प्रति,
मा. प्रकाश आबिटकर
मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग
महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
विषय : आरोग्य विभागातील गट 'क' व गट 'ड' पदभरती तातडीने सुरू करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्रातील हजारो पात्र बेरोजगार युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना सार्वजनिक आरोग्य विभागातील गट 'क' व गट 'ड' मधील तांत्रिक व अतांत्रिक पदांची भरती अनेक महिन्यांपासून रखडलेली आहे. आरोग्य विभागाने काही महिन्यांपूर्वी “४५ दिवसांत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करू” असे आश्वासन दिले होते. मात्र, या मुदतीच्या तिपटीपेक्षा अधिक कालावधी उलटूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, राज्यातील अनेक ठिकाणी आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती व पायाभूत सुविधा तयार असूनही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ती केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याची परिस्थिती आहे. याचा थेट परिणाम ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवेवर होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने पुढील मागण्या करण्यात येत आहेत 1. गट 'क' व गट 'ड' मधील सर्व रिक्त पदांची अद्ययावत पदसंख्या जाहीर करून तात्काळ भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी.
2. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक व निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे वेळापत्रक जाहीर करावे.
3. तयार असलेल्या आरोग्य उपकेंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळाची तातडीने नियुक्ती करून ती पूर्ण क्षमतेने सुरू करावीत.
4. आरोग्य विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवावी.
5. ४५ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या पूर्वीच्या आश्वासनाची पूर्तता का झाली नाही, याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी.
या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही व स्पष्ट वेळापत्रक जाहीर केले नाही, तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने संबंधित कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येईल. बेरोजगार युवकांना रोजगार आणि महाराष्ट्रातील जनतेला सक्षम सार्वजनिक आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. शासनाने या प्रश्नाकडे तातडीने गांभीर्याने पाहून निर्णय घ्यावा, ही विनंती.
आपला,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस तथा अध्यक्ष
रोजगार व स्वयंरोजगार विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (MPCC)
@abitkar_prakash @INCMaharashtra@INCRojgar
#health #dhananjayshinde #recruitment
@abitkar_prakash आरोग्य हा अती महत्वाचा प्रश्न असताना,आरोग्य व्यवस्थेचे लक्तरे निघत असताना आणि एवढ महत्वाच खात त्यात कर्मचाऱ्यांची कमतरता आणि हजारो पदे रिक्त असून सरकार आणि मंत्री महोदयांना याच गांभीर्य नाही तसेच जाहिरात नाही.@SMungantiwar@AbhiPawarBJP@Dhananjay4INC@RRPSpeaks
@EA_OfficialMH @abitkar_prakash जलसंधारण अधिकारी भरती–2023
670 पदांच्या जाहिरातीतील 40+ पदे विविध कारणांमुळे रिक्त आहेत. भरतीची वैधता 10 ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे.
नवीन आकृतीबंधाचे कारण देत आहेत, रिक्त पदे भरत नाहीत गुणवत्तेनुसार Additional Waiting List द्वारे भरण्यात यावीत, ही नम्र मागणी.
#जलसंधारणअधिकारीभरती
@EA_OfficialMH @abitkar_prakash आरोग्य विभागातील गट 'क' व 'ड' ची रखडलेली पदभरती तात्काळ राबवा! कर्मचाऱ्यांअभावी ग्रामीण उपकेंद्रे ओस पडल्याने जनता आरोग्यापासून वंचित आहे, तर तरुण बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. शासनाने तातडीने जाहिरात काढून हा प्रश्न मार्गी लावावा. @abitkar_prakash @CMOMaharashtra
@EA_OfficialMH @abitkar_prakash आरोग्य विभागातील गट 'क' व 'ड' ची रखडलेली पदभरती तात्काळ राबवा! कर्मचाऱ्यांअभावी ग्रामीण उपकेंद्रे ओस पडल्याने जनता आरोग्यापासून वंचित आहे, तर तरुण बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. शासनाने तातडीने जाहिरात काढून हा प्रश्न मार्गी लावावा. @abitkar_prakash @CMOMaharashtra
@abitkar_prakash किती दिवस विद्यार्थ्यांची अशी फसवणूक करणार?
स्वतःच्याच ‘आरोग्य पत्रिका’ या शासकीय मासिकात “१ ते १.५ महिन्यात भरती करू” अशी आश्वासने देऊन लाखो सुशिक्षित बेरोजगारांच्या भविष्याशी खेळणे थांबवा!
दिलेल्या मुदतीपेक्षा तिप्पट काळ उलटूनही आरोग्य विभाग गट ‘क’ आणि ‘ड’ची जाहिरात का रखडली आहे?
हा आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा आहे की विद्यार्थ्यांच्या संयमाची चेष्टा?
विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याआधी गट ‘क’ व ‘ड’ची भरती जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करा!
@CMOMaharashtra
#आरोग्यविभाग #भरती #GroupC #GroupD
सार्वजनिक आरोग्य विभागातील गट 'क' आणि गट 'ड' ची रखडलेली जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करा! सातत्याने होणाऱ्या विलंबामुळे हजारो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी ही विनंती
@CMOMaharashtra @abitkar_prakash
@Dhananjay4INC फडणवीस म्हणजे फक्त घोषणा मंत्री.
घोषणा 100%
कृती 0%
2026 वर्ष महाभरती चे म्हणून विधानभवनात घोषणा केली होती, बघू आता ते स्वतःच्या शब्दाला तरी किंमत देतात का ते
@Dhananjay4INC सेवाप्रवेश नियम...
आकृती बंध...
यात उमेदवारांचा जुलै 2026 पर्यन्त वेळ गेला...
आता...
Online / Offline या मुळे उमेदवारांचे हे वर्ष सुद्धा जाईल...सोबतच ऑगस्ट 2027 पर्यंत सुद्धा वेळ वाया जाईल.
2026...
नोकरभरतीचा वर्ष.... ❌❌❌
घोषणाच वर्ष.............✅✅✅
#Megabharti....🙏🙏😔
@Dhananjay4INC ब्रिटिश सरकार ज्याप्रकारे थोडे द्यायचे बहुतांश नाकारायचे त्याच प्रकारचा हा निर्णय आहे
पण सरकारला सांगू इच्छितो की हा मवाळ महाराष्ट्र नाही तर
जहालांचा महाराष्ट्र आहे
#MPSC#विद्यार्थी पेटून उठेल
“२०२६ हे मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे आणि नियुक्तीचे वर्ष असणार आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे म्हटले होते.
आता प्रश्न एवढाच आहे, ही घोषणा प्रत्यक्षात कधी उतरणार? बेरोजगार तरुणांना केवळ शब्दांच्या खेळात अडकवून ठेवू नका. लाखो युवक - युवती सरकारी भरतीच्या जाहिरातींची आतुरतेने वाट पाहत आहेत.
जर २०२६ हे खरोखरच “मेगाभरतीचे वर्ष” असेल, तर तात्काळ मोठ्या प्रमाणात विविध विभागांच्या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करून नियुक्ती प्रक्रिया सुरू करा.
अन्यथा, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि रोजगाराच्या मागणीसाठी आम्हाला पुन्हा एकदा हजारो विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने संघर्ष करावा लागेल.
घोषणा नव्हे, जाहिराती द्या. आश्वासने नव्हे, नियुक्त्या द्या.
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra