१) 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे करण्यात आलेली आहे, पण ती कोणत्या महिन्यात घेण्यात येईल, हे आयोगाने घोषित करावं आणि त्यावर आचारसंहितेचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी.
२) राज्यसेवेच्या याच जाहिरातीत कृषीच्या जागांचा समावेश करण्यात यावा, ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टता द्यावी.
३) #combine गट-ब आणि गट-क
जाहिरात अजून प्रकाशित झालेली नाही. ती कोणत्या दिवशी प्रकाशित करण्यात येईल आणि साधारणतः त्याचा कालावधी एका महिन्याच्या आतच असावा. मुख्यमंत्र्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली, तर लगेच हा आंदोलनाचा प्रश्न सुटेल.
एकीकडे शासनाच्या हजारो जागा रिक्त आहेत, दुसरीकडे आपल्या #लाडक्या सहकाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून नियमांना बाजूला सारून #कंत्राटी_भरती चा सपाटा लावला आहे…. जर जागा रिक्त आहेत तर combine ची जाहिरात का काढत नाहीत?
विद्यार्थ्यांची भूमिका रास्त आहे, मी विद्यार्थ्यांच्या भूमिकेसोबत आहे. शासनाने देखील विद्यार्थ्यांची भूमिका समजून घेत संवेदनशीलपणा दाखवावा…
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन #MPSC
पुण्यात MPSC च्या गलथान कारभाराच्या विरोधात शेकडो विद्यार्थ्यांसह काँग्रेसचा तरुण तुर्क चेहरा बळीराम डोळे न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करत आहे
सरकारने आंदोलनाची दखल घेऊन २५ तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलावी
#MPSC_आंदोलन@BaliramDoleyINC@mpsc_office
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो, एकवेळ उपाशी राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच, सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
अभ्यासात खंड पडू नये, प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
एका जागेसाठी आम्ही हजार-हजार जण स्पर्धेत असतानाही, असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही, तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिकपणे मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई-वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो. हे सरकारनेही #seriousness दाखवत समजून घ्यायला हवं.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावं.
आमच्या अत्यंत सोप्या आणि रास्त मागण्या आहेत, नका हो खेळू आमच्या आयुष्याशी...! आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही आमचा अंत न पाहता #serious होऊन नोटिफिकेशन काढावं !
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune |
महाराष्ट्रातील हजारो गोरगरीब #MPSC उमेदवार दोन दिवसापासून पुण्यात आंदोलनाला बसले आहेत.
पण @mieknathshinde सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही.महायुती सरकारने गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचा खेळखंडोबा तर केलाच वरून तमाशा बघत त्याचा आनंद लुटत आहेत
👉 सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणीना सांगणे आहे पूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे.
आंदोलनस्थळी बसलेल्या काही विद्यार्थी मित्रांसोबत आज दुपारी फोनवर संवाद झाला.
👉उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत दुपारीच बोललो.त्यांनी यासंदर्भात काम करण्याचे आश्वासन दिले.
तसेच मी पुणे पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून आंदोलनाला सहकार्य करण्यास सांगितले.पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले आहेच.
👉महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची टीम तुमच्यासोबत आंदोलनस्थळी पहिल्या मिनिटापासून आहे हे आपल्याला माहित आहेच.तुम्हाला न्याय मिळेपर्यंत ते सर्व तुमच्यासोबतच असतील.
झोपेचे सोंग घेतलेलं सरकार व #MPSC
यांना आपली दखल घ्यावीच लागेल.
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@BaliramDoleyINC
IBPS आणि MPSC मार्फत घेतली जाणारी राज्यसेवा परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत @mpsc_office ने यातून तोडगा काढावा
विद्यार्थ्याच्या न्यायाला पाझरा फुटू दया सरकारने अहंकार बाजूला ठेवून विद्यार्थी रक्षणाकडे पाहिलं पाहिजे
सरकारने हट्ट सोडावा आणि ह्यात लक्ष घालावे
@CMOMaharashtra#MPSC
शेतकरी असो, महिला असोत किंवा विद्यार्थी समाजातले सगळेच वर्ग आता ह्या सरकारच्या कारभारावर संतापले असून, त्यांच्या सहनशक्तीचा बांध फुटला आहे. आपल्या न्याय-हक्कांसाठी थेट रस्त्यावर उतरून लढत आहेत, ह्याचंच आणखी एक उदाहरण म्हणजे, पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थी आंदोलन, जे अहिल्या लायब्ररी, शास्त्री रोड ह्याठिकाणी रात्री ११.३० वाजेपासून सुरु आहे. कृषी सेवेच्या २५८ जागा राज्यसेवा पूर्व २०२४ परीक्षेमध्ये समाविष्ट करण्याची माफक अशी मागणी ते करत आहेत परंतु मिंधे-भाजप सरकार ह्याकडे दुर्लक्ष करत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून येत्या २५ ऑगस्ट रोजी राज्यसेवा परीक्षा घेण्यात येणार आहे, त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची देखील परीक्षा असणार आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. हा अन्याय दूर व्हावा यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक प्रयत्न केले, परंतू शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.
नाईलाजास्तव या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. खा.सौ. सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत आज या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.
@supriya_sule
महोदय,
हजारोच्या संख्येने जमलेले विद्यार्थी संविधानिक मार्गाने मागचे 24 तास झाले त्यांच्या न्यायासाठी झगडत आहेत. तुम्ही असले नोटिफिकेशन काढून मुलांच्या संयमाचा अंत पाहू नका. जर आंदोलनाने उद्रेक स्वरूप घेतलं तर त्याला सर्वस्वी @mpsc_office आयोग आणि @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा (राज्यसेवा परीक्षा) येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची परीक्षा होणार आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्याने दोन्ही परीक्षांसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. ही परीक्षा देणाऱ्यांमध्ये माझ्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील विद्यार्थांचाही समावेश आहे.
याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी विनंती करूनही ‘एमपीएससी’ने परीक्षा ठरलेल्या तारखेला होईल, अशी ताठर भूमिका घेतली आहे. विद्यार्थी दोन आठवड्यांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत; परंतु शासनाने याची दखल घेतली नाही ही खेदाची बाब आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग एकाच दिवशी दोन परीक्षा घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांच्या संधीची समानता नाकारत असून, गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिकूल परिस्थितीत दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हे अन्याय केल्यासारखे आहे. लोकसेवा आयोगाचे प्रशासन तुघलकी कारभार करून विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहे हे संतापजनक आहे.
‘एमपीएससी’ ची एकाधिकारशाही व ताठर भूमिका व शासनाचे दुर्लक्ष याविरोधात या विद्यार्थ्यांना पुण्यात आंदोलन करावे लागत आहे. परीक्षा तोंडावर आली असताना हे विद्यार्थी न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या तारखांना घेण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
@CMOMaharashtra@Devendra_Office@AjitPawarSpeaks
#MPSCExam #IBPSExam #ExamClash2024
#StudentStruggle #ExamDateConflict #PuneProtest #MPSC
पुण्यात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची देखील परीक्षा ठेवली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना यामुळे एका परिक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी विविध माध्यमांतून शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करीत आहेत. परंतु शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र कृषि सेवा गट अ, ब, आणि ब (कनिष्ठ) संवर्गासाठी दोन-तीन दिवसांत जाहिरात प्रकाशित करण्यात येऊन सदर पदांसाठी ऑक्टोबरमध्ये परिक्षा घेण्यासंदर्भातील ट्विट केले आहे. जर हि परिक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार असेल तर कृषी विभागाची पदे राज्यसेवा परीक्षेमध्ये समाविष्ट करून ऑक्टोबर मध्ये एकत्रित सर्वसामवेशक राज्यसेवा परिक्षा घेता येणे शक्य आहे, व तेच तांत्रिकदृष्ट्या योग्य राहील असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. असे केल्यास विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा योजनेचा संदर्भ घेतला तर त्यांचे हे म्हणणे बरोबर देखील आहे. तरी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की, या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून कृपया त्यांची दखल घ्यावी आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला योग्य ते निर्देश देऊन तातडीने त्यासंदर्भातील परिपत्रक जाहिर करावे. अशी मागणी केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@mpsc_office
MPSC कृषी व IBPS या विषयासंदर्भात उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची आज भेट घेतली. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करावा व IBPS परीक्षा देखील 25 ऑगस्ट रोजी होणार असल्याने त्या परीक्षेला मुकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्येतून मार्ग काढावा अशी मागणी त्यांच्याकडे केली. मा देवेंद्रजी यांनी तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला याबाबतची विनंती केली आहे. आयोग विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार लवकरच मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे. #MPSC
मा. @mieknathshinde साहेब
गेल्या 23 तासापासून हजारो उमेदवार
न्याय्य मागणी व परीक्षा देण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारला काहीच घेणंदेणं नाही काय????
मा. @mpsc_officeने एक tweet करून सांगितले meeting उद्या आयोजित केली आहे.
सगळ्यांनी मिळून खेळ मांडला व तमाशा बघत मजा लुटत् आहात काय????
मा. @Dev_Fadnavis आज तीन वाजता meeting आहे असे सांगितले होते ना आपण.
इतके षडयंत्र व राजकारण गोरगरीब बेरोजगार सोबत का करत आहात सर्वजण???
सरकारने यावर मा.आयोगास तात्काळ निर्देश द्यावेत व भूमिका जाहीर करण्यास सांगावे.
किती अंत बघणार आता????
असंवेदनशीलतेचा कळस झाला.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@NANA_PATOLE
केंद्र आणि राज्य सरकार युवकांचा विचार अजिबात करत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. MPSC आणि IBPS च्या परीक्षा पुन्हा एकदा एकाच दिवशी होणार आहेत, ज्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. २५ ऑगस्टला IBPS ने देशपातळीवरील परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही आपल्या दोन महत्त्वाच्या परीक्षा आयोजित केल्यात. दोन्ही परीक्षा देऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे.
राज्यातल्या राजवटीने विद्यार्थ्यांचा विचार करून राज्यसेवा आयोगाची परीक्षा तातडीने पुढे ढकलायला हवी.
मुळात वारंवार असं घडत असेल तर केंद्राशी योग्य संवाद आणि समन्वय हवा.
विद्यार्थ्यांबाबत असंवेदनशील राहून चालणार नाही, हे ह्या राजवटीला समजायला हवं!
निःस्वार्थीपणे अविरत कार्य करत
व कोणत्याही श्रेयवादात न अडकता
स्पर्धा परीक्षा उमेदवार व कामगारांच्या
मदतीला 24 तास धावून येणारा आमचा हक्काचा एकमेव माणूस
'बळीराम डोळे' सर
@BaliramDoleyINC
आम्ही तुमचे ऋण आयुष्यभर फेडू शकणार नाही