असा चुत्यांचा शिक्षक म्हणून लाज वाटावी!
पेपरफुटीवर बोलायला विद्यार्थी संपर्क करत होते, तेव्हा गप्प. मोर्चा आणि CMOसमोर मात्र चमकोगिरी!
आज विद्यार्थी प्रश्न विचारतोय म्हणून बाप काढतोय. पेपरफुटीमुळेच मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली; तुझी तिथपर्यंत पोहोचण्याची औकात नव्हती. #MPSC
अरे कांगणे की कांजण्या तू काय #Mpsc पोरांचा बाप काढणार तू ,तुझ्या बापाने तुझ्या सावत्र आईने तुला ह्या गुणामुळे नीट सांभाळला नाही. मुळात कांगणे केळ्या तुला Mpsc मधला म तरी माहीत आहे का ,डुक्कर आणि तुझं तोंड एकदम मिळतं जुळतं आहे 😀 @GaneshgSpeaks@MPSCstudsRight@VastavKatta
एकदा तुकाराम मुंढे साहेबांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष करा..... विद्यार्थ्यांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची गरज पडणार नाही.
@Tukaram_IndIAS@Dev_Fadnavis
#MPSC च्या विविध परीक्षांच्या पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून #MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना पदावरून हटवावं या मागणीसह अन्य मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला विद्यार्थ्यांची विराट ताकद दाखवून दिली. या मोर्चात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला.
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भावनेचा विचार करुन सरकारने तातडीने त्यांच्या या मागण्या मान्य कराव्यात आणि भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेल्या #MPSC च्या कारभाराची झाडाझडती घेऊन तिथं स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तसंच MPSC ची ऑफलाईन परीक्षा, औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी अटक झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्याकाळातील सर्व परीक्षांचं फॉरेन्सिक ऑडीट यासह विद्यार्थ्यांच्या सर्वच मागण्या या न्याय्य आहेत. त्याकडं सरकारने दुर्लक्ष करु नये, अन्यथा विद्यार्थ्यांचं यापेक्षाही मोठं आंदोलन पुण्यातच उभारण्याचा इशारा यावेळी दिला.
यावेळी खा. सुप्रियाताई सुळे, आ. डॉ. विश्वजीतजी कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (SP) प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रा. विठ्ठल कांगणे सर, प्रा. सचिन ढवळे सर, प्रा. यशवंत सोलाट सर, प्रा. अजित काकडे सर, प्रा. गणेश कड सर, प्रा. धनंजय मते, प्रा. समाधान कोकटे सर, प्रा. अनिकेत पाटील सर, सचिन म्हस्के सर, तसंच या आंदोलनात प्रमुख भूमिका घेणारे प्रमोद पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी किरण जगताप, संग्राम नराळे, अक्षय कांबळे, अमोल अतकरे (जॉली), स्वप्नील भिसे, प्रविण पाटील, दीपक कसबे, नितीन गिते, अजय जगताप, निकेतन शिंदे, साहेबराव क्षीरसागर, सिद्धांत जांभुळकर, ऋषिकेश गांगुर्डे, कुणाल दिलपाक, तनया साठे, शकील शेख, शिवदास मोरे, बालाजी मिसाळ, अजय बनसोडे, अमोल शिंदे, महेश सरकाळे, राहुल तरंगे, मिथुन भालेराव, गणेश कोराळे, आश्रूबा चौधरी, साक्षी खंडावळे, स्नेहा बावनकर, ऋषिकेश शिंदे, राहुल गुडदे यांच्यासह सर्व विद्यार्थी प्रतिनिधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सीजेपी यांचे पदाधिकारी, मा. आ. मोहनदादा जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, रविराज साबळे पाटील यांच्यासह राज्यभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #MPSC_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी
PMC JE भरतीसाठी उमेदवार आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.
IBPS अहवालातच modus operandi स्पष्ट नसल्याचे नमूद आहे, FIR व पोलीस तपास सुरू आहे.मग नियुक्त्यांची घाई कशासाठी?
संपूर्ण सत्य समोर येईपर्यंत नियुक्त्या स्थगित करा!उमेदवारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका.
@navalMH@prajytnair
कनिष्ठ अभियंता पदभरतीतील गैरप्रकाराविरोधात विद्यार्थ्यांचे पुणे महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलन; शिवसेनेचा आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा..!!
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराच्या विरोधात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परीक्षा देणारे विद्यार्थी आज पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर समोर आंदोलन केले. गुणवत्तेच्या आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांनीच भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे पुरावे पुणे महानगरपालिका प्रशासनासमोर मांडले. या पुराव्यांच्या आधारे पुणे महानगरपालिकेने तीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर केवळ तीनच विद्यार्थी दोषी असल्याचे प्रशासन कोणत्या अधिकृत तपासाच्या आधारे सांगत आहे, हा गंभीर प्रश्न आहे.
एकीकडे गैरप्रकाराचे पुरावे समोर येऊन गुन्हे दाखल झाले असताना दुसरीकडे उर्वरित परीक्षार्थींना सेवेत रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. प्रश्नपत्रिका नेमकी किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली किंवा किती जणांना त्याचा फायदा झाला नाही, याबाबत पुणे महानगरपालिकेकडे अधिकृत आणि अंतिम स्वरूपाचा स्पष्ट निष्कर्ष नसताना संपूर्ण भरती प्रक्रिया पुढे रेटली जात असेल, तर या भरतीची पारदर्शकता आणि विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात येते. प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरचा वाटोळा करण्याचा अधिकार पुणे महानगरपालिका प्रशासनाला नाही.
या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेने यापूर्वीच आवाज उठवला असून, या संपूर्ण प्रकरणाची माहिती माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनाही देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा असून, कनिष्ठ अभियंता पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून नव्याने, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घेण्यात यावी, ही शिवसेनेची स्पष्ट मागणी आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या हक्कासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असून, प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास अधिक तीव्र अंदोलन करू.
@PMCPune@navalMH
#punecity #shivsena #PMC #students #peparleak
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात! ⚖️✊
MPSC,एमएमआरडी आणि पुणे महानगर पालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरतीतील गैरप्रकाराविरोधात आज पुण्यात विद्यार्थ्यांसोबत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांची भेट घेतली.
विविध अहवाल, भरती प्रक्रियेतील गंभीर प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आंदोलनासोबतच आता कायदेशीर लढाईचीही तयारी सुरू झाली आहे. पुढील कायदेशीर कारवाईबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
महायुती सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये.
प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही!
@AsimSarode@INCHarshsapkal@satejp
#PMCJE #PMCRecruitment #StudentsJustice #RojgarNyay #IBPS #Congress
परीक्षा तुमची,यंत्रणा तुमची,सुरक्षा तुमची आणि देखरेखही तुमची—मग PMC JE भरतीतील गैरप्रकाराची जबाबदारी कोणाची?
विद्यार्थी आज PMCसमोर आंदोलनाला बसले आहेत.तरीही प्रशासनाची शांतता संतापजनक आहे
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याची किंमत प्रशासनालाही मोजावी लागेल
@navalMH@prajytnair
पुणे महानगरपालिकेच्या JE भरती परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याचे गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी पुराव्यानिशी समोर आणले आहेत. २२, २३ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेबाबत २८ ऑगस्ट रोजीच्या PMC चौकशी अहवालात गैरप्रकाराचा फायदा तीन उमेदवारांना झाल्याचे नमूद करण्यात आले आहे..
मात्र, प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ती बाहेर पाठवली गेली आणि मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका सोडवली गेली असेल, तर फायदा केवळ तीनच उमेदवारांना झाला, असा निष्कर्ष कोणत्या आधारावर काढला? या गैरप्रकाराची खरी व्याप्ती तपासल्याशिवाय परीक्षा पारदर्शक असल्याचे प्रमाणपत्र देणे म्हणजे हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टाची थट्टा आहे..
यापूर्वी अशाच प्रकरणात एका उमेदवारापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचल्याचे समोर आल्यानंतर MPSC ने संपूर्ण परीक्षा रद्द केली होती. मग PMC JE भरतीसाठी वेगळा न्याय का?
एकीकडे कोणतीही स्वतंत्र पोलीस चौकशी झालेली नसताना १४६ उमेदवारांच्या नियुक्त्यांची घाई केली जात आहे, तर दुसरीकडे विद्यार्थी न्यायासाठी PMC कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकण्याऐवजी सरकार आणि प्रशासन नियुक्त्यांची घाई का करत आहे?
राज्य सरकारने PMC JE भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, नियुक्त्या थांबवाव्यात आणि MPSC मार्फत पारदर्शक पद्धतीने नव्याने परीक्षा घेऊन हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@AUThackeray@ShivsenaUBTComm
कनिष्ठ अभियंता भरतीत मोठा गैरप्रकार; पेपर फुटल्याचे महापालिकेने मान्य केले, मग नियुक्त्या का सुरू ठेवल्या?
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून, परीक्षेचा पेपर फुटल्याचे खुद्द पुणे महानगरपालिकेनेही मान्य केले आहे. विद्यार्थ्यांनी या गैरप्रकाराचे पुरावे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिकेने तीन विद्यार्थ्यांवर कारवाई केली. मात्र, पेपर फुटला होता हे मान्य केल्यानंतर हा गैरप्रकार केवळ तीन विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित होता, हे महापालिकेने कशाच्या आधारे ठरवले? फुटलेला पेपर आणखी किती उमेदवारांपर्यंत पोहोचला? किती उमेदवारांनी त्याचा लाभ घेतला? या प्रश्नांची उत्तरे न शोधताच इतर उमेदवारांना नियुक्त्या देण्याची घाई का करण्यात आली?
तीन विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, मग संपूर्ण भरती प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी का झाली नाही? पेपर फुटल्याचे मान्य असताना त्याच परीक्षेच्या निकालावर आधारित नियुक्त्या वैध कशा ठरू शकतात? हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असेल, तर त्यांना पुन्हा समान आणि निष्पक्ष संधी देणे ही महापालिकेची जबाबदारी नाही का? त्यामुळे कनिष्ठ अभियंता भरतीतील सर्व नियुक्त्या तात्काळ स्थगित करून, संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी आणि पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्यावी, अशी शिवसेनेची ठाम मागणी आहे.
या प्रकरणात पुणे महानगरपालिका प्रशासनातील काही बड्या व्यक्तींच्या सहभागाबाबत शिवसेनेकडे खात्रीदायक माहिती आणि महत्त्वाचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे मोठ्या माशांना वाचवून केवळ तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? संपूर्ण रॅकेटची चौकशी कोण करणार? आणि दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाने द्यावीत. वेळप्रसंगी शिवसेनेकडे उपलब्ध असलेले पुरावेही जनतेसमोर मांडले जातील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कारवाई होईपर्यंत शिवसेना हा लढा आक्रमकपणे लढणार आहे.
@PMCPune@pmccarepune@PMCCare
#PMC #shivsena #punecity #hadapsar
@CJP_for_India This isn’t just an MMRDA issue. The photo shown is from the PMC JE Civil exam centre. We submitted evidence, yet PMC has taken no meaningful action. If recruitment is truly transparent, investigate #PMCJE too. Aspirants deserve justice, not silence. @prajytnair@navalMH@PMCPune
One candidate went from 60 and 80 in recent exams to 200 out of 200 in MMRDA JE Civil. 😳
Another reportedly jumped from single digits to 196. And 13 of 16 toppers came from one Nagpur centre.
Abhijit Dipke: What magic was happening there? If jobs are being managed by setting, stop this exam drama and auction government jobs like IPL.
Aspirants: We protest for advertisement, centre, result and joining. If students fight for every basic step, when will they study?
PMC JE आनी MMRDA परीक्षेमध्ये घोळ झालेला आहे माननीय मोदी साहेब व माननीय मुख्यमंत्री साहेब यामध्ये लक्ष घालून आम्हा विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#Reexam@narendramodi@Dev_Fadnavis@mieknathshinde
I have been informed by several aspirants about serious allegations of irregularities in the MMRDA JE recruitment exam.
Candidates who couldn’t even secure decent marks in other exams have reportedly emerged as toppers in the MMRDA exam.
Interestingly, many of the toppers are reportedly from the same exam centre.
This raises serious questions and must be thoroughly investigated!
अखेर MMRDA मध्ये घेण्यात आलेल्या सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांसह इतर काही पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगित देऊन परिक्षेतील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची समिती स्थापन करण्यात आली. याबाबत मा. एकनाथ शिंदे साहेबांनी कालच आदेश दिले होते, याबाबत त्यांचे मनापासून आभार! ही चौकशी करताना प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही आणि ती निर्धारीत वेळेत पूर्ण होईल आणि तातडीने नव्याने भरती प्रक्रीया राबवण्यात येईल, ही अपेक्षा!