एकदा प्रेम पुस्तकांवर करून बघा, कारण तेच आपल्याला जीवनात उत्तम मार्गदर्शन करू शकतात आणि तेच आपल्याला आपली खरी ओळख करून देऊ शकतात. म्हणून म्हणतो पुस्तकांवर प्रेम करा, मग ही दुनिया तुमच्या प्रेमात पडल्या शिवाय राहणार नाही.
#पुस्तकप्रेमी#मराठी
अंधारातून प्रकाश मिळत नसल्यामुळे चक्क काटकोनातून वळवून घेत परिस्थितीवर मात केली आणि प्रकाश मिळवला.पाहताना ”विपुलाचि सृष्टी” म्हणणारे प्रा. श्री. अ. दाभोलकर , आम्रयोगी बाबुराव येणगे व वनस्पतीशास्र शिकवणारे सौताडेकर गुरूजी यांची प्रकर्षांने आठवण!
तीस वर्षात संपत्तीच्या निर्मितीचा वेग खूप वाढला परंतु त्यातून मोजकी सुखाची बेटे तयार झाली व या प्रक्रियेतून विषमता पराकोटीला जात आहे. असंतोषाचा सागर सुखासीन बेटांना धडका मारत आहे. विषमसंधी हा मानवतेचा शत्रू आहे. #एमएसस्वामीनाथन
९७ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! @mssrf