माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी,
@Dev_Fadnavis
🔶 आज आपण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या संदर्भात माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सूचना आहेत आणि समितीने शिफारस केली तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू करण्याचा सरकार सकारात्मक विचार करेल.
सर्वप्रथम, विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
🔶 मुळात दळवी समिती ही राजकीय वरदहस्त असलेली आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेली समिती होती. त्यांच्या शिफारशींबाबतही विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रश्न आहेत. मात्र, या वादात न जाता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, त्या समितीच्या निर्णयातून निर्माण झालेल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या गोंधळातून मार्ग काढण्याची भूमिका आपण घेत आहात आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत आहात, याबद्दल मी आपला आभारी आहे.
🔶 आम्ही २०२२-२३ पासून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी हा लढा लढत आहोत. विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरताना आम्ही सातत्याने नैतिकता जपली. या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचे पक्षीय राजकारण येऊ दिले नाही.
🔶 सरकारकडून दिलेल्या आश्वासनाचा आदर करत आम्ही नैतिकतेच्या भूमिकेतून एक वर्ष संयमाने वाट पाहिली. मात्र, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची अंमलबजावणी अपेक्षित आणि पारदर्शक पद्धतीने होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी कायम राहिल्या आणि आम्हाला पुन्हा ही मागणी घेऊन आंदोलन करावे लागले.
पण ही मागणी आणि दिलेले आश्वासन तातडीने अंमलात आले नाही, तर आजपर्यंत झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठा लढा आम्ही रस्त्यावर लढू, एवढे मात्र नक्की.
🔶 आज आपण या पूर्णतः अराजकीय मागणीची तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांच्या भूमिकेकडे सकारात्मकतेने पाहत आहात, याबद्दल पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार.
@maha_governor@MahaDGIPR@mpsc_office@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@INCHarshsapkal@supriya_sule@vishwajeetkadam@satejp@atullondhe@Jayant_R_Patil@VijayWadettiwar@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews@News18_marathi@SakalMediaNews@LoksattaLive@lokmat@mataonline@ashish_jadhao@waglenikhil@_prashantkadam@aajtak@mumbaitak@pudharionline@LokshahiMarathi@bolbhidu@RahulAsks@omkarasks@sahiljoshii@GondaneDevesh
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेली ‘व्ही. राधा समिती’ची बैठक ही लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी आणि विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी सरकारपुरस्कृत प्रशासकीय ‘औपचारिकता’ ठरली आहे.
हजारो विद्यार्थ्यांनी एकमुखाने #ObjectivePattern व सर्व एक्साम #offline ची ठाम मागणी लावून धरलेली असताना, समितीच्या अध्यक्षा मा. व्ही. राधा यांनी या अत्यंत महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित मागणीबाबत एकही स्पष्ट भूमिका मांडली नाही. या प्रमुख मुद्द्यावर त्यांनी सोयीस्कर मौन का बाळगले, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असेल, तर विद्यार्थ्यांची सर्वाधिक आग्रही मागणी असलेल्या #ObjectivePattern या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता आधीच निश्चित करण्यात आलेल्या डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑनलाइन परीक्षा पद्धतीचाच आग्रह धरला जात असेल, तर ही प्रक्रिया नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जात आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे समर्थन करणाऱ्या खासगी क्लासचालकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि दुसरीकडे उन्हातान्हात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना पुरेसा संवाद व प्रतिनिधित्वाची संधी न देणे, हा कोणता न्याय?
पहिल्याच डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले असताना, त्याच परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार न करता तिचाच आग्रह का धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
जर या समितीचा दौरा आणि बैठक केवळ विशिष्ट घटकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आयोजित करण्यात आली असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
ही समिती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की केवळ त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घेतले जाणार असतील, तर हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि #ObjectivePattern बाबत स्पष्ट, पारदर्शक व लेखी भूमिका जाहीर करावी. अन्यथा, प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल.
@maha_governor@MahaDGIPR@bhimanwar@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@INCHarshsapkal@supriya_sule@vishwajeetkadam@satejp@atullondhe@Jayant_R_Patil@VijayWadettiwar@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews
@News18lokmat
@SakalMediaNews@LoksattaLive@lokmat@mataonline@ashish_jadhao@waglenikhil@_prashantkadam@aajtak@mumbaitak@pudharionline@LokshahiMarathi@bolbhidu@RahulAsks@omkarasks@sahiljoshii
एमपीएससी मधील लिपिक टंकलेखक आणि इतर नवीन सरळसेवेच्या पदांची भरती करताना TCS/IPBS/ जिल्हा निवड समितीप्रमाणे एकच पेपर घेऊन परीक्षेसाठी लागणारा कालावधी कमी करून
एका वर्ष भरात परीक्षेची प्रकिया पूर्ण व्हावी. उगाच पूर्व, मुख्य मध्ये विद्यार्थ्यांना खेळत ठेवू नये.
@mpsc_office
@Jayant_R_Patil@CMOMaharashtra@Dev_Fadnavis जिवापेक्षा परीक्षा जास्त महत्त्वाची आहे का ?
आता GAD विभागाने पत्रक काढून सर्व कर्मचारी लवकर जाण्याचे आदेश दिलेत..
मुंबई हवामान विभाग पुणे हवामान विभाग red alert सांगत आहेत. मात्र आयोग msg करून परीक्षा वेळातच होणार आहे. परीक्षा महत्वाची की आम्ही ?
Please sir तुम्हीच काहीतरी करा
@Jayant_R_Patil@CMOMaharashtra@Dev_Fadnavis महाराष्ट्र शासनाचा अजब कारभार!
पूरपरिस्थिती पाहता शासकीय
कर्मचाऱ्यांनी लवकर कार्यालय सोडवे!
#MPSC परीक्षार्थींनी कुठल्याही परिस्थितीत जीवाची बाजी लावत मुसळधार पावसात सेंटर ला पोहचावे!
😢😢😢😔
हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. शासनाने त्वरित निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. मुलांच्या कष्टांवर पाणी फेरले जाऊ नये ही शासनाला विनंती आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@Awhadspeaks Thank you sir,
please do something
नुकतंच बाळाला जन्म दिलेल्या महिला उमेदवार असतील,
दिव्यांग उमेदवार असतील ,
यांनी अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीत वाहतूक व्यवस्था ठप्प असताना परीक्षा केंद्रावर कसे पोहचायचे ?
शासनाने जबाबदारी घ्यायला हवी आणि परीक्षेबद्दल योग्य तो निर्णय घ्यायला हवा
@Awhadspeaks महाराष्ट्र शासनाचा अजब कारभार!
पूरपरिस्थिती पाहता शासकीय
कर्मचाऱ्यांनी लवकर कार्यालय सोडवे!
#MPSC परीक्षार्थींनी कुठल्याही परिस्थितीत जीवाची बाजी लावत मुसळधार पावसात सेंटर ला पोहचावे!
😢😢😢😔
@Awhadspeaks महाराष्ट्र शासनाचा अजब कारभार!
पूरपरिस्थिती पाहता शासकीय
कर्मचाऱ्यांनी लवकर कार्यालय सोडवे!
#MPSC परीक्षार्थींनी कुठल्याही परिस्थितीत जीवाची बाजी लावत मुसळधार पावसात सेंटर ला पोहचावे!
😢😢😢😔
उद्या, परवा आणि तेरवा अशा सलग तीन दिवसांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे ट्रेन , एसटी बसमधून फोन येत आहेत की, ते रस्त्यातच अडकले आहेत. ते उद्या परीक्षा केंद्रावरही पोहचू शकत नाहीत. जर ते परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत तर त्यांची मागील कित्येक वर्षांची तयारी अशीच वाया जाईल. या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्वरीत निर्णय घेऊन आगामी तीन दिवसांत होऊ घातलेल्या या परीक्षा स्थगित करून पुढे योग्य त्या दिवसांत या परीक्षा घ्याव्यात, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी ही मागणी करीत आहेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@iambadasdanve@ChDadaPatil@CMOMaharashtra@dadajibhuse@AjitPawarSpeaks टेट परीक्षा उद्या पासून आहे.बऱ्याच परिक्षर्थिंचे सेंटर स्वःताच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यात आले आहे प्रशासन तर मुसळधार पाऊस पडणार आहे असे रेड अलर्ड देत आहे मग अशा परिस्थितीत परीक्षा ४-५ दिवस पुढे जाऊ शकत नाही का?
परीक्षा परिषद या रेड अलर्ड कडे दुर्लक्ष करत आहे.#शिक्षकभरती
प्रति,
मा. दादा भुसे,
मा. मंत्री,
महाराष्ट्र शासन,
मुंबई.
विषय: पूरस्थिती आणि परीक्षा आयोजनातील विसंगतीमुळे विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवावा.
महोदय,
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती उद्भवली असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी हाय अलर्ट घोषित केला आहे. अशा गंभीर आपत्तीजन्य पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शैक्षणिक भविष्यातील प्रश्नांचा विचार होणे अपेक्षित आहे. परंतु, दुर्दैवाने, परीक्षा आयोजन करणाऱ्या यंत्रणांकडून या परिस्थितीचा गंभीरपणे विचार केला गेलेला नाही.
उदाहरणार्थ:
1.TAIT-3 परीक्षा 27 मेपासून सुरू होत असून, अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या केंद्रांऐवजी तिसऱ्या अथवा अत्यंत लांबच्या परीक्षा केंद्रावर पाठवण्यात आले आहे, जी काही केंद्रे तर पुरामुळे अडचणीच्या भागात येतात.
2.अनेक विद्यार्थ्यांची TAIT-3 परीक्षा आणि MPSC मुख्य परीक्षा एकाच दिवशी असून या दोन्ही परीक्षा करिअरसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
3.याशिवाय, D.Ed., B.Ed. आणि इतर स्पर्धा परीक्षाही याच कालखंडात आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळच्या दोन अथवा तीन परीक्षांमधून एक निवडण्याचा अन्यायकारक निर्णय घ्यावा लागत आहे.
सदर परिस्थिती प्रशासनाच्या भोंगळ नियोजनामुळे उद्भवली असून अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भविष्य, आणि समान संधी या सर्व बाबींचा विचार करता, आम्ही आपणास विनंती करतो की:
1.पूरग्रस्त भागातील परीक्षा केंद्रांची तत्काळ फेरतपासणी करून विद्यार्थ्यांना पर्यायी सोयीस्कर केंद्र दिली जावी.
2.जे विद्यार्थ्यांचे पेपर एकाच दिवशी आहेत, त्यांना एक पेपर पुढे ढकलण्याची किंवा पर्यायी तारीख देण्याची व्यवस्था करावी.
3.यासंबंधीचा निर्णय लवकरात लवकर घेऊन विद्यार्थ्यांना स्पष्टता द्यावी.
ही विनंती विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण तातडीने संबंधित विभागांशी समन्वय साधून योग्य निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
आपला विश्वासू,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@dadajibhuse@INCHarshsapkal@INCMaharashtra@CMOMaharashtra
मंत्रालयातून मॅसेज आला,पुढील 24 तासात जोरदार पाऊस पडणार असून घराच्या बाहेर पडू नका म्हणतो...!
अन् IBPS माध्यमातून उद्यापासून TAIT 3 परीक्षा सुरू होणार असून ते म्हणते कोणत्याची प्रकारच्या परिस्थित उद्या सकाळी 8 AM वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहा..!
@dadajibhuse साहेब