ग्रामीण भागातून MPSC ची तयारी करणारा एक गरीब होतकरू विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्यांचा हा मॅसेज आहे.
रोहित पवारच्या आंदोलनात विद्यार्थी नाहीत आणि शिक्षक सुद्धा नाहीत.
रोहित पवार च्या आंदोलनात कॉलेजमध्ये तोडफोड करणारे रॅपर, बंदूक घेऊन आंदोलन करणारे आहेत. रोहित पवार अराजक माजवणाऱ्या सोबत घेऊन बसला आहे.. रोहित पवार काही कट्टर डाव्यांना घेऊन अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.
काल अभिजित दिपके बोलला पुणे बंद करणार म्हणून.. यांचे हेतू स्पष्ट
आहेत राज्यात अराजकता माजवणे..
@iprakashabitkar कुठे आहे जाहिरात? कुठे आहे 5000 हजार कर्मचारी भरती?कुठे गेले 45 दिवसात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन? कुठे आहे बिंदुनियमालवली? कुठे आहे प्रशासकीय प्रक्रिया? 3 वर्षापासून विद्यार्थ्या प्रतिक्षेत आहे.कळकळीची विनंती.@CMOMaharashtra@mieknathshinde@EA_OfficialMH
@iprakashabitkar आरोग्य भरती जाहिरात प्रसिद्ध होण्यास दिरंगाई विद्यार्थ्यांमध्ये सरकारप्रती उदासीन भावना वाढवत आहे. 3 वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारी भरती बाबत तत्परता का नाही? विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावण्याचे काम करू नये ही विनंती, त्वरित जाहिरात प्रसिद्ध करावी.
आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकरांनी ४५ दिवसांत आरोग्य विभागाची भरती करण्याचे आश्वासन दिले. आज ४-५ महिने झाले, जाहिरातच नाही!
पण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मात्र वेळेत जाहीर झाली. तरुणांच्या भरतीला वेळ नाही, पण निवडणुकीला मात्र ‘फास्ट ट्रॅक’!
आरोग्यमंत्री, ४५ दिवसांचे आश्वासन कुठे गेले?
@abitkar_prakash
प्रति,
मा. प्रकाश आबिटकर
मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग
महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
विषय : आरोग्य विभागातील गट 'क' व गट 'ड' पदभरती तातडीने सुरू करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्रातील हजारो पात्र बेरोजगार युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना सार्वजनिक आरोग्य विभागातील गट 'क' व गट 'ड' मधील तांत्रिक व अतांत्रिक पदांची भरती अनेक महिन्यांपासून रखडलेली आहे. आरोग्य विभागाने काही महिन्यांपूर्वी “४५ दिवसांत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करू” असे आश्वासन दिले होते. मात्र, या मुदतीच्या तिपटीपेक्षा अधिक कालावधी उलटूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, राज्यातील अनेक ठिकाणी आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती व पायाभूत सुविधा तयार असूनही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ती केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याची परिस्थिती आहे. याचा थेट परिणाम ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवेवर होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने पुढील मागण्या करण्यात येत आहेत 1. गट 'क' व गट 'ड' मधील सर्व रिक्त पदांची अद्ययावत पदसंख्या जाहीर करून तात्काळ भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी.
2. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक व निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे वेळापत्रक जाहीर करावे.
3. तयार असलेल्या आरोग्य उपकेंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळाची तातडीने नियुक्ती करून ती पूर्ण क्षमतेने सुरू करावीत.
4. आरोग्य विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवावी.
5. ४५ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या पूर्वीच्या आश्वासनाची पूर्तता का झाली नाही, याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी.
या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही व स्पष्ट वेळापत्रक जाहीर केले नाही, तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने संबंधित कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येईल. बेरोजगार युवकांना रोजगार आणि महाराष्ट्रातील जनतेला सक्षम सार्वजनिक आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. शासनाने या प्रश्नाकडे तातडीने गांभीर्याने पाहून निर्णय घ्यावा, ही विनंती.
आपला,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस तथा अध्यक्ष
रोजगार व स्वयंरोजगार विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (MPCC)
@abitkar_prakash @INCMaharashtra@INCRojgar
#health #dhananjayshinde #recruitment