महाराष्ट्राला बेरोजगारीच्या खाईत लोटून
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जीवावर उठलेल्या असंवेदनशील सरकारने खालील बाबींची तात्काळ व गांभीर्याने दखल घ्यावी
👉 1.एमपीएससी कृषीसेवा जाहिरात 2024
गेल्या दोन वर्षापासून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
258 जागा 2024 जाहिरातीसाठी नियोजित असताना सुद्धा जाणूनबुजून त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या सरकारला हजारो कृषी पदवीधारक गेल्या दोन महिन्यापासून विनवण्या करत आहेत हे दिसत नाही काय?
मा.मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde सरकारने टोलवाटोलवी व खोटं आश्वासन देऊन त्यांचा खेळ मांडून ठेवला आहे.
@dhananjay_munde
11 दिवसावर परीक्षा आली तरी आपण
अजूनही गप्पच.मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?
तात्काळ या पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्यात यावा.
👉 2. MPSC & IBPS Exams Overlapping issue
मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
आपण परीक्षा वेळापत्रक जाहीर करताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का या मूलभूत गोष्टीची पडताळणी सुद्धा करत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे.
समाजकल्याण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने आपण परीक्षेची तारीख जाहीर केली.
IBPS RRB clerk परीक्षा 18 ऑगस्ट ला नियोजित असताना सुुद्धा आपण त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण परीक्षा कसे काय जाहीर करू शकतात?
मराठा आरक्षणासंदर्भात योग्य त्या बाबींची वेळीच तरतूद व पूर्तता आपण न केल्यामुळे आधीच तीन वेळेस postpone झालेली परीक्षा तारीख सुद्दा आपण 25 ऑगस्ट दिली.
25 ऑगस्ट ला IBPS Clerk exam
नियोजित आहे हे आपणास माहित नव्हते काय??????
👉 ज्या दिवशी आपण 18 ऑगस्ट व 25 ऑगस्ट या दोन तारखा जाहीर केल्या त्यादिवशी पासून हजारो उमेदवार आपल्याला वारंवार IBPS परीक्षा व MPSC परीक्षा overlap होत आहेत हे निदर्शनास आणून देत आहेत.
तरीही आपण त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहात.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
गोरगरीब विद्यार्थ्यांची ही पिळवणूक कशासाठी??????
केंद्राच्या परीक्षा नियोजित असताना जाणूनबुजून त्याच दिवशी MPSC च्या परीक्षा ठेवण्याचे षडयंत्र कुणाचे?
सरकारचे की मा.आयोगाचे??????
उमेदवारांचा परीक्षा देण्याचा अधिकार आपण कसे काय हिरावून घेत आहात???
👉 3.राज्यसेवा 2024 जाहिरात
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेसाठी महत्वाचे संवर्ग गायब करून आपण नेमकं काय साध्य करत आहात?
गेल्या 10 महिन्यापासून लाखो गोरगरीब विद्यार्थी आपल्याकडे सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांची मागणी करत आहेत.
आपण सर्व त्यावर मौन बाळगून आहात.
@ssaunik ma'am या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,मुख्याधिकारी ,पोलीस उपाधीक्षक होण्याचा अधिकार नाही काय?
उपजिल्हाधिकारी पदांसाठी सतत 7 महिने प्रयत्न केल्यानंतर फक्त 7 जागा ?
त्यातही OBC सह इतर काही category साठी चक्क ZERO ???
👉 4 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क 2024 जाहिरात व परीक्षा
जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये नियोजित असताना ऑगस्ट अर्धा संपला तरी जाहिरातीचा पत्ता नाही. 16 जुन ही परीक्षेची तारीख होती याचे कुणालाच भान नाही काय ?
कधीचा मुहूर्त शोधला आहे यासाठी ?????
👉 5. राज्यातील तरुण अस्वस्थ आहेत,प्रचंड मानसिक तणावात आहेत.रोज उठून शासन् दरबारी व # MPSC कडे विनवण्या,विनंती,आर्जव
करत आहेत.
आपण सर्वांनी झोपेचे सोंग घेतलं आहे.
परीक्षेची संधी न देणे व मिळाली तर ती हिरावून घेणे यातून सरकारला कोणता आदर्श घालून द्यायचा आहे?????
गेल्या 10 वर्षात याच धोरणामुळे चक्क एक पिढी बरबाद झाली आहे.
गेल्या 10 वर्षात कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला ???????
मा. @mieknathshinde साहेब
स्पर्धा परीक्षा उमेदवार "लाडके" नाहीत काय??
1.राज्यसेवा जाहिरात 2024
🔶 जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेतून महत्वाचे संवर्ग जाणूनबुजून वगळण्यात आले आहेत. आंदोलने करून 2 attempt मिळवले म्हणून ते वाया कसे जातील यावरच 2023 ला भर दिला व 2024 ला देखील पुनरावृत्ती होत आहे.
🔷 उपसंचालक ( आदिवासी विभाग) हा संवर्ग फक्त show piece म्हणून राज्यसेवेत आला आहे काय? गेल्या कित्येक वर्षात एकदाही हे जाहिरातीत दिसले नाही.2024 मध्ये तरी येणार का?
🔶 काँग्रेस सरकारने 10 वर्षांपूर्वी काढलेल्या जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी :-44 पदे
पोलीस उपाधीक्षक:- 40
तहसीलदार:-34
ना.तहसीलदार:- 227
सहा.गटविकास अधिकारी:-100
असे आकडे दिसायचे
🔶आता तब्बल एक दशकानंतर हे आकडे "शून्य शून्य" /ZERO/भोपळा का झाले????????????
यासोबतच
मुख्याधिकारी गट:- अ व ब
शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी इत्यादीसह सर्व महत्वाचे संवर्ग या जाहिरातीतून का गायब झाले ?????
🔶 @RVikhePatil साहेब लक्षात आहे ना काँग्रेस मध्ये असताना कसे दणक्यात जाहिरात यायच्या.
आपण महसूलमंत्री म्हणून राज्यसेवेत उमेदवारांच्या हाती आपल्या विभागाच्या प्रत्येक संवर्गाच्या "शून्य शून्य " जागा काढून "भोपळे" देत आहात तरी आमच्याकडून आपणास "महसूल दिनाच्या " तीन अंकी शुभेच्छा.
🔷1,50,000 पदभरतीचा गाजवाजा केला ना मग त्यातील फक्त 1% सामान्य राज्यसेवा ला द्यायला काय अडचण आहे???????????
सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा
2. संयुक्त अराजपत्रित गट-ब व क जाहिरात 2024
🔶 फेब्रुवारीत नियोजित असणारी जाहिरात 6 महिन्यानंतर देखील प्रसिद्ध करण्यास सरकार अपयशी ठरले आहे.
जाहिरात तर दूरच साधी परीक्षेची तारीख जाहीर होत नाहीये.
हेच का आपले अच्छे दिन???
🔷 काँग्रेस सरकार ज्याप्रमाणे
PSI :- 1869 पदे
STI :- 1090 पदे
असे दणक्यात जाहिरात प्रसिद्ध करत होते तसे आकडे या 2024 जाहिरातीत दिसणार आहेत काय??
तसेच इतर सर्व गट- ब व क संवर्गाची जास्तीत जास्त पदांची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत अशी सर्व उमेदवारांतर्फे विनंती करतो.
3. #MPSC कृषी जाहिरात 2024
🔶 दोन वर्षापासून ही जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे कृषी पदवीधर अत्यंत तणावात आहेत.
पूर्ण जुलै महिना हे विद्यार्थी सरकारकडे यासाठी विनंती,आर्जव करत आहेत.पण सरकारला बेरोजगारांचे काहीही देणंघेणं उरलेलं नाही.
258 जागांचे मागणीपत्रक पाठवण्यासाठी इतकी चालढकल व टोलवाटोलवी कशासाठी सुरु आहे???
🔶 पाठपुरावा केला असता अधिकारी वर्ग वेगळीच अडचण सांगतात, मंत्री महोदय उमेदवारांना वेगळंच बोलतात.
हे कमी की काय म्हणून
20 दिवसापूर्वी आपले आमदार Tweet करून सांगतात की,
' मुख्यमंत्री महोदय सकारात्मकआहेत,त्यांनी GAD ला तात्काळ मागणीपत्रक #MPSC कडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत "
एक महिन्यात खेळ मांडून ठेवला आहे कृषी पदवीधरांचा.
काय ठरवलं आहे नेमकं ह्यांचं????
तात्काळ याची स्पष्टता द्यावी.
विनाकारण त्यांना ताटकळत ठेवून
त्यांची दिशाभूल करणे बंद करावे.
24 दिवसावर परीक्षा आली आहे.
4. जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीसाठी कोणता मुहूर्त शोधला आहे?? सेवाप्रवेश नियम बदलण्याची कार्यवाही इतकी का लांबत आहे?
जाहिरातीची वाट बघणाऱ्या अभियंतांना या सर्व प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार आहेत?
5. @mybmc चे
कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता तसेच इतर पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्याचे निर्देश मा.मुख्यमंत्री महोदयांकडून देण्यात आले होते.अद्याप त्याची अंमलबजावणी व कार्यवाही का केली नाही हे एक कोडंच आहे.
#BMC व जलसंपदाच्या या पदभरती जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहेत??
की मुद्दाम असा उशीर करून आचारसंहिता सुरु होईपर्यत लांबवण्याचा plan सुरु आहे?
6. 🙏🙏🙏🙏
सरकार येतील् ,जातील
पक्ष फुटतील ,वेगवगेळ्या आघाडी ,युती होतील.
परंतु आपल्या गर्जा महाराष्ट्रातील या युवक - युवतींना न्याय कोण देणार??
त्यांच्या आयुष्यातील उमेदीची वर्ष
अक्षरशः वाया गेली आहेत व जात आहेत. आपण कसे भरून काढणार आहोत हे ???????
🔶मा.मुख्यमंत्री महोदय आपणास या सर्व उमेदवारांतर्फे नम्र विनंती करतो
"जरा यांच्याकडे पण लक्ष द्या "
त्यांना त्यांच्या हक्काचं जे आहे ते द्या.
नौकरीची संधी हा त्यांचा मूलभूत हक्क आहे याचा सरकारला विसर पडता कामा नये.
हा सर्व इतिहास आपल्याच नावावर लिहिला जाणार आहे.
धन्यवाद
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@ssaunik@AjitPawarSpeaks@dhananjay_munde@atullondhe@maha_governor@kharge@RahulGandhi@chennithala@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews @News18lokmat
@AbhiPawarBJP सर, आपल्या एक Tweet ची वाट पाहत आहेत सर्व कृषी पदवीधर, कृषी सेवा जागावाढ 2024 update काय आहे, पूर्व परीक्षेस महिनाभर राहिला आहे... तुम्हीच हा मुद्दा निकाली काढू शकता... आपणास हीच विनंती सर, काहीतरी कळवा लवकर
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
♦️ आरोग्य विभाग पदभरतीत ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत, अर्ज करण्यासाठीची वेबसाईट पूर्णपणे ठप्प पडली आहे. कित्येक उमेदवारांचे पेमेंट फेल झाले आहे, त्यात आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असल्याने हजारो उमेदवार अर्ज करण्यापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे @TanajiSawant4MH आरोग्यमंत्री मा. तानाजी सावंत साहेब अर्ज करण्यास किमान २-३ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी ही नम्र विनंती.🙏🙏
@MahaHealthIEC @mieknathshinde .
पुन्हा एकदा आमची भूमिका स्पष्ट करतोय,आम्हाला परीक्षा रद्द करायच्या नाही.पुढील उपाययोजना करेपर्यंत परीक्षा स्थगित कराव्या इतकीच मागणी आहे
१)परीक्षा फक्त TCS_ION केंद्रावर
२)4G&5G मोबाईल जॅमर बंधनकारक
३)हाय-टेक टोळ्यांसाठी SOP चे पालन
४)पेपरफुटी कायदा करण्याची प्रक्रिया सुरू करावी
पेपरफोडीचे इतके गुन्हे घडूनही प्रत्येक परीक्षा पुढे रेटून पूर्ण करण्यात येत आहे.घोटाळ्यात पकडल्या जाणाऱ्या आरोपींना दुसऱ्याच दिवशी जमीन कसा मिळतो?
महाराष्ट्रातील या नोकर भरती घोटाळ्यात कुठल्या मंत्र्याचा सहभाग आहे का?असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे
@Dev_Fadnavis@RRPSpeaks
#नगरपरिषद_भरती 2023 येणाऱ्या समस्या बाबतीत...
1. मा.मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केल्याप्रमाणे नगरपरिषद मध्ये जाहिराती आल्या परंतु स्वछता निरीक्षक गट क श्रेणी क मध्ये जागा निरंक आहेत. स्वछता निरीक्षक श्रेणी क #RTI नुसार 417 जागा रिक्त असून का जाहिरात दिले गेली नाही. कृपया यावर नगरविकास मंत्री यांनी लक्ष देण्याची गरज आहे.स्वछता निरीक्षक पदविका धारकर यांच्यावर अन्याय पण झाला आहे.. यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा ही विनंती.. 🙏
2.नगरपरिषद भरती २०२३ मध्ये फॉर्म भरताना
MSCIT, १० + पदवी ( ज्यांनी बारावी / डिप्लोमा केलेला नाही ), खेळाडूंना प्रमाणपत्र पडताळणी तारीख, असे विविध येणारे तांत्रिक अडथळे अजून पण येत आहेत ते लवकरात लवकर दूर करावे ही विनंती..🙏🙏
@CMOMaharashtra@rrspeaks@PratapAdsad_@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MahaDGIPR@TCS@mieknathshinde
@OFFICER_CLUB11@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@Dev_Fadnavis नगरपरिषद भरतीमध्ये आणि प्रस्तावित महानगरपालिका नोकर भरतीमध्येसुद्धा तलाठी भरतीप्रमाणे MSCIT certificate ची अट नसावी यासाठी सर तुम्ही प्रयत्न करावा जेणेकरून हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल अशी नम्र विनंती .🙏🙏
मा.@Dev_Fadnavis तुमच्याकडील रिपोर्ट एकदा जाहीर कराच.तुमच्या एका मंत्र्याचा OSD एका क्लासच्या फायद्यासाठी संपूर्ण महाज्योती खराब करत आहे. दोन दिवसापूर्वी काय झालं माहीत आहेना?तुमचीच लोक या क्लासला वाचवत आहेत.
@RRPSpeaks यांची मागणी लाखो विद्यार्थ्यांची आहे.
#हाचंद्रहाजयद्रथ
@OFFICER_CLUB11@CMOMaharashtra@Dev_Fadnavis केंद्रातील SSC प्रमाणे राज्यात MPSC च्या अखत्यारित "सरळसेवा भरती आयोग" स्थापन केला तर सर्व परीक्षा सुरळीत पार पडतील.खासगी कंपन्या परीक्षा घेण्याचे जे नियोजन करतात तेच नियोजन सरळसेवा आयोग करु शकेल.खासगी कंपन्यांना मोठं करण्यापेक्षा MPSC ची यंत्रणा अजून सक्षम करण्यावर भर द्यावा.