स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी परीक्षेतील भ्रष्टाचार, MPSC मधील असंख्य समस्यांसंदर्भात चालवलेली एक राज्यव्यापी चळवळ
|रजि.नं.:४२०/२०२२|
Cont.
सोलापूर-8087822219
#MPSC द्वारे सेवांतर्गत संवर्गांची संख्या ५३ वरून १५३ होणार
विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा. एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या ५३ वरून १५३. संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार.
📍 आज पुणे येथे संसदीय हिंदी राजभाषा समितीच्या तिसऱ्या उपसमितीची दुसऱ्या दिवसाची बैठक संपन्न झाली.
या बैठकीदरम्यान राजभाषा अधिनियमाच्या तरतुदीनुसार विविध केंद्रीय सरकारी कार्यालयांतील कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला. अधिकृत पत्रव्यवहार, प्रशासकीय नोंदी, अहवाल प्रणाली तसेच दैनंदिन कार्यालयीन कार्यप्रणालीमध्ये हिंदी भाषेचा वापर कितपत प्रभावीपणे होत आहे, याबाबत सविस्तर निरीक्षण करण्यात आले. राजभाषेच्या अंमलबजावणीस गती देणे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिंदीचा वापर वाढवणे आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रशासन अधिक सुलभ करणे यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी खालील कार्यालयांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला —
• केंद्रीय सरकार स्वास्थ्य योजना (सीजीएचएस), पुणे
• क्षेत्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण कार्यालय, पुणे
• प्रधान आयुक्त, केंद्रीय माल और सेवा कर, पुणे-I
• आयुक्त, केंद्रीय माल और सेवा कर, पुणे-II
• राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, क्षेत्रीय कार्यालय, पुणे
• राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, उप-क्षेत्रीय कार्यालय, कोल्हापूर
• केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड, क्षेत्रीय निदेशालय, पुणे
• यूनियन बैंक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय – पुणे मेट्रो
• केनरा बैंक, अंचल कार्यालय, पुणे
• बैंक ऑफ इंडिया, पुणे आंचलिक कार्यालय
• भारतीय लघु उद्योग विकास बैंक (सिडबी), पुणे शाखा कार्यालय
• भारतीय निर्यात-आयात बैंक, पुणे
राजभाषा हिंदीचा शासकीय कामकाजात अधिकाधिक वापर व्हावा, तसेच प्रशासन अधिक पारदर्शक, परिणामकारक आणि जनसामान्याभिमुख व्हावे, या दृष्टीने समिती सातत्याने प्रयत्नशील आहे.
#हिंदिराजभाषा #hindirajbhasha #committee
दिल्लीत झालेली AI इंडिया समिट सध्या वादात आहे.
AI इंडिया समिट मध्ये #गलगोटिया युनिव्हर्सिटीने सादर केलेला AI रोबोटिक डॉग #चीन मध्ये निर्मित असल्याचे समोर आल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. आयोजनकर्ते यासाठी जबाबदार असले तरी यामुळे जगभरात भारताला मान खाली घालावी लागत आहे.
📌 प्लॅटफॉर्म कामगार आणि…
सामाजिक सुरक्षा: राज्याची भूमिका (संक्षिप्त रूप)
🛑 राष्ट्रीय स्तरावरील अकार्यक्षमता
• केंद्र सरकारकडून प्लॅटफॉर्म कामगारांच्या हक्कांसाठी ठोस पावले उचलण्यात अपयश. • सामाजिक सुरक्षा योजना अस्तित्वात असल्या तरी कामगारांसाठी सहज उपलब्ध नाहीत.
• ई-श्रम पोर्टलचे अपयश:
नोंदणी असूनही हक्क मिळत नाहीत, पात्रता वेगळी लागते !
📌 सामाजिक सुरक्षेचे 9 प्रमुख प्रकार
1.वैद्यकीय सेवा
2.आजारपणाचा भत्ता
3.मातृत्व भत्ता
4.अपंगत्व भत्ता
5.वृद्धापकाळ भत्ता
6.वारसांना भत्ता
7.अपघातग्रस्त कामगार भत्ता
8.बेरोजगारी भत्ता
9.कुटुंब भत्ता
📝 6 संबंधित सामाजिक सुरक्षा योजना
1.राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS)
2.राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना (NSAP)
3.विणकर आरोग्य विमा योजना
4.प्रधानमंत्री किसान मानधन योजना
5.राष्ट्रीय सफाई कर्मचारी विकास महामंडळ (NSKFDC)
6.मॅन्युअल स्कॅव्हेंजर पुनर्वसन योजना !
🔚 निष्कर्ष
• राज्यस्तरावर सकारात्मक बदल शक्य. • केंद्राचा निष्काळजीपणा भरून काढण्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा.
• प्लॅटफॉर्म कामगारांना सामाजिक सुरक्षा, न्याय्य व्यवहार आणि पारदर्शी तंत्रज्ञान यांचा हक्क असावा. • कायद्याने प्लॅटफॉर्म कंपन्यांना जबाबदार ठरवणे आवश्यक आहे.
@GIPSWU_@TGPWU@AiwuInd
यात खूप मोठ मोठे मासे आहेत. हे असले प्रकरण काही काळच शिजत राहते नंतर बरोबर मोठ मोठे मासे जे मंत्रालयात बसले आहेत ते हे प्रकरण मिटवतात. @Dev_Fadnavis साहेब गृहमंत्री झाल्यापासून पेपर फुटीचे मागच्या काळात 48 गुन्हे नोंद झाले होते म्हणजे प्रत्येक पेपरला किमान एक गुन्हा. प्रत्येक पेपर मध्ये घोळ हा झालाच होता आणि आता ही गृहमंत्री झाल्यापासून एकही सरळसेवेचा पेपर व्यवस्थित झाला नाही. खूप बोगस कामे झाली आहेत आणि जे गुन्हे नोंद झाले त्याची एकदा परिस्थिती बघा गृहमंत्री साहेब. आपण किती खराब गृहमंत्री आहात हे आपल्या लक्षात येईल. जे आरोपी पकडले तेवढाच तपास झाला आहे त्याच्यावर थोडीही प्रगती झाली नाहीये. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असताना बोगसगिरी करण्यासाठी हे सरकारच खत पाणी घालत आहे.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक मध्ये 700 पदांसाठी भरती झाली जवळपास 90% जागा ह्या बोगस भरल्या गेल्या हे सर्वांना माहिती आहे पण तपास कोणाच करणार नाही का तर बँक सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात आहे आणि त्यांनीच घोळ केला आहे. ही परिस्थिती आहे महाराष्ट्राची सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहेत पण कोणीच काहीच करत नाही. सर्व जण विकलेले आहेत पोलीस पासून ते मंत्रालय पर्यंत त्यामुळे इथे फक्त जीव जातो तो रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक मुलांचा. ज्यांचा बाप तिकडे दुसऱ्याच्या शेतात राबतो की माझा मुलगा सरकारी नोकरीस लागेल पण इथे सर्व पदे विकली जातात हे त्या बापाला माहितच नाही. ही सत्य परिस्थिती आहे.
आपल्याला एकदम निष्क्रिय गृहमंत्री लाभलेला आहे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Devendra_Office@PrakashGade13@RRPSpeaks@ssaunik@DGPMaharashtra@NANDURBARPOLICE@NANA_PATOLE@INCHarshsapkal@AUThackeray@rautsanjay61@Awhadspeaks@satejp@supriya_sule@Dhananjay4INC@TCS@Mars_TCSiON@satyajeettambe@waglenikhil@anjali_damania
बोगस दिव्यांग, बोगस खेळाडू, बोगस हिवताप फवारणी वाले, बोगस पैसे देऊन लागलेले मुले या सर्वांची प्रामाणिक चौकशी केली तर किमान अर्धे शासकीय कर्मचारी कमी होतील अशी परिस्थिती आहे सध्या आपल्या राज्यात. बीड, बुलढाणा अश्या बऱ्याच जिल्ह्यात बोगस प्रमाणपत्र दिले जाते. याबाबत सर्वांना कल्पना आहे पण कारवाई कोणीच करत नाही. चौकशी करणारे पण हेच आणि घोटाळे करणारे पण हेच. काही प्रामाणिक अधिकारी प्रामाणिक पणे चौकशी करतात पण त्यांची लगेच बदली करून त्यांना साईड पोस्टिंग दिली जाते.
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात आम्ही 3 मोठे पेपर फुटीचे प्रकरण बाहेर काढले होते. यात IPS भाग्यश्री नवटके मॅडम यांनी खूप चांगला तपास करून शेवटच्या आरोपी पर्यंत त्या गेल्या. नंतर सरकार बदले आणि त्यांना साईड पोस्टिंग दिली गेली ते अजून तिकडेच आहेत. असे बरेच उदाहरणे आहेत. सध्याचे सरकार बोगसगिरी करणाऱ्यांना वाचवत आहे. तपास कसलाच होत नाही.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@RRPSpeaks@AUThackeray@satejp@INCHarshsapkal
महाराष्ट्रातील मोठा नोकरभरती #घोटाळा#फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात मोठा नोकर भरती घोटाळा सुरू आहे. एक ही सरळसेवा परीक्षा घोटाळे झाल्या शिवाय पूर्ण झाली नाहीये. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. प्रत्येक परीक्षांमध्ये घोटाळा होऊन गुन्हे पण दाखल होतात पण नंतर गृहमंत्रालय कुचकामी ठरते पोलीस तपासच करत नाही. मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळात कबूल केले होते 48 FIR झाल्या आहेत पण पुढे त्याच्या तपासाचे काय? कसलाच तपास झाला नाहीये. तेच आरोपी परत परत पेपर फोडत आहे. त्यांना माहीत आहे राज्याचे सध्याचे गृहमंत्री खूपच निष्क्रिय आहेत त्यामुळे ते कितीही गुन्हे झाले तरी बिनधास्त पेपर फोडत आहेत.
उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी आम्ही 3 मोठे घोटाळे बाहेर काढले होते पण त्यावेळी तपास मुळापर्यंत जाऊन शेवटपर्यंत आरोपी पकडले होते. तसा आता पाहण्यास येतच नाही का तर फक्त निष्क्रिय गृहमंत्री. तुमच्या या निष्क्रियेते मुळे हजारो प्रामाणिक मुलांच्या आयुष्याचे वाटोळे होत आहे. किमान परीक्षा तरी MPSC कडे द्या एवढे तरी उपकार करा आमच्यावर.
@Dev_Fadnavis@AUThackeray@Awhadspeaks@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@INCHarshsapkal@PatilKailasB@ShivSenaUBT_@Prksh_Ambedkar@rajushetti@RealBacchuKadu@supriya_sule@Awhadspeaks@satejp@degree_holders@AjitPawarSpeaks@rautsanjay61
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis साहेब 2014 पासून मधला काही काळ सोडला त्यानंतर आता पर्यंत आपण मुख्यमंत्री आहात. आपल्याला सरळसेवा ची एक सुद्धा परीक्षा पारदर्शक घेता आली नाहीये. महापरिक्षा पोर्टल पासून ते आता tcs ibps पर्यंत सर्व घोटाळे बाज कंपन्यांना काम भेटले आहे.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचे खरे वाटोळे 2014 पासून सुरू झाले हे सर्वांना माहीत आहे. याला सरकारचे खत पाणी नक्कीच आहे त्याशिवाय चौकशी होत नाही. जिथे गुन्हे नोंद झाले आहेत तिथे पुढचा तपास होत नाही. आपण विधिमंडळ मध्ये सांगितले होते आमच्या काळात पेपर फुटीचे 48 गुन्हे नोंद आहेत त्या गुन्ह्याचा तपास कुठ पर्यंत आला याची चौकशी करा तुम्हाला कळेल तुमचा विभाग कस काम करतोय. जे आरोपी आम्ही पकडुन दिले किंवा सापडले त्यापुढे कोणताच आरोपी नवीन पकडला नाहीये. झीरो तपास झालेला आहे बघा जरा तुम्ही यात तुम्ही पण सहभागी आहेत अशी शंका आता विद्यार्थ्यांना येत आहे. एक निष्क्रिय गृहमंत्री महाराष्ट्रास लाभलेला आहे अशी चर्चा सध्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सुरू आहे. तुम्हाला झेपत नसेल तर गृहमंत्री पद सोडा ही नम्र विनंती.
यावर बघा विचार करा घोटाळा झालेला आहे हे सर्वांना माहीत आहे काही करता आले तर बघा लाजत गाजत यावर SIT बसवा मुख्यमंत्री साहेब.
@CMOMaharashtra@DGPMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@BJP4India@RRPSpeaks@INCHarshsapkal@AUThackeray@abpmajhatv@LoksattaLive@GondaneDevesh
मा. मंत्री महोदय, अनेक वर्षांपासून ST महामंडळात मेगाभरती झालेली नाही. राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थी #बेरोजगार असून, महामंडळाच्या नोकर भरतीची वाट बघत आहेत.
आपल्या कार्यकाळात #MPSC किंवा TCS/IBPS मार्फत मेगाभरतीच्या जाहिराती काढून पारदर्शक नोकरभरती राबविण्यात यावी. तांत्रिक तसेच अतांत्रिक संवर्गातील सर्व पदे तत्काळ भरण्यात यावीत ही नम्र विनंती.
@msrtcofficial@mieknathshinde@DrSEShinde .
अमेरिकेच्या दबावाला झुगारून पाकिस्तानचे दोन तुकडे करत जगाचा भूगोलच बदलून टाकणाऱ्या माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांची आज देशाला प्रखरतेने आठवण येत आहे!
भारतीय कामगार सेनेच्या पॅनलने
विरोधी पॅनलचा धुवा उडवत ११ पैकी १० जागी विजय संपादन केला !
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक विहार निवडणुकीत भारतीय कामगार सेनेच्या पॅनलने शिवसेना उपनेते,भारतीय कामगार कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ रघुनाथजी कुचिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बाळासाहेब आंत्रे, शिवाजी उत्तेकर, अशोक रानवडे, सुमित ढोरे सौ वंदना वाघमारे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
अध्यक्ष पदी श्री.मनोहर राजपूत, चिटणीस पदी श्री.सोमनाथ कंधारे,उपाध्यक्षपदी प्रशांत पाटील, खजिनदारपदी प्रवीण भिलारे
सहचिटनीसपदी किर्ती धर्माधिकारी व्यवस्थापन मंडळ संचालकपदी विक्रांत गोगावले ,पूजा करोते,राहुल बोकसे,दिनेश वाल्मिकी,अमरजीत सोनवणे हे निवडून आले . @ShivSenaUBT_@OfficeofUT@AUThackeray@OfficeofBKS@rautsanjay61@AGSawant@advanilparab@SaamanaOnline@saamTVnews@SakalMediaNews