महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव टिकवून ठेवण्यात मराठी रंगभूमीचा मोलाचा वाटा आहे. लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्या संगतीनं आपल्या कलाविष्कारातून मराठी रंगभूमीला जिवंत ठेवणारे रंगकर्मी यांसह रसिक प्रेक्षकांना आजच्या 'मराठी रंगभूमी दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#मराठीरंगभूमीदिन
'भूदान' चळवळीच्या माध्यमातून भूमीहिनांना लाखो एकर जमीन मिळवून देणारे, ही अमूल्य भूमिका पार पाडणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, 'भारतरत्न' आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांच्या कार्याला आणि विचारांना वंदन!
नाशिक जिल्ह्याच्या आदिवासीबहुल सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील जलसंधारणाच्या विविध प्रलंबित योजनांबाबत बैठक झाली. या तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याची आणि सिंच��ाची समस्या सोडवण्यासाठी वांगण, श्रीभुवन, जामशेत या लघुपाटबंधारे योजनांसह सतखांब साठवण तलाव योजनांना निधी उपलब्ध करून देऊन गती देणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं.
केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या आकांक्षित (मागास) तालुका कार्यक्रमांतर्गत सुरगाणा तालुक्याची निवड झाली आहे. या तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करून तालुका, जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढवावा ल��गेल. इथल्या आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणावं लागेल. जलसंधारण विभाग, आदिवासी विकास विभाग, जलसंपदा विभाग, वन विभाग आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून सुरगाणा, कळवण तालुक्यातील विविध लघु पाटबंधारे योजना तातडीनं पूर्ण कराव्यात. काही सिंचन योजनांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे, तर बऱ्य���च योजनांना पाणी वापर प्रमाणपत्र मिळालं आहे. या योजना प्राधान्यानं पूर्ण कराव्यात, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आदिवासी तालुक्यांतील अप्पर पुनद, सोनगीर, मालगोंदा, बाळओझर, वाघधोंड, उंबर विहीर, सालभोये, सिंगलचोंढ या लघु पाटबंधारे योजना तसंच विविध पाझर तलाव लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, असे ही निर्देश दिले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील विवेक सोनवणे व त्यांचं कुटुंब १२० दिवसांत ३१ देशांची भ्रमंती करणार आहे. त्यांना या धाडसी प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा देतो. चिंचवडमधील ��्रांतिवीर चाफेकर पुतळ्याला अभिवादन करून या कुटुंबानं आपला जग भ्रमंतीचा प्रवास सुरु केला आहे. याच दरम्यान मुंबईत त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. या प्रवासादरम्यान सोनवणे कुटूंब 'वसुधैव कुटुम्बकम्' व 'ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या' हा संदेश जगभरातील नागरिकांना देणार आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांचा प्रवास सुरक्षित आणि आनंदमय होवो हीच सदिच्छा.
आज मुंबईत मुख्यमंत्री @mieknathshinde जी आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांच्या, महामानवांच्या विचारांवरतीच राष्ट्रवादी काँग्रेस प���्षाची वाटचाल सुरू आहे. राज्याचा विकास झाला पाहिजे याचं उद्देशानं केंद्रातील आणि राज्यातील सरकार काम करत आहे. वर्षभरात पूर्ण होऊ शकणारे राज्यातील विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्याचे आमच्या सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भात एक कमिटी मुख्यमंत्र्यांनी नेमली आहे. त्याचा आम्ही वेळोवेळी आढावा घेत असतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही राज्याच्या विकासाची कामं सुरू आहेत. त्या का��ांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर कसं राहील या दृष्टिकोनातून आपलं महायुतीचं सरकार काम करत आहे.
राज्यातील अनेक भागांत ���ावसानं ओढ दिली, त्यामुळे खरीप पिकं धोक्यात आली आहेत. राज्य सरकार लवकरच खरीप पिकांसंदर्भात सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत करणार आहे. महाराष्ट्रानं आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीसारखे अनेक संकटं पाहिलेली आहेत. मात्र राज्य कधी डगमगलं नाही. संकटांना तोंड देत आपल्या महाराष्ट्राची वाटचाल अखंडितपणे सुरू आहे.
येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी आपल्याला एकत्र काम करायचं आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा दुरावा असता कामा नये. राज्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी महायुतीला बळकट करायला हवं.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात क��ठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीनं लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचं ���्रथम दर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देतो.
राज्यातील मराठा आंदोलना��ं लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानंच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे. असा विश्वास देतो. अंबड येथील घटनेतील दोषी पोलिसांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, क���णालाही पाठीशी घातलं जाणार नाही. राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी, असं आवाहन मराठा आंदोलक आणि राज्यातील नागरिकांना आहे.