आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील लघुलेखन (Shorthand) व टायपिंगचे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी आहोत. अत्यंत हलाखीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत, शेकडो विद्यार्थ्यांनी ५ ते ६ वर्षे मेहनत घेऊन हे कौशल्य आत्मसात केले आहे. ग्रामीण भागातील आणि बहुजन समाजातील अनेक तरुणांनी कर्ज काढून किंवा पालकांचे रक्त-आटवून मिळालेल्या पैशातून या कोर्सेसची फी भरली आहे.
परंतु, महाराष्ट्र शासनाने ५ मे रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता, लघुलेखक (स्टेनोग्राफर) संवर्गातील पदे 'मृत' (��ालबाह्य) घोषित करणारा एक अत्यंत जुलमी आणि अन्यायकारक जीआर (Government Resolution) काढला आहे. शासनाच्या या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले असून त्यांच्या वर्षानुवर्षांच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे.
डिजिटल युगातही न्यायालये, मंत्रालये आणि विविध सरकारी कार्यालयांमध्ये गोपनीय कामकाज आणि प्रशासकीय गती राखण्यासाठी मानवी कौशल्य असलेल्या लघुलेखकांची गरज कायम आ���े. असे असतानाही शासनाने घेतलेला हा निर्णय सुशिक्षित तरुणांवर अन्याय करणारा आहे.
आमची नम्र विनंती:- आपण नेहमीच महाराष्ट्रातील तरुणांच्या रोजगाराच्या, शिक्षणाच्या आणि हक्काच्या प्रश्नांवर अत्यंत आक्रमकपणे आणि अभ्यासूपणे आवाज उठवला आहे. आपल्या युवा आणि बुलंद नेतृत्वाची आज महाराष्ट्रातील लाखो स्टेनो विद्यार्थ्यांना अत्यंत गरज आहे. तरी आपण या विषयात गांभीर्याने लक्ष घालून:-
१. या अन��यायकारक निर्णयाविरोधात वंचित बहुजन युवा आघा��ीच्या वतीने जाहीर राज्य पातळीवर सरकारला जाब विचारावा व सरकारचा जाहीर निषेध करावा
२. हा विषय युवा पातळीवर लावून धरून ५ मे चा काळा जीआर रद्द करण्यासाठी शासनावर दबाव निर्माण करावा.आपल्या सहकार्यामुळे लाखो तरुणांचे करिअर उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकते. आपण आमच्या या शांततापूर्ण आणि न्याय्य लढ्याला नक्कीच बळ द्याल, हीच अपेक्षा.
आपल्या सहकार्यामुळे लाखो तरुणांचे करिअर उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकते. आपण आमच्या या शांततापूर्ण आणि न्याय्य लढ्याला नक्कीच बळ द्याल, हीच अपेक्षा
#JusticeForSteno 💥🔥#MPSC #pune #maharashtra
@Dev_Fadnavis @mieknathshinde
@cbawankule @ChhaganCBhujbal
@ChDadaPatil @girishdmahajan
@samant_uday
@Pankajamunde @save_atul
@ShelarAshish
@iAditiTatkare
@DrSEShinde @parthajitpawar @purveshsarnaik @KDMahadik @dhananjay_munde @RealBacchuKadu @OmRajenimbalkr @DrPritamMunde @PatilKailasB @AbhiPawarBJP @mipravindarekar @niranjandtweets @DrBhagwatKarad @degree_holders
@mpsc_office
@AUThackeray @amitrthackeray @INCHarshsapkal @satejp @VijayWadettiwar @iambadasdanve @Awhadspeaks @prithvrj @supriya_sule @RRPSpeaks @rautsanjay61 @NitinRaut_INC @VarshaEGaikwad @AdvYashomatiINC @andharesushama @kolhe_amol @Prksh_Ambedkar @Dhananjay4INC
@priydarshitelang
@sujatambedkar