तुम्ही सध्याच्या काळात सोशल मीडियावर दीपक कलाल आणि पुनीत सुपरस्टारसारखेCringe कंटेंट बनवणारे कलाकार पाहिले असतील. ते कसे मोठ्या-मोठ्या सेलिब्रिटी आणि नेत्यांवर टीका करतात अन् त्यांना मीडियामध्ये खूप जास्त कव्हरेज मिळते; पण ज्यांच्यावर टीका केली जाते, ते मोठे नेते आणि सेलिब्रिटी त्यांना कधीच उत्तर देत नाहीत.
तसेच हे 'कोचिंग माफिया' आहेत, ज्यांचे स्वतःचे UPSC चे अटेम्प्ट्स संपले आहेत आणि ज्यांना ऑब्जेक्टिव्हची भीती वाटते. कारण त्यांनी क्लासेस सुरू केले आहेत आणि ते क्लासेस चालले पाहिजेत. म्हणूनच, हे क्रींज कंटेंट क्रिएटर्ससारखे ९९ टक्के ऑब्जेक्टिव्हची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध कट-कारस्थानं आणि प्लॅनिंग रचतात. पण जसे मोठे सेलिब्रिटी क्रींज कंटेंट क्रिएटर्सना इग्नोर करतात, तसेच आपण सर्वांनी देखील या कोचिंग माफियांना पूर्णपणे इग्नोर केले पाहिजे.
@yogsara@santoshtidke23@Dhananjay4INC@Nikhil_A_Patil
MPSC राज्यसेवा परीक्षा २०२७ पासून Objective (MCQ) पॅटर्न ने घेण्यात यावी,अशी बहुसंख्य MPSC विद्यार्थ्यांची भावना आहे.आदरणीय मुख्यमंत्री महोदय आपण देखील याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.याबाबत लवकरात लवकर निर्णय जाहीर करून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
ग्रामीण, गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना न्याय देणारा, गुणवत्तेला प्राधान्य देणारा आणि पारदर्शक भरती प्रक्रियेला गती देणारा वस्तुनिष्ठ परीक्षा पॅटर्न लागू करून आपण या विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करावी.
@CMOMaharashtra@GaneshgSpeaks@Nikhil_A_Patil@GaneshgSpeaks@Dev_Fadnavis@MeshramDayanand
पोस्टर पायदळी तुडवून विचारधारा संपत नसते आणि विद्यार्थ्यांची मागणीही दबत नसते!
आमचा विरोध व्यक्तीला नाही, तर विद्यार्थ्यांच्या मागणीला कमी लेखणाऱ्या मानसिकतेला आहे. वस्तुनिष्ठ पद्धतीच्या मागणीला मुद्द्यांनी उत्तर द्या; पोस्टर तुडवून आणि त्याची खिल्ली उडवून नाही
MPSC मध्ये नायब तहसीलदार सारख्या Class-२ पदासाठी,ज्या पदावर एक तलाठी पदोन्नतीने देखील पोहोचू शकतो ,अशा रँकसाठी UPSC (IAS आणि IPS) ला असणारा अभ्यासक्रम जसाच्या तसा (As it is) कॉपी करणे अत्यंत चुकीचे आहे.
UPSC मध्ये MPSC च्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढवावा म्हणून MPSC मध्ये UPSC चा अभ्यासक्रम आणावा, हा जो तर्क दिला गेला होता, तो आपल्या संघराज्य पद्धतीला (Federal System) धक्का देणारा आहे. महाराष्ट्र राज्य हे संविधानाने निर्माण केलेले राज्य आहे आणि आपण संघराज्य संरचनेचे जतन केलेच पाहिजे.
राहिला प्रश्न UPSC मध्ये महाराष्ट्रीयन लोकांचा टक्का वाढवण्याचा, तर त्यासाठी 'SIAC' सारख्या संस्था आहेत. MPSC ही एक घटनात्मक संस्था (Constitutional Body) आहे, तिचे काम राज्यासाठी परीक्षा घेणे हे आहे; UPSC मध्ये महाराष्ट्रीयन टक्का वाढतोय की नाही हे पाहणे MPSC चे काम नाही.
आणि २०२५ च्या मुख्य परीक्षेत आलेले Straight forward प्रश्न पाहिले, तर हे जाणवते की प्रश्नांचा दर्जा हा F.Y.B.A. ला विचारल्या जाणाऱ्या पातळीचा होता. अशी तयारी करून कोणताही विद्यार्थी UPSC पास करू शकणार नाही.
राज्यसेवा परीक्षा ही वस्तुनिष्ठ (Objective) च झाली पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रात मराठी माणसाचा टक्का वाढेल!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Nikhil_A_Patil@BaliramDoleyINC@GaneshgSpeaks@Dhananjay4INC@dhananjay_munde@NiteshNRane
अरे, ज्या कोचिंग माफियाने स्वतःचं करिअर घडवण्यासाठी टेलिग्रामवर दिवस-रात्र एक केले...
आपले सुमार दर्जाचे कोर्सेस टेलिग्रामवर विकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली...
ज्याच टेलिग्रामवर "माझ्या नोट्समधून १०० पैकी १०१ प्रश्न आले!" असल्या खोट्या वल्गना केल्या...
आज तोच माणूस या भोळ्या विद्यार्थ्यांना कोर्सेस विकून ऐश-आरामात जगतोय!
आणि विशेष म्हणजे... आज तोच टेलिग्रामला "झुंडशाही" म्हणतोय!
ज्या Group Bआणि Group C च्या पोरांना महागडे आणि टुकार कोर्सेस विकले, आज तोच म्हणतोय की, "या पोरांची इच्छा CLASS-१ व्हायची आहे, म्हणूनच यांना ऑब्जेक्टिव्ह परीक्षा हवी आहे!" काय तर्क लावलाय!
आणि आता तर स्वतःचे टेलिग्राम फॉलोअर्स कमी झाले म्हणून हे महाशय रडत बसलेत!
@GaneshgSpeaks@yogsara@BaliramDoleyINC@Dhananjay4INC
महाराष्ट्रातील विद्यार्थी PSI/STI खालच्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करायचे. राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची असल्यामुळे ती परीक्षा पूर्ण व्हायला २ ते ३ वर्षे लागायची. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षक मिळायचे नाहीत, तर थेट कर्नाटक राज्यातील विद्यापीठांतून पेपर तपासून घ्यावे लागायचे.
परंतु ही अनियमित परीक्षा पद्धत मोडून काढून राज्यसेवा, इंजिनिअरिंग, एफएसओ (FSO) यांसारख्या सर्व परीक्षा एमपीएससी (MPSC) अंतर्गत अत्यंत पारदर्शक, सोप्या आणि सुरळीत बनवण्यामागे कोणाचे सर्वात मोठे योगदान असेल, तर ते तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांचे होते. त्यांनी श्री सुधीर ठाकरे साहेबांना एमपीएससीचे अध्यक्ष बनवले आणि असा एक पॅटर्न आणायला सांगितला ज्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवणारी (Student-Focused) परीक्षा पद्धत येईल.
त्यानंतर २०१२ पासून वस्तुनिष्ठ (Objective/MCQ) पॅटर्न आला आणि २०२४ पर्यंत तो एकदम सुरळीतपणे कार्यरत राहिला.
आमची मागणी आहे की: २०२५ आणि २०२६ च्या घोळानंतर २०२७ पासून Objective पॅटर्न पुन्हा आलाच पाहिजे.
@prithvrj@BaliramDoleyINC@Dhananjay4INC@Nikhil_A_Patil@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
काय #राधासमिती आणि तिचा भोंगळ कारभार!
समितीने सल्ला कोणाचा घ्यावा? अनुभवी IAS अधिकाऱ्यांचा? छे! एका Coaching Mafia चा!
ज्या #Descriptive परीक्षेवर त्याच्या Class ची कोट्यवधींची उलाढाल चालते, त्याच परीक्षेच्या सुधारणांचा सल्लाही त्याचाच! धंदाही आपलाच, सल्लाही आपलाच!
#MPSC
📌Descriptive पॅटर्नचे पेपर फोडणे किती सोपे आहे आणि हा पॅटर्न पेपर फोडणाऱ्यांसाठी कसा सोयीचा ठरू शकतो, याबद्दल दोन शब्द ----
🔸 Descriptive पॅटर्न मधील निबंधाचा पेपर तुम्ही पाहिलाच असेल...त्यात किती निबंध लिहायचे असतात हो..?
अर्थात केवळ दोन निबंध... आता मला सांगा हे निबंधाचे 2 विषय कोणते हे फोडणे किती सोपे आहे...कोणाला शंका सुद्धा येणार नाही, पण ज्यांनी पेपर फोडला त्याला हे विषय आधीच माहिती होतील....ज्याला माहिती होतील तो हे 2 निबंध आधीच तयार करून पाठ करूनच जाईल ना...? बाकीच्या प्रामाणिक विद्यार्थ्यांनी बसायचे बोंबलत...!
🔸 हीच गोष्ट आहे इतर GS पेपर बाबतीत... कोणत्याही GS पेपर मध्ये Compulsory असे 20 प्रश्न असतात, हे 20 प्रश्न फोडून बाहेर पोहोचवणे किती सोपे आहे...? ज्याला हे 20 प्रश्न पेपरच्या आधीच मिळाले असतील, त्याला त्याची Model उत्तरे देखील आधीच तयार करून ठेवता येतील...आजचा जमाना Chat GPT चा आहे, ज्याला प्रश्न आधीच मिळाले असतील त्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी Perfect बनवता येऊ शकते... एकदा हे उत्तर बनले की पाठ करायचे आणि पेपरच्या दिवशी छापून यायचे... किती साधे सोपे गणित आहे...
Objective परीक्षेत पेपर फुटले हे किमान माहीत झाले आणि सिद्ध देखील करता आले, पण Descriptive मध्ये हे अशक्यच आहे...
🔸पुढचा मुद्दा म्हणजे पेपर चेकिंगच्या वेळी थेट परीक्षकच Manage करणे...आजकाल आयोगातील सर्व बातम्या बाहेर जातात, त्यामुळे पेपर चेकिंग ला कोणाकडे जातील हेही बाहेर जाऊच शकते...त्यामुळे जो कोणी चेक करणारा असेल त्याला परस्पर सांगून जास्तीचे मार्क्स पदरात पाडून घेण्यासाठी देखील एक नवीन टोळी तयार होऊ शकते...किंबहुना 2012 पूर्वी जेंव्हा Descriptive पॅटर्न होता, तेंव्हा असेच पेपर चेकिंग Manage झाल्याचे ऐकण्यात आले होते...म्हणूनच तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी Objective पॅटर्न आणला होता...
एकूणच पेपर फोडणाऱ्या टोळीसाठी Descriptive पॅटर्न म्हणजे भ्रष्टाचाराचे हिरवे कुरण आहे...यात पेपर फोडण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग आहेत आणि विशेष म्हणजे Without Trace हे सगळे घडवून आणले जाऊ शकते...
👉🏻म्हणूनच महाराष्ट्रातील 90% पेक्षा जास्त MPSC विद्यार्थी हे Objective ची मागणी करत आहेत🙏🏻
@BaliramDoleyINC@Dhananjay4INC@CMOMaharashtra@Nikhil_A_Patil@Dev_Fadnavis
📊 MPSC परीक्षांसाठी कोणता पॅटर्न हवा?
२०२७ पासून सर्व MPSC परीक्षांसाठी तुमच्या मते कोणता परीक्षा पॅटर्न लागू करावा?
तांत्रिक संवर्गासाठी #Objective पॅटर्न लागू करताना वेळेची अट नव्हती, मग इतर संवर्गांसाठीच वेळेचा आग्रह का?
विद्यार्थ्यांचा कौल काय? मतदान करून आपले मत नोंदवा! 👇
न्याय हक्कासाठी पेटलेल्या या वादळात आता माघार नाही आणि तडजोड तर नाहीच नाही गड्यांनो.वाटेल त्या परिणामांना समोर जाऊ परंतु अन्यायी पॅटर्न लादून घ्यायचा नाही आता.सर्वकष लढाई साठी तयार राहूया कोणत्याही दबावाला भीक न घालता आपल्या हक्काचा objective 2027 लाच परत आणुया.
@Objective2027 🔥
खूप छान समिती म्हणून तर पोरांना 2,4,6मार्क, पेपर चेक ASO ने करायचे,138 वरून 68 मार्क कमी करायचे.
Objective मध्ये कधीच पेपर रिचेकिंग करा म्हणून तक्रार नाही 2012 पासून,इथे पहिल्याच discriptive पेपर रिचेकिंग ला चालले,युनिक आणि चाणक्य लोकांच्या नादी लागू नका.
देवाभाऊ objective करणार