'राज्य राखीव पोलीस दला'च्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत एका खासगी क्लासने टेलिग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अनेक मुले जीवतोड मेहनत करीत असतात.आयुष्याची अनमोल वर्षे ही मुले परीक्षेच्या तयारीसाठी देतात. त्यामुळे या परीक्षा निष्पक्ष आणि संशयविरहित होणे आवश्यक आहे. परंतु जर असे प्रकार उघडकीस येत असतील तर परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील एक दोन प्रश्न मूळ परिक्षेत येणे समजू शकते पण तब्बल ८५ प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२००९०३
प्रति,
मा. मंगलप्रभात लोढा
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
महाराष्ट्र राज्य
विषय - आचारसंहितापूर्वी १४५७ पदापैकी उर्वरित ३९४ विद्यार्थ्यांना कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून (Subject to outcome of court result) नियुक्ती देण्याबाबत.
माननीय महोदय,
आपल्या अखत्यारीतील "शिल्प निर्देशक" (ITI Instructor) च्या १४५७ पदांसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली व नंतर जून २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेनंतर संपूर्ण कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन १४५७ पैकी १०६३ उमेदवारांना न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत व उर्वरित ३९४ उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या वेळेस काही उमेदवार न्यायालयात गेले असल्यामुळे हि भरती थांबली आहे.
"कोर्टाचा जो काही निर्णय भविष्यामध्ये येईल तो आम्हा उमेदवारांना मान्य असेल" या अटीवर या ३९४ उमेदवारांची न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर नियुक्त्या द्याव्यात हि या उमेदवारांची मागणी आहे.
आपणांस विनंती करण्यात येत आहे कि वरील मागणीचा विचार करून योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@MPLodha@mieknathshinde