राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंचर येथे आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित राहून सर्व गोपाळ भक्तांना शुभेच्छा दिल्या.
#Manchar#Ambegaon#KrishnaJanamashtami ✨❣️
आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे 30 जुलै 2014 रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या दुर्घटनेत 44 कुटुंबातील 151 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेला आज 10 वर्ष पूर्ण झाली. या दुर्घटनेतील निष्पाप जीवांच्या पवित्र स्मृतींना आज स्मृतिस्तंभ येथे पूर्वा वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी आदरांजली वाहिली. यावेळी माळीण गावातील विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
Join the Mumbai Dialogue on World Affairs!
The Yashwantrao Chavan Research Centre of Social Science, in collaboration with the U.S. Consulate Mumbai, presents
The Diversity Debate: Implications for the U.S. Elections, Voting, and Advocacy.
@ybchavancentre@USAndMumbai
शिरूर तालुक्यातील केंदूर येथील ठाकर समाजातील कुटुंबीयांना पक्की घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, या मागणीसाठी ठाकर समाज बांधव तसेच लोकप्रतिनिधींनी आज माझी भेट घेतली. त्याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याच्या सुचना दिल्या. या नियोजित बैठकीत हा प्रश्न मार्गी लागेल याची मला खात्री आहे.
महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथे संपन्न झालेल्या हुतात्मा बाबू गेनू व देशभक्त आण्णासाहेब आवटे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याला आज उपस्थित राहून अभिवादन केले. यावेळी हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कळबादेवी, मुंबई येथून आणलेल्या ज्योत सोहळ्यातही सहभाग घेतला.
For those in Mumbai, hope to see you this evening at the Nehru Center, Worli, for the Mumbai Dialogue on World Affairs. Dr. Dipankar Sharma will be speaking on ‘Rebooting Political Communication’. Dr. Surendra Jondhale will be presiding over the program.
wonderful speech by Samir Saran and a panel discussion session on G20 - ‘The India way, the India Opportunity’ with @samirsaran - President @orfonline ,@rishabh_shroff - Co- Chair @FicciYoung , Partner ( CAM) , @PurvaWalsePatil - Trustee NRCD, Ms Richa Roy
नाशिक डीसीसी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सहकार्य करेल
जिल्ह्याच्या अर्थकारणात सहकारी संस्थांची मातृसंस्था म्हणून बँकेची ओळख आहे. प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्था, दुग्ध संस्था, खरेदी-विक्री संघ, नागरी बँका, नागरी पतसंस्था, सहकारी साखर कारखाने,शेतकरी व इतर सर्व प्रकारच्या सह. संस्थांच्या उभारणीत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.या बँकेचे योगदान मोठे राहिले आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात बँकेचा मोलाचा वाटा आहे. शेतकरी हितासाठी बँकेच्या अडचणींवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाचे सहकार्य असेल असे आश्वस्त केले.
मंत्रालयातील दालनात आज नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. शेतकऱ्यांना शेती व शेतीपूरक कामासाठी बँकेचे सहकार्य मोठे राहिले आहे. त्यामुळे बँकेच्या अडचणीवर सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. बँकेच्या अडचणींवर काय उपाययोजना करता येतील याबाबतचा सुधारित आराखडा पुढील एक महिन्यात शासनाकडे सादर करावा असे निर्देश दिले.
वाढती थकबाकी, एनपीएत तोटा यामुळे सध्या नाशिक डीसीसी बँक अडचणीत आली आहे. बँकेच्या या अडचणी दूर करण्यासाठी नाबार्डने सुद्धा काय उपाययोजना करणे शक्य होईल याबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहनही बैठकीत केले.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष मा.नरहरी झिरवाळ,अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री मा. दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे ,आमदार हिरामण खोसकर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, दूरदृश्य प्रणालीद्वारे सहकार आयुक्त अनिल कवडे, नाबार्डचे जनरल मॅनेजर रश्मी दरक, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@Narhari_Zirwal@ChhaganCBhujbal@dadajibhuse