इथे कुठली सिक्युरिटी नाही, कुठला मेटल डिटेक्टर नाही. थेट शेतकऱ्यांना भेटून त्याचं म्हणणं ऐकून, त्यांना दिलासा देणाऱ्या आमच्या नेत्या आदरणीय @SunetraA_Pawar आदरणीय सुनेत्रा वाहिनी दादांचा वारसा भक्कमपणे चालवत आहेत.
महाराष्ट्राच्या कर्तृत्ववान नेत्यांवरचा हा काळाचा घाला थांबणार तरी कधी?
महाराष्ट्राच्या राजकारणाला हे कसलं ग्रहण लागलंय.. विलासराव, गोपीनाथराव, आर आर आबा..आणि आता अजितदादा
बातमी पचवणं जड झालंय.
@amolmitkari22 मेटकरी जी आपल्या पक्षांनी वक्ता पदावरून काढून का टाकलं ह्यांचे आत्मचिंतन करा पहिले मग बाकीच्या ठिकाणी लक्ष द्यावे
ऊग बिनकामाच प्रसिद्ध साठी फडफड करु नका.
तूर्तास धन्यवाद!!!
मुंबईत राहणाऱ्या माझ्या गाव खेड्यातील बांधवांनो कामाला जाताना तुमच्या डब्यासोबत एक एक्स्ट्रा डब्बा आंदोलक मराठा बांधवासाठी घेऊन जा.
हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. ज्यामुळे जेवण देणारी एक व्यवस्थाच निर्माण होईल. आंदोलन करायला आलेल्या लोकांची व्यवस्था होईल.
धन्यवाद !
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏽.
आनंद, उत्साह आणि भक्तीभावाच्या वातावरणात आज गणरायाचे आगमन होत आहे. चैतन्याने सळसळणारा गणेशोत्सव, आपण सर्वजण या उत्सवात सहभागी होऊन आनंदाची उधळण करुया. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
#GaneshChaturthi2025#Ganeshotsav2025
आज पुण्यात छावा संघटनेचे श्री. विजयकुमार घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझी भेट घेतली. त्यांनी लातूरमध्ये घडलेल्या घटनेची सर्व तपशीलवार माहिती माझ्यासमोर मांडली. त्यांच्या तक्रारी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेत, मी तात्काळ लातूरच्या पोलीस अधीक्षकांना सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
तसेच, छावा संघटनेच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक आणि त्वरित निर्णय घेतला जाईल असा विश्वास मी त्यांना दिला आहे.
मोठ्या नेत्यांसाठी सामान्य कार्यकर्त्यांचा नेहमीच बळी दिला जातो जाता जाता छावा संघटनेने आपल्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरले तर आपण त्यांची पुजा करायची होती का??
,@surajvchavan यांनाही समज द्यावी व कारवाई करु नये हि पक्षाला विनंती .@AjitPawarSpeaks@SunilTatkare
युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन... राजमाता जिजाऊ, शिवराय आणि असंख्य मऱ्हाटी जनांनी पाहिलेल्या 'स्वराज्य' नावाच्या स्वप्नाची पुर्तता झाली तो हा दिवस. यानिमित्ताने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. शिवराज्याभिषेक दिन चिरायू व्हावा...
#शिवराज्याभिषेक 🚩
निशब्द आहे.
संतोष देशमूख यांची निर्घृण हत्या करताना आरोपीचे फोटो व्हिडिओ पाहून हादरून गेलो आहे..काय लिहावे आणि किती राक्षसी प्रवृत्तीचे हे लोक आणि या लोकांना पाठीशी घालणारे लोक काहीच बोलावे वाटत नाही.
@Dev_Fadnavis साहेब @AjitPawarSpeaks दादा आपण लवकर यांची दखल घेऊन कारवाई करावी.
प्रत्येक गोष्टींचे अनेक पैलू असतात,मनात जर थोडी जरी शंका असेल तर अश्या गोष्टींवर उथळ प्रतिक्रिया देणं टाळायला हवं.
कोण चूक.... कोण बरोबर.... हे ठरविण्याचा अधिकार खरंतर न्यायव्यवस्थेला आहे. त्या क्षणी ज्या ज्या लोकांचा त्या घटनेमध्ये सहभाग असतो, त्या लोकांव्यतिरिक्त बाकी जगाने घेतलेल्या भूमिका नेहमी बदलत राहिलेल्या आहेत.
या जगात सहानुभूती आणि द्वेष यापलीकडे तटस्थ राहून परिपूर्ण विचार करणारी लोकं असायला हवीत.
#swargatecase
#स्वारगेट