मा. @maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE
मा. @mieknathshinde साहेब
👉पुरोगामी महाराष्ट्रात विकासाच्या फक्त गप्पा होत आहेत गेल्या 10 वर्षांत.
राज्यातील युवकांमध्ये तीव्र असंतोष धुमसत आहे, थोडे लक्ष द्या.
लोकसभा ,विधानसभा निवडणुकीत
मतदानाद्वारे याचे पडसाद नक्कीच उमटतील यात शंका नसावी.
👉काँग्रेस सरकार च्या काळातील राज्यसेवा व MPSC च्या इतर परीक्षेतील जाहिरातीमधील पदांचे आकडे बघा व सध्या आपल्या सरकारने उमेदवारांच्या हातात दिलेला "शून्य पदांचा भोपळा" बघा.
2024 जाहिरातीत
राज्यसेवेच्या 35 संवर्गापैकी 23 संवर्गाची चक्क ZERO पदे आहेत.
हेच का ते अच्छे दिन????
👉 मा.मुख्यमंत्री साहेब ....
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या
राज्यसेवा 2024 जाहिरातीचा इतिहास आपल्या नावावर लिहिला जाणार आहे.
35 संवर्ग किमान 1500 जागा इतकी माफक मागणी हे उमेदवार आपल्याकडे करत आहेत.
👉 स्थापत्य अभियांत्रिकी उमेदवारांना तर आपण फक्त 26 पदे देऊन गुंडाळले आहे.
2013 मध्ये 997 पदांची जाहिरात
मग 2024 ला हा आकडा इतका कसा घसरला ????
👉 RFO च्या 2014 ला 272 जागा
व 2024 ला फक्त 11
काय चाललंय काय नेमकं????
👉 काँग्रेस सरकारने
PSI च्या 1869 (2011)
STI च्या 1090 (2012)
पदांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या
2024 जाहिरातीत आपले सरकार किती पदांची जाहिरात प्रसिद्ध करणार आहात ??????
👉 अजूनही वेळ गेलेली नाही, गोरगरीब ,कष्टकरी शेतकऱ्यांच्या लेकरांना ,बेरोजगारीने आयुष्य उद्धवस्त होत असलेल्या उमेदवारांना आपल्याकडून न्यायाची अपेक्षा आहे.TOLE
@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन संपणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
पुरेसा वेळ दिला आहे,आज उमेदवारांच्या वतिने शेवटची विनंती करत आहोत.
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. राज्यसेवा 2023 attempt जागा न काढून अक्षरशः वाया घालवला.
2024 चा last attempt ला पण तेच करण्याचा मनसुबा रचत आहात काय?
तीन आंदोलने करून मिळवलेले दोन्ही attempt असेच वाया घालणार व उमेदवार ते निमूटपणे सहन करतील असे आपणास वाटत असेल तर वेळीच सावध व्हा.
3. 2018 पासून राज्यसेवेत समाविष्ट केलेले उपसंचालक/प्रकल्प अधिकारी
( आदिवासी विभाग) हे पद गेल्या 7 वर्षात एकदाही जाहिरातीत प्रसिद्ध केले नाही.या शेवटच्या attempt मध्ये तरी हा संवर्ग असायलाच हवा.
4. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O.,
तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
5. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढून उमेदवारांची क्रूर चेष्टा केली आहे.
5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध करून Engineers च्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.
त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी.
#राज्यसेवा_2024_जागावाढ
#राज्यसेवा_2024_1500
#MPSC_Civil_1000_posts
#Civil Engineering
विद्यार्थ्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला !
'महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) परीक्षा-२०२०' मधील एकूण २१७ उमेदवारांपैकी न्यायप्रविष्ट असलेल्या EWS प्रवर्गातील २१ जागा वगळून इतर प्रवर्गातील १९६ शिफारस प्राप्त उमेदवारांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन, त्या संदर्भातील विविध विभागांची बैठक घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढला.
गेल्या दोन वर्षापासून SEBC उमेदवारांना EWS प्रवर्गात समावेश करण्याचा शासन निर्णय रद्द झाल्याने शिफारस प्राप्त उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित होता. या प्रश्नाचा सतत पाठपुरावा केला आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला. गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने आज या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यासंदर्भात आज मंत्रालयात काही उमेदवारांनी भेट घेतली, पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आणि पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्या चेहर्यावरचा आनंद बघून मनाला समाधान मिळालं.
विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी महायुती सरकार तत्पर असून, विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर उभं आहे. अशी भावना व्यक्त करत उपस्थित उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते.
#Mumbai #Mantralaya #Students #CivilExamination #Engineering #Candidates #EWS #SEBC #RavindraChavan #PWD
@RaviDadaChavan साहेब PWD जाहिराती संदर्भात काही असोसिएशन तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय परंतु शासन खंबीरपणे डिप्लोमा विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहावे. सरकारला SC,HC च्या निर्णयास बांधील राहावे लागते निर्णय dipolma विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे.
#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या संदर्भात मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची भेट घेऊन हा विषय निकाली काढण्याची विनंती केली.त्यांनी देखील त्वरित जलसंपदा विभागाच्या सचिवांशी संपर्क करून सद्यस्थिती जाणून घेतली.या विषयाची सुनावणी ११ सप्टेबर रोजी असून त्यासाठी अत्यंत नामांकित वकील विद्यार्थ्यांची बाजू मांडणार असून विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर त्वरित नियुक्त्या देण्याबाबत देखील त्यांनी आश्वासित केले आहे.
न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूनेच लागणार असा विश्वास आहे.गेल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री साहेबांशी याविषयी चर्चा केली असून मी स्वता या विषयी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे.त्यामुळे सद्या सुरु असलेला पाउस व उपोषणात विद्यार्थिनी भगिनींची असलेली संख्या बघता आपण हे उपोषण त्वरित मागे घ्यावे अशी आपला मोठा भाऊ विनंती करतो.
@Dev_Fadnavis जलसंपदा विभागात 2019 साली कनिष्ठ अभियंता ची भरती निघाली होती। त्याचे पेपर ऑगस्ट 2022 मध्ये झाले। आत्ता चालू आहे ऑगस्ट 2023 । भरती निघून 4 वर्ष झाले आणि परीक्षा होऊन 1 वर्ष। तरीही आम्हाला JOINING नाही मिळाली मा.Fadnavis साहेबांनी यात लक्ष देऊन आम्हा विद्यार्थ्यांना न्याय द्यावं!
@Dev_Fadnavis जलसंपदा विभागात 2019 साली कनिष्ठ अभियंता ची भरती निघाली होती। त्याचे पेपर ऑगस्ट 2022 मध्ये झाले। आत्ता चालू आहे ऑगस्ट 2023 । भरती निघून 4 वर्ष झाले आणि परीक्षा होऊन 1 वर्ष। तरीही आम्हाला JOINING नाही मिळाली मा.Fadnavis साहेबांनी यात लक्ष देऊन आम्हा विद्यार्थ्यांना न्याय द्यावं!
@RRPSpeaks कनिष्ठ अभियंता जलसंपदा उमेदवारांचा मुद्दा घेतल्याबद्दल दादा तुमचे आभार❤️
नियुक्ती मिळेपर्यंत आपण असाच पाठपुरावा करावा आम्ही महराष्ट्रातील सर्व अभियंते आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू🙏🏻
@RRPSpeaks कनिष्ठ अभियंता जलसंपदा उमेदवारांचा मुद्दा घेतल्याबद्दल दादा तुमचे आभार❤️
नियुक्ती मिळेपर्यंत आपण असाच पाठपुरावा करावा आम्ही महराष्ट्रातील सर्व अभियंते आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू🙏🏻
जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब या पदासाठी जुलै २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहीरातीनुसार झालेल्या परीक्षेतील उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा आदेश जलसंपदा विभागाला देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजितदादा यांना केली. तसंच महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या भरतीसाठी SEBC to EWS विकल्प दिलेल्या मराठा समाजातील २८२ गुणवत्ताधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंतीही केली. याशिवाय महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ च्या परीक्षेत SEBC To EWS विकल्प निवडलेल्या मराठा समाजातील ९४ उमेदवारांना अद्याप नियुक्त्या दिलेल्या नाहीत. ही बाबही मा. अजितदादा यांच्या निदर्शनास आणून दिली असता याध्येही लक्ष घालण्याचं त्यांनी मान्य केलं.
@AjitPawarSpeaks