निश्चित तारखेसह जाहीर करावा.
2या विलंबाची स्पष्ट आणि पारदर्शक कारणे जनतेसमोर मांडावीत.
3या विलंबास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
4विद्यार्थ्यांच्या मानसिक आधारासाठी समुपदेशन केंद्रे आणि सहाय्यता यंत्रणा त्वरित सुरू करावीत.
जर 10 दिवसांत अंतिम निकाल जाहीर न झाल्यास, काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करेल. विद्यार्थ्यांचा संयम आता संपुष्टात येत आहे. सरकारने त्यांच्या भावनांशी आणि भविष्याशी खेळणे त्वरित थांबवावे.
“तरुणांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही!”
“निकाल तात्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन अटळ आहे!”
आपला नम्र, धनंजय रामकृष्ण शिंदे
@mpsc_office@INCHarshsapkal
महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत असलेल्या अवकाळी पावसामुळे रस्ते बंद आहेत, वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी संबंधित केंद्रावर पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे पुढील तीन दिवसांत होऊ घातलेल्या या परीक्षा स्थगित करणे योग्य राहील.