प्रिय सखी,
तुझ्या आज जाण्याने,
आयुष्यातल्या बऱ्याच पापांचं,
मी घेतलंय प्रायश्चित.
आजचा दिवस,
हा नाहीये शेवट,
आहे एक सुरुवात
नव्याने पुन्हा...
आशीर्वाद दे.
#मराठी
तुकाराम मुंढे यांच्यासारखा अधिकारी कितीही प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि धाडसी असला तरी त्याच्या पाठीशी उभे राहणे आपल्याला सहज शक्य नाही. 😷
कारण आपल्या लोकांच्या रक्तातच "खाबूगिरी" भिनली आहे!
२० लाखांची गाडी घेऊन ५० रुपयांचा टोल वाचवण्यासाठी धडपडणारे, ओळख दाखवणारे, आरडा ओरड करणारे आपण.
रस्ते खराब बनवले तरी आपल्या लाडक्या नेत्याने आणि कॉन्ट्रॅक्टर पाहुणा आहे, म्हणून मूग गिळून गप्प बसणारे आपणच.
१ कोटीचा फ्लॅट घेऊन सोसायटीचा ५०० रुपयांचा मेंटेनन्स वाढला तर आंदोलन करणारे आपण.
हॉटेलमध्ये ५००० रुपयांचे बिल देणारे, पण जीएसटी टाळण्यासाठी "कॅशमध्ये चालेल का?" विचारणारे आपण.
देवाला हजारो रुपयांचा हार वाहणारे, पण कर भरताना मात्र जीवावर येणारे आपण.
विकासावर, महागाईवर बढाया मारण्यात आणि आभाळ हेपलण्यात पुढे असणारे आपण, पण मतदानाच्या दिवशी दोन किलोमीटर जाऊन मतदान करायला कंटाळा करणारे ही आपणच.
सिग्नल तोडून वेळ वाचवणारे, फूटपाथ वर बाईक चालवणारे आणि अपघात झाला की प्रशासनाला दोष देणारे आपण.
रांगेत उभे राहण्याऐवजी ओळख वापरून पुढे जाणारे आपण.
स्वच्छतेवर भाषण करणारे, पण गाडीची काच उघडून कचरा रस्त्यावर फेकणारे किंवा पिचकारी टाकणारे आपणच.
स्वतःच्या मुलासाठी सर्वोत्तम शिक्षण हवे असते,
पण शाळेजवळील अतिक्रमण, गुटखा विक्री किंवा भेसळ याविरोधात आवाज उठवत नाही.
रुग्णालयात चांगले उपचार हवे असतात, पण अस्वच्छता, बनावट औषधांवर कारवाई करणाऱ्यांच्या मागे उभे राहत नाही.
सरकारी नोकरी पाहिजे पण दवाखाने नको म्हणणारे आपणच.
आपल्याला भ्रष्टाचार नको असतो,
पण आपले काम लवकर व्हावे म्हणून "काहीतरी सेटिंग" शोधत असतो. आणि त्या साठी टेबल खालून हरी पत्ती देणारे आणि काम झालं म्हणून गावभर करणारे आपणच.
आपल्याला भेसळ नको असते,
पण "स्वस्तात मस्त" मिळाले की गुणवत्ता विसरतो.
आपल्याला एखादी गोष्ट चुकीची होत आहे माहित असली तरी गप्प बसणारे आपण...
का तर आपलं काय जातंया! म्हणून परत ते आपल्याच वाट्याला येतं.
ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, विधानसभेतल्या सदस्यांना प्रश्न किंवा जाब विचारण्या ऐवजी, साहेब-साहेब म्हणून गोंडा घोळत मागे पळणारे आपणच!
आपल्याला प्रामाणिक अधिकारी हवा असतो,
पण तो नियम सर्वांसाठी सारखे लागू करू लागला की अस्वस्थ होतो.
ज्याने बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली तो वाईट...
ज्याने अतिक्रमण काढले तो कठोर.
ज्याने भेसळखोरांवर धाडी टाकल्या तो प्रसिद्धीखोर.
आणि ज्याने काहीच केले नाही तो "चांगला अधिकारी"!
हा आपल्या समाजाचा मोठा विरोधाभास आहे.
तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी म्हणजे आरशासारखे असतात. त्यांच्याकडे पाहिले की व्यवस्थेतील दोषांपेक्षा आपले दोष जास्त दिसू लागतात.
म्हणून अनेकांना ते खटकतात.
भेसळ फक्त दूध, तूप, तेल, मसाले किंवा औषधांमध्ये नाही.
भेसळ आपल्या विचारांमध्ये, वागण्यात आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदारीतही शिरली आहे.
समाज बदलायचा असेल तर फक्त मुंढे साहेबांची नाही, तर स्वतःचीही मानसिकता बदलावी लागेल. आणि प्रत्येक अधिकाऱ्याने पण त्यांच्यासारखं काम केलं पाहिजे, व त्या साठी लोकांना पुढाकार घ्यावा लागेल.
मुंढे साहेबांची २७ वी बदली होऊ नये म्हणून आवाज उठवण्यापेक्षा, आपल्या २७ वाईट सवयी बदलल्या तर समाज अधिक वेगाने बदलेल!
कारण देशाला तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहेच. पण त्याहून जास्त गरज आहे तुकाराम मुंढेंना साथ देणाऱ्या नागरिकांची!
जोपर्यंत प्रामाणिक अधिकारी एकटा लढतो आणि स्वार्थी लोक संघटित राहतात, तोपर्यंत बदल कठीण आहे. ज्या दिवशी सज्जन माणसे एकत्र येतील, त्या दिवशी व्यवस्था बदलायला वेळ लागणार नाही. 🙏
#तुकाराम #मुंढे #अन्न #भेसळ #cp
अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ?
खड्डे दाखवले… व्हिडिओ दाखवले… 29 दिवस 490किमी पायी सत्याग्रह केला GPS लोकेशनसह पुरावे दिले… तरीही नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच!
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग, पेन तालुका, निगड्या गावाजवळ… नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्यावर खड्डा पडतो. तीन महिने तसाच राहतो. दाखवल्यानंतर भरला जातो… पण कशाने? मातीने!
मग प्रश्न विचारायचा नाही का?
वेगाने धावणाऱ्या गाड्या, मिडियन कट, अचानक समोर आलेला खड्डा, सडन ब्रेक… आणि मागून येणारा ट्रक!
जर एखादा जीव गेला तर जबाबदार कोण?
टोल मात्र वेळेवर घेतला जातो… मग सुरक्षित रस्त्याची जबाबदारी कोणाची?
मी विरोधासाठी बोलत नाही… मी त्या आई-वडिलांसाठी बोलतोय, ज्यांचा मुलगा किंवा कुटुंबातील व्यक्ती उद्या या खड्ड्यामुळे घरी परत आली नाही तर?
आता तरी सांगा…
मी अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ?
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoahighway #reality #potholes #pen #chaitanyaushalaxmanpatil
"गोष्ट छोटी डोंगराएवढी" हा मराठी चित्रपट शेतकरी, दारिद्र्य, दुष्काळ आणि सरकारी दुर्लक्ष यावर आधारित असलेला सर्वात भावनिक चित्रपट मानला जातो.
मकरंद अनासपुरे आणि गिरीजा ओक यांचा संघर्षाचा प्रसंग आजही तितकाच जिव्हारी लागतो कारण तो भारतीय शेतकऱ्यांच्या निःशब्द वेदना उघड करतो, ज्या समाजाकडून अनेकदा दुर्लक्षित होतात.
मकरंद अनासपुरे यांनी साकारलेली भूमिका राग, हतबलता आणि सत्याने भरलेली आहे, जी हा प्रसंग मराठी सिनेमातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक बनवते.
"गोष्ट छोटी डोंगराएवढी" हा फक्त चित्रपट नसून खऱ्या भारताचे प्रतिबिंब आहे, जिथे शेतकरी आपले जीवन सतत अर्पण करत राहतात, पण त्यांचे दुःख जगापासून अदृश्य राहते.
हा चित्रपट ग्रामीण संघर्ष, मानवी भावना, शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळग्रस्त गावांतील कुटुंबांचे भावनिक ओझे अत्यंत संवेदनशीलतेने टिपतो. अनेक वर्षांनंतरही हा प्रसंग प्रेक्षकांच्या मनाला भिडतो कारण शेतकरी, राजकारण आणि दुर्लक्षित वास्तव याबद्दलचा त्याचा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे. सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण भारतीय सिनेमा आणि अर्थपूर्ण कथाकथन आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक खोल अनुभव ठरतो.
आचार्य अत्रे हे खूप ग्रेट वक्ते होते. हे आमची पीढी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. अत्रेंच्या काळी व्हिडीओग्राफी होणं हे तितकंसं सहज शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्या ऐन उमेदीच्या काळातली भाषणं काही पाहण्यात आलेली नाहीत.
अत्रेंच्या वक्तृत्वशैलीची विशेषणं मात्र ऐकून आहोत.
डॉ. दीपक पवार सरांच्या भाषणांना ऐकलं की सहज वाटून जातं... महाराष्ट्राला फार मोठ्या कालखंडानंतर एक ग्रेट वक्ता मिळाला आहे.
असं नाही की मधल्या काळात कुणी आले नाहीत किंवा झाले नाहीत. अनेक राजकीय नेतेही उत्कृष्ट वक्ते आहेत. पण, दीपक पवार सर वेगळे ठरतात. आणि त्याचं कारण एकमात्र आहे... ते म्हणजे..
स्वतःच्या राजकारणाविषयी, स्वतःच्या राजकारणाच्या विषयाबद्दल असलेली त्यांची इंटेलेक्चुअल हॉनेस्टी... बुद्धिवादी प्रामाणिकता त्यांना थेट ग्रेट वक्ता बनवते.
स्वतःच्या बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाविषयी प्रामाणिक राहणारे लोकच ग्रेट असतात.
#appriciationpost
@drdeepakpawar
सरांचे हे भाषण ऐका नक्की... मग कळून येईल तुम्हाला...
https://t.co/F1JAptahCy
@DGPMaharashtra@spsangli
Rajaramnagar, Islampur (Ishwarpur), Sangli
From past 2 weeks, DJs are being played above permitted level. Even now also it is being played. Causing nuicense to commen people. Please stop this noise pollution that may cause lethal damage to elders & ill
Eight reasons China made it
1) Flattened social hierarchies
2) Pushed gender equality
3) Never allowed the West any control
4) Pushed education & nutrition for all
5) Locked religion behind private doors
6) Set national S&T goals and achieved it
7) Played the West's game against the West itself
8) Kept the top corporates under the State's boot.
1, 2, 4 and 5 transformed the society.
5 further made society rational & progressive.
3 and 7 kept it sovereign.
6 prepared it for 21st century.
8 allowed for common prosperity & not naked loot.
Despite its authoritarianism and surveillance state character, it did a lot for the common Chinese citizen (bar a few groups like rural elderly etc.) and miraculously escaped the poverty trap.
Very difficult, though desirable, for many other nations to even copy bits and pieces of this playbook.
#China #Prosperity #Playbook
मुंबईसारख्या शहरांचा स्थानिक जन्मदर दिवसेंदिवस ढासळत आहे. त्याचबरोबर आधुनिक उपचारपद्धतीमुळे वाढलेले आयुर्मान लक्षात घेतले तर येत्या काळात मुंबईत स्थानिक पातळीवर तरुण कमी आणि म्हातारे जास्त असं चित्र तयार होणार आहे.
जपान, कोरियामध्ये हे आधीच घडत असल्याचं आपण या लेखमालेच्या आधीच्या भागांत बघितलं आहे. त्यामुळे मुंबई या अर्थाने टोकयो होणार हे आता अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे स्थलांतर ही जेवढी येणाऱ्या मजुरांची गरज आहे तेवढीच ती मुंबईसारख्या दीडहून कमी जन्मदर असणाऱ्या शहरांचीही गरज बनत चालली आहे!
बऱ्याचदा शहरात येणारे लोंढे हा प्रश्न प्रादेशिक अस्मितेच्या किंवा नेटीव्हीजमच्या भिंगातून पाहिला जातो. मात्र जे नेते लोक दिवसरात्र "लोंढे थांबवा, लोंढे थांबवा" म्हणून आपली राजकीय पोळी भाजत असतात त्यांच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायात स्थलांतरितांचे लोंढेच राबत असतात अशी ही मजेशीर वस्तुस्थिती आहे.
पूर्ण लेख:
https://t.co/LhhNBhBgbV
ये जीतू मुंडा हैं. इनके कंधे पर इनकी बहन कालरा मुंडा का कंकाल है.
दरअसल, जीतू की बहन कालरा की 2 महीने पहले मौत हो गई.
कालरा जीतू को बता गईं कि उनके बैंक खाते में 19,300 रुपए हैं, जिसे जीतू निकाल लें.
जीतू ओडिशा ग्रामीण बैंक पहुंचे. बैंक के कर्मचारियों न कहा- जिसका खाता है उसे लाओ या डेथ सर्टिफिकेट और कानूनी वारिस होने का प्रमाण दो.
सर्टिफिकेट बनवाना गरीब जीतू के लिए पहाड़ चढ़ने सा था, उन्होंने आसान रास्ता चुना.
जीतू ने बहन की कब्र खोदी, कंकाल को बोरी में भरा और कंधे पर कंकाल को लादकर बैंक पहुंच गए. इस दौरान जीतू 5 किलोमीटर ऐसे ही चलते रहे. रास्ते में जिसने भी ये देखा, वो स्तब्ध रह गया.
सोचिए.. अपने देश में ये है गरीबी का हाल, 19,300 रुपए के लिए लोग ऐसा खौफनाक कदम उठा रहे हैं.
फिर आएंगे न्यूज एंकर जो चिल्लाएंगे कि हम चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था हैं... सॉरी, अब तो छठवीं अर्थव्यवस्था हो गए हैं.
ये है असल भारत
If you read stories about Arthur Cotton, John Pennycuick, Proby Cautley and Robert Brereton, you realize many British Civil Servants and British employees, who were imposed on us by an oppressive colonial regime, cared more about Indians and India than many post independence democratic leaders and babus who are supposed to serve the Indian people.
Payal Nag.
Daughter of a daily-wage mason from Odisha.
Electrocuted at the age of eight. Lost all four limbs.
And then, found a bow.
Spotted through her paintings by coach Kuldeep Vedwan, the same man who shaped world champion Sheetal Devi.
Defeated her idol Sheetal Devi at the World Para Archery Series Final in Bangkok, April, 2026
Whenever I am feeling low or sorry for myself I will look at these images of Payal & Sheetal again & remind myself what the words: Courage, Resilience & Positive thinking, really mean.
These champions are not just my #MondayMotivation.
They will be a source of motivation Every. Single. Day
वावरात जायला सेपरेट वाट नसल तर, ऊसाला तोड आल्यावर ज्याच्या वावरातनं ऊस वाहतूक करायला लागत्या, त्याच्याबरोबर मापात चर्चा करून ऊस बाहेर काढणं हे स्ट्रेट ऑफ होर्मुज मधनं कंटेनर बाहेर काढण्यापेक्षा जास्त खडतर काम हाय त्याठिकाणी!
Microplastics are already inside us and they are affecting our health. Professor Ragusa explains where the real problem lies and why it's not just about plastic. Are you ready to find out what each of us needs to do to solve this problem?
For more details, follow the link.
मागील वर्षी मार्च महिन्यात मी पुन्हा मुंबईत शिफ्ट झालो.
बरोबर एक वर्ष झालं.
मुंबईत राहण्याचा खर्च इतर शहरांपेक्षा बराच जास्त आहे तरी जेवण/नाष्टा बऱ्यापैकी स्वस्त आहे.
आठवड्यातून एकदा सोसायटीमध्येच दुकान लावणाऱ्या अण्णाकडून इडली घेतो. आधी २५ रुपयाला एक प्लेट होती. पोट फुल्ल भरतं. आता ३० रुपये केली.
प्रचंड मेहनती माणूस आहे. सकाळी तीन वाजता उठतो.
इडलीसाठी लागणारी चटणी, मेदूवडा, इडली, डोसा सगळं सकाळी आठ वाजेपर्यंत तयार करतो.
सगळं सायकल वर टाकून ८-९ किलोमीटर दूर आमच्या सोसायटीत घेऊन येतो.
साधारण ९ वाजता तो दुकान लावतो. सायकल दामटत आल्याने प्रचंड घामाघून झालेला असला तरी सर्वांनाच उशीर झाल्याने अण्णावर कोणाही दया दाखवत नाही.
गावाला होतो तेव्हा माझी शाळा सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी असायची. कितीही नको म्हटलो तरी आई सकाळी उठून चहा बनवायची. चहात खारी किंवा चपाती बूडवून खायचो. शाळेत जायचो. मधल्या सुट्टीत शालेय पोषण आहार असायचा. मला आमच्या शाळेतला कढी-भात आणि मसालेभात खूप आवडायचा. त्यात कधीकधी सोंडे निघायचे. या पोषण आहारामुळे जरा जास्तच पोषण झालं.
मुंबईत आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवण्याला पालक प्राधान्य देतात.
मी सेमी इंग्रजीत शिकलो. गणिताची भिती वाटायची पण इंग्रजी आवडायचं. ग्रामीण भागात राहूनसुद्धा मुंबईत इंग्रजी माध्यमात शिकलेल्या पोरांसारखं कधीही I Didn't Played Cricket असं चुकीचं इंग्रजी बोललो नाही. इंग्रजीला चांगले शिक्षक लाभले, खूप मारायचे, त्याचा परिणाम.
मुंबईत बहुतांश मुलं इंग्रजी शाळेत शिकतात म्हणून पोषण आहाराचा संबंध नाही.
८-९ किमी सायकल चालवून मुंबईच्या उकाड्याने घामाघून झालेल्या अण्णाकडून इडली घेण्यासाठी मुलांचा रिकामा टिफीन घेऊन बायका आधीच वाट पाहत उभ्या असतात. 'क्या अण्णा, जल्दी उठनेका ना, बच्चो को स्कूल के लिये टाईम होता है' अशी बायकांची तक्रार बिचारा घाम पुसत आणि दुकान लावता लावता शांतपणे ऐकतो.
अण्णाच्या इडलीच्या दुकानाशेजारी दोन उत्तरप्रदेशीय भावांचा अंडी विकण्याचा व्यवसाय आहे. त्यातला एक भाऊ (भैय्या) अण्णाला दोन तास मदत करतो.
अण्णा आणि युपीचा भैय्या दोघंही परप्रांतीय असून व्यवसाय करताना पाहून आपण मराठी असून नुसतंच जॉबच्या मागं लागलोय याचं थोडा वेळ वाईट वाटतं. अधूनमधून ऑफीस मध्ये खटके उडाले की अण्णासारखं इडली विकू किंवा गावाला शेती करू असे विचार येतात. ते फार काळ टीकत नाहीत. विषेशतः पगार आल्यानंतर साधारण १० दिवस असले विचार अजितबातच येत नाही.
माझं घर आणि ऑफिस हे अंतर १ किलोमीटर आहे. त्यामुळे पायीच जातो. पण मुंबईतील आद्रतेमुळे प्रचंड घाम येतो. ऑफीसला पोहचल्यावर १० मिनिटं पंख्याखाली बसून मग बाऊल मध्ये इडली बारीक कुस्करायची. त्यात चटणी टाकून खायची. बूडवून खाल्यापेक्षा अशी मिक्स करुन खाल्ल्यावर अधिक चवदार लागते.
सुरुवातीला रोज खायचो पण नारळाच्या चटणीमुळे शुगर वाढण्याची शक्यता असल्याने आता कमी केलंय. तरी अण्णा रोज दिसतो, बायकांच्या, म्हाताऱ्या माणसांच्या आणि ऑफीसला जाणाऱ्या लोकांच्या गराड्यात.
कितीही गर्दी असो, कोणी कितीही चिडचीड केली तरी अण्णा अजिबात चिडत नाही. साधा माणूस. बिचारा पोट भरायला आलेला त्यामुळे शांतपणे सगळ्यांची चिडचीड ऐकून घेत कुणाला इडली, कुणाला मेदूवडा, कुणाला इडली-मेदूवडा मिक्स, कुणाला डोसा, कुणाला पार्सल, कुणाला खाण्यासाठी, कुणाला लाल चटणी कमी तर कुणाला हिरवी चटणी जास्त. एवढ्या गोंधळात तो दोन तास रोबोट सारखा हात चालवतो.
मी जेव्हा मुंबईत राहायला आलो तेव्हा मार्च महिना सुरु होता, म्हणजे उन्हाळा. त्यानंतर पावसाळा आला, हिवाळा आला आणि आता पुन्हा उन्हाळा. मार्च ते मार्च, अण्णाने एकही दिवस सुट्टी घेतली नाही. मला वर्षाला २१ हक्काच्या, ५२ रविवारच्या आणि सणांच्या १० पकडूया, अशा जवळपास ८० सुट्ट्या असतात तरी मला त्या कमी असल्यासारखं वाटतं. सोमवार ते रविवार यामध्ये देखील एक सुट्टी असावी असा विचार येत असतो.
मुंबईतला पाऊस गावासारखा नसतो. एकदा पडायला सुरुवात झाल्यावर थांबायचं नाव घेत नाही. १ किलोमीटर ऑफीस असून सुद्धा मी अनेकदा पावसाळ्यात कॅब करुन गेलोय कारण छत्री असली तरी आडवा-उभा पाऊस आणि वारं यामुळे कपडे भिजतातच.
या पावसाने देखील अण्णाला थांबवलं नाही. डोक्यात प्लास्टीकची पिशवी आणि रेनकोट घालून हा माणूस सायकल चालवत बरोब्बर ९ च्या आसपास सोसायटीत पोहचायचा. वर्षभर सुट्टी न घेता रोज या माणसाला मी सोसायटीत पाहीलंय पण काल आणि आज, दोन दिवस झाले अण्णा दिसला नाही.
काल जेव्हा दुकाण बंद दिसलं तेव्हा फार विचार केला नाही. वाटलं गावाला गेला असेल. आज सकाळी ऑफीसला निघालो तेव्हा कधीही बंद न दिसणारं दुकान पाहून, न रहावून अंडी विकणाऱ्या भैय्याला विचारलं, 'ये अण्णा क्यू नही आ रहा कलसे?, 'गॅस' असं एका शब्दात त्याने उत्तर दिलं. सध्याची परिस्थीती पाहता गॅसच संपला असेल हा विचार मी देखील केलेला पण इतका देशद्रोही विचार बरा नाही म्हणून तो मी माझ्यापुरताच मर्यादीत ठेवलेला.
गेल्या वर्षभरात ऊन, वारा, पाऊस आजारपण किंवा कोणत्याही वैयक्तिक कारणामुळे सुट्टी न घेतलेल्या अण्णाला त्याचं दुकान दोन दिवस झाले गॅस नसल्यामुळे बंद ठेवावं लागतंय. त्याच्याकडे होणारी गर्दी आणि जेवढं मटेरीअल तो घेऊन यायचा यावरून दिवसाला साधारण १५०० रुपये निव्वळ नफा तो कमावत असावा. म्हणजे महिन्याचे साधारण ४५ हजार. आता दोन दिवस झालेत. दुकान बंद आहे. आज गॅस मिळाला आणि उद्या दुकान सुरु केलं तरी त्याच्या कमाईतून न भरून निघणारे ३००० रुपये कमी झालेले असतील.
तुम्ही सामान्य माणूस असाल. मेहनत करुन खात असाल तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सुरु असलेल्या चुकीच्या गोष्टी लगेच लक्षात येतात. तुम्ही फार काही करु शकत नसला तरी दिवसभर त्या गोष्टीचं वाईट वाटत राहतं. आता मला त्या अण्णाबद्दल वाटतंय तसं.
२०२० ला जेव्हा लॉकडाउन लागला तेव्हा त्याचा फटका मला देखील बसलेला. मुंबईतल्या एका चांगल्या कॉलेजमधून डिग्री पूर्ण करुनही जवळपास एक वर्ष बेरोजगार राहावं लागलेलं. आयुष्यात कधीही शेती केलेली नव्हती, २०२० मध्ये संपूर्ण वर्ष शेतीत राबलो. आधी कोथींबीर, नंतर फ्लॉवर आणि कांद्याचं पीक घेतलेलं, कशालाच भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतीत लक्ष घालायची जास्त हिंमत होत नाही.
त्या अण्णाला संपलेला गॅस कधी मिळेल यांची शाश्वती नाही. उद्या? परवा? महिन्याने की वर्षाने? कोणीच सांगू शकणार नाही.
कोविडमुळे लागलेला लॉकडाऊन किती दिवस चालेल हेही कुणी सांगू शकलेलं नव्हतं.
पण कधीही मिळो. नुकसान झालेलं असेल. त्याचं झालेलं नुकसान सरकार भरून देईल का? माहिती नाही.
त्याचं झालेलं नुकसान सोशल मिडियावर गॅस टंचाई नाही, सगळं सुरळीत आहे अशा पेड पोस्ट करणारे भरून देतील का? माहिती नाही.
गॅस टंचाईवर एखाद्याने बोललं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करणारा पोलीस भरून देईल का? माहिती नाही.
त्यांनीही का द्यावं? त्यांचंही पोट आहे, त्यांचाही परिवार आहे, त्यांचाही व्यवसाय असेल, त्यांनाही झळ बसेलच. कोविडमध्ये बसली तशी, नोटाबंदीत बसली तशी.
१ वर्ष घरी बसावं लागल्याने कधीही नापास न झालेला मी, एक वर्ष आपोआप मागे आलो. ही पोस्ट वाचणाऱ्यांपैकी अनेकांसोबत हेच झालेलं असेल, तुमची काहीही चूक नसताना तुम्हाला घरात बसून राहावं लागलं असेल.
अण्णाचंही तेच झालंय. त्याचीही काहीही चूक नसताना त्याला भोगावं लागतंय, भोगावं लागणार आहे. माझीही काहीही चूक नव्हती तरी घरी असल्याने गील्ट यायचा, आजही येतो. समुद्रकिनारी एकटा शांत बसलो की आपल्या आयुष्यातील सगळी अपयशं, आपल्या आयुष्यात घडलेल्या चुकीच्या गोष्टी, लोकांनी आपल्याला फसवलेलं आणि आपल्यासारखी माणसं.. सगळं एकामागोमाग आठवायला सुरु होतं, आता समुद्रकिनारी बसलेलो असताना आठवलं तसं...
डॉ. श्रीराम लागूंच्या एका भाषणातील अगदी दोन मिनिटांचा हा अंश. आवर्जून ऐका. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय, यावर अगदी सोप्या शब्दात सांगितलंय. आजच्या महाराष्ट्राला या शब्दांची प्रचंड गरज आहे.
व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर
संतांचे पुकार, वांझ झाले II
रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग, तुडुंबला II
बँड वाजविती, सैंयापिया धून
गजांचे आसन, महंतासी II
आले खड्ग हाती, नाचती गोसावी
वाट या पुसावी, अध्यात्माची? II
कोणी एक उभा, एका पायावरी
कोणास पथारी, कंटकांची II
असे जपीतपी, प्रेक्षकांची आस
रुपयांची रास, पडे पुढे II
जटा कौपिनांची, क्रीडा साहे जळ
त्यात हो तुंबळ, भाविकांची II
क्रमांकात होता, गफलत काही
जुंपते लढाई, गोसाव्यांची II
साधू नाहतात, साधू जेवतात
साधू विष्ठतात, रस्त्यावरी II
येथे येती ट्रक, तूप साखरेचे
टँकर दुधाचे, रिक्त तेथे II
यांच्या लंगोटीला, झालर मोत्याची
चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी II
येथे शंभराला, लाभतो प्रवेश
तेथे लक्षाधीश, फक्त जातो II
अशी झाली सारी, कौतुकाची मात
गांजाची आयात, टनावारी II
तुका म्हणे ऐसे, मायेचे माइंद
त्यापाशी गोविंद, नाही नाही.
-कुसुमाग्रज