MPSC CBT (ऑनलाईन) परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. हा विरोध विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येत नाही म्हणून नसून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पारदर्शक होत नाही हे वारंवार सिद्ध झालेले आहे. महापरीक्षा पोर्टल का बंद केले? TCS, IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा MPSC कडे देण्याचा निर्णय सरकारने का घेतला? ऑनलाईन परीक्षा मधील भोंगळ कारभार समोर असतानाही त्याच कंपन्यांना परीक्षा घ्यायला देणे म्हणजे MPSC ला पांगळे करण्यासारखे आहे. मागील वीस वर्षापासून MPSC मार्फत एकदाही पेपर फुटण्याची घटना नाही, कोणताही गोंधळ नाही तरीही परीक्षा ऑनलाईन घेण्याचा घाट का?
ऑगस्ट 2027 नंतर पुन्हा परीक्षा ऑनलाईन घेणार म्हणजे आजचे मरण उद्यावर. 30-40 हजार पदे भरणार ते 2026 मधेच भरणार का? सरळसेवा MPSC मार्फत २०२६ मधेच घेणार का? याविषयी काहीच माहिती नाही.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, जमावबंदी लागू करून विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला जात आहे. तुम्ही कितीही दडपशाही करा ऑनलाईन परीक्षा मान्य नाहीच.
#onlyofflineexam
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@mieknathshinde
MPSC ची CBT परीक्षा रद्द करा... ऑफलाईन परीक्षा कायम ठेवा..!
बेलापूर येथील MPSC कार्यालयासमोर सुरू असलेल्या काँग्रेसच्या साखळी उपोषणाला भेट देत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला जाहीर पाठिंबा दिला.
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची साथ - आंदोलनाच्या चौथ्या दिवशी MPSC मुख्यालय, बेलापूर येथे भेट
MPSC परीक्षांमधील CBT (ऑनलाईन) पद्धत व Normalization विरोधात बेलापूर येथील बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन आज चौथ्या दिवशीही निर्धाराने सुरू राहिले.
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला व राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना काँग्रेस पक्षाचा ठाम पाठिंबा पुन्हा एकदा जाहीर केला.
यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “MPSC नोकरभरतीतील अनियमितता व्यापम घोटाळ्यापेक्षाही गंभीर असून, विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षा पद्धतीवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. राज्य सरकारने तातडीने CBT व Normalization रद्द करून पारदर्शक ऑफलाईन परीक्षा पद्धत लागू करावी. अन्यथा हा लढा संपूर्ण महाराष्ट्रभर अधिक तीव्र करण्यात येईल.”
गेल्या १२ दिवसांपासून आम्ही शांततामय आंदोलन करत असतानाही सरकार किंवा MPSC चा एकही वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी न येणे, ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबतची सरकारची असंवेदनशीलता असल्याची टीकाही त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड होऊ देणार नाही, ही काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. न्याय्य, पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती प्रक्रियेसाठी हा लढा मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहील.
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@bhimanwar
#MPSC #OfflineExams #CBT #Normalization #JusticeForAspirants #MaharashtraCongress
#Latur : लातूरमध्ये #MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा ऑफलाईन #OMR पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.
ऑनलाइन #CBT पद्धतीमुळे तांत्रिक अडचणी आणि समान संधीचा अभाव होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप.
एमपीएससीच्या परीक्षा संगणकाधारित (ऑनलाईन) पद्धतीने घेण्याच्या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या मते, परीक्षा पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही त्यांची रास्त अपेक्षा आहे.
या मागणीला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई येथील एमपीएससी मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, या आंदोलनाला विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांनी सक्रिय पाठिंबा द्यावा, असे मी सर्वांना आवाहन करतो.
#mpsc #mpscexam #offline
ज्या तरुणांच्या बळावर सत्तेची गणिते मांडली जातात, तोच उद्याचा भविष्य असलेला एमपीएससी चा विद्यार्थी आज भर पावसात आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर आंदोलनाला बसला आहे. हे चित्र केवळ दुर्दैवी नाही, तर या सरकारच्या संपूर्ण नाकर्तेपणाचा आणि असंवेदनशीलतेचा जाहीर पुरावा आहे.
निवडणुकीपूर्वी सत्तेच्या मोहासाठी मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि आता अंमलबजावणीची वेळ आली की पळ काढायचा, हाच या सरकारचा एककलमी कार्यक्रम बनला आहे. मंत्र्यांच्या पोकळ दाव्यांना कंटाळून आज राज्यातील तरुण वर्ग रस्त्यावर उतरण्यास विवश झाला आहे.
एमपीएससीने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षाच्या मनमानी परिपत्रकाचा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नॉर्मलायझेशन प्रक्रियेचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. हा केवळ विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा विषय नाही, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी चाललेला खेळ आहे.
आमच्या या स्वाभिमानी तरुणांवर होणारा हा अन्याय आम्ही कदापि खपवून घेणार नाही, हा आमचा सरकारला स्पष्ट इशारा आहे. आम्ही पूर्ण ताकदीने सर्व आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत!
@mpsc_office
#mpscstudentsprotest #mpsc #MaharashtraGovernmentFailures #CancelNormalization
MPSC ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलन ठिकाणी मोठा फौज फाटा आणि मोबाईल जामर बसवले आहेत याचा अर्थ काय? विद्यार्थ्यांना संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? त्यांचा आवाज जनतेपर्यंत जाऊ न देण्याचाच हा प्रयत्न #mpscexamoffline
Sunday Wisdom!मुख्यपरीक्षा एक मात्र पात्रता निश्चितीस्तव ऑनलाईन पूर्व परीक्षा दोन/तीन?गुणवर्धनास्तव अतिरिक्त पूर्व परीक्षांंमधे कालापव्यय,जास्तीच्या परिक्षेमुळे गुुण समानीकरणात वाढीव क्लिष्टता,यामुळे उमेेदवारांंत वाढणारी अस्वस्थता टाळण्यासाठी एकच #MPSC पूर्वपरीक्षा पुरेशी!
माननीय @mpsc_office आयोग राव आमचे कल्याण इथेच आहे आम्हाला नको तो फापट पसारा ऑनलाईन.आधी फॉर्म ऑफलाईन हॉलतिकीट ऑफलाईन यायचे ते ऑनलाईन आले एवढीच प्रगती बस.आता फक्त तुम्हाला तुमची प्रतिमा जपण्याची कसरत करा.तुमच्यावर दबाव आहे तर खरोखर पद सोडा पण लाखो पोरांच्या आयुष्याचा खेळ करू नका
‘महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती’च्यावतीने छत्रपती संभाजीनगर इथं विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांबाबत आंदोलन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या या सर्व मागण्या रास्त असून त्यांच्या या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मी स्वतः उपस्थित राहणार आहे.
सोमवार दि. ६ जुलै २०२६. सकाळी १० वा.
स्थळ – क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आगामी संयुक्त गट-क पूर्व परीक्षा २०२६ पासून संगणक-आधारित चाचणी (CBT) आणि मल्टिशिफ्ट नॉर्मलायझेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला स्थगिती देऊन पारंपरिक ऑफलाइन OMR पद्धत कायम ठेवावी. - रोहित पवार
https://t.co/xhD6aGu4lN< येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews #Mpsc #OMR #Eknathshinde #CBT
#MPSC ची ऑनलाईन परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन परीक्षा घेण्याची राज्यभरातील विद्यार्थ्यांची मागणी असून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा मॅडम यांना विद्यार्थ्यांसह भेटून याबाबत त्यांच्याशीही सविस्तर चर्चा केली.
ऑनलाईन परीक्षेतील भ्रष्टाचार आणि पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांवर कसा अन्याय होतो याबाबतचे पुरावेही त्यांना दिले. तसंच ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेताना MPSC कडून काही चुकीच्या गोष्टींचा दाखला दिला जात असल्याची माहितीही त्यांना दिली आणि सुप्रीम कोर्टाच्या काही निकालांचे दाखलेही दिले. त्यांनी या सर्व बाबी समजून घेतल्या असून त्या मुख्यमंत्री महोदयांशी याबाबत चर्चा करणार असून त्यानंतर मुख्यमंत्री महोदय याबाबत आयोगाच्या अध्यक्षांशी बोलतील, असं त्यांनी आश्वासित केलं. त्यामुळं येत्या काही दिवसांत ऑनलाईन परीक्षा रद्द केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
#MPSC #ऑनलाईन_परीक्षा_रद्द_करा
मा.@bhimanwar@mpsc_office ही परीक्षा 23 सप्टेंबर 2025 ला घेतली होती..अजून निकाल नाही याच कारण म्हणजे ऑनलाईन पेपर असून सुद्धा मुंबई मध्ये तुमच्यातील काही लोकांनी पेपर फोडला म्हणे बरोबर का? जे ऐकलं ते सत्य आहे का?8 महिन्यापासून निकाल नाही उमेदवार संख्या केवळ 1000-2000 तरीही अस का?
मा.@mpsc_office@bhimanwar आपल्याला विनंती आहे कि, ऑनलाईन परीक्षा, normlization यामुळे आमचे 2 ते 3 वर्षे वाया गेले. आपल्या मार्फत होणाऱ्या ऑफलाईन परीक्षेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सरकारच्या दबावाखाली आपण काम करत आहात का?
लवकरात लवकर निर्णय माघे घेण्यात यावा.
#MpscOfflineExam
मा.@mpsc_office ऑफलाईन पेपर असल्यावर पण निकाल 21 दिवसात लावता येतो हे आपण सिद्ध केलं त्यामुळे आता यापेक्षा जास्त गती नको उमेदवारांना त्यामुळे ऑफलाईन वर लक्ष केंद्रित करा ONLINE चा नाद सोडा....
मुख्यमंत्री म्हणले विद्यार्थ्यांसोबत संवाद साधा कधी साधता संपर्क ते कळवा@bhimanwar