.
13 मे 2023 गुहागर- विरार (गाडी नंबर MH -20 BL-1243) चे चालक एका हाता मध्ये स्टेरिंग आणि एका हाता मध्ये मोबाइल पकडुन खूप वेळा गाडी चालवीत होते.. सदर प्रकारामुळे एखादा अपघात होण्याची दाट शक्यता असते.. व नाहक लोकांचे बळी जाऊ शकतात. @msrtcofficial ने अशा चालक वाहक वर कारवाई करावी.
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.
आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.
बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.
तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.
लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !
आपला नम्र
राज ठाकरे
हा तमिळ तरुण बघा किती छान मराठी बोलतोय…❤️
मीरा भाईंदर मध्ये भाजप पुरस्कृत जो मारवाड्यांचा मोर्चा निघालेला त्याला उत्तर म्हणून आज मीरा भाईंदर मधील मराठी,महाराष्ट्राला मानणारे तरुण आज रस्त्यावर उतरले होते…
भारतीय जमवा जमव पार्टी ची कमाल आहे:
नाशिक मध्ये शिवसेना पदाधीकारायांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले.हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले…
क्लायमॅक्स असा की::
हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत!
जमवा जमव पार्टी ने महाराष्ट्राची वाट लावली आहे,
सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही!
@narendramodi@AmitShah@Dev_Fadnavis
मुंबईतून मराठी माणूस कमी होतोय असं म्हटलं जातंय, पण तसं होऊ नये यासाठी मुंबईतील पुनर्विकासात जास्तीत जास्त मराठी माणसाला संधी मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे ४०% मराठी माणसांना ही घरं मिळाली पाहिजेत, आणि ती घरं ७५० चौ. फुटाच्या आतली असावीत.
- अनिल परब, आमदार
@advanilparab
घाटकोपर
जर जैनगुजराती लोकांना मराठी माणसे मासे खातात म्हणून त्याची घाण वाटत असेल वास येत असेल तर मुंबई सोडून गुजरात मध्ये रहा ही अरेरावी इथे खपवून घेतली जाणार नाही
मनसे राष्ट्रवादी ubt शिवसेना सर्व पक्ष तसेच रस्त्यावरील सगळी मराठी माणूस माझ्या मागे उभा राहिला याबद्दल धन्यवाद🙏
इंडिगो एअरलाइन्स भाजपच्या दबावाखाली काम करत आहे... आता शेवटची संधी, 'भारतीय कामगार सेना' शिवसेना स्टाईलने इंडिगोच्या कर्मचार्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही.
मान्यता नसलेल्या नवीन युनियनसोबत करार कसा करू शकतात?
भारतीय जनता पार्टी धनाढ्यांच्या मागे ताठ उभी आणि सामान्य जनतेला साधे जगणे देखील नाकारणारी भ्रष्ट पार्टी!!!
- खासदार अरविंद सावंत
अध्यक्ष, भारतीय कामगार सेना @OfficeofBKS
#ArvindSawant #BharatiyaKamgarSena #ShivsenaUBT
@OfficeofUT@AUThackeray@ShivSenaUBT_