Updates Of Deputy Chief’s Minister Hon.Youth @NCP_Party1 Leaders Ajitdada Pawar Army || future CM For Maharashtra || Indian Political Super Star ⭐️✌️❤️||
प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी जी यांनी ‘एलपीजी’ सिलेंडरचे अनुदान नाकारण्यासाठी ‘पहल’ सुविधा निर्माण केली होती. या अंतर्गत अनुदानाची आवश्यकता नसणाऱ्या महाराष्ट्रातील १६ लाख ५२ हजार लाभार्थ्यांनी आपले अनुदान नाकारले. या योजनेचे सर्वत्र कौतुक झाले. यामुळे एक वेगळा, चांगला पायंडा पडला. या योजनेत नाकारलेले अनुदान इतर गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना मिळू शकते. राज्य शासनामार्फत विविध योजनांचे अनुदान ‘महाडीबीटी’ पोर्टलच्या माध्यमातून दिले जाते. मात्र ज्यांना अनुदानाची आवश्यकता नाही त्यांना अनुदान नाकारण्यासाठी कोणतीही व्यवस्था पोर्टलमध्ये नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन वित्त विभाग व माहिती तंत्रज्ञान विभागाशी समन्वय साधून अनुदान नाकारण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. ही प्रक्रिया जलद गतीनं राबवून येत्या दोन महिन्यात सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.
#पावसाळीअधिवेशन२०२३
पुण्याच्या सिंचननगर येथील कृषी महाविद्यालय मैदानात स्वर्गीय विनायकराव निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशन च्यावतीनं मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यानिमित्तानं उपस्थितांना संबोधित केलं. या शिबिरात तपासणीपासून ते औषधोपचार आणि शस्त्रक्रियेपर्यंत सगळंच विनामूल्य आहे. त्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी केलं.
केंद्रीय सहकार विभागाच्या कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचा शुभारंभ केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा. श्री. @AmitShah जी यांच्या शुभहस्ते आज पार पडला.
आपल्या देशातील सहकार क्षेत्राला १२० वर्षांचा इतिहास आहे. याच क्षेत्राच्या माध्यमातून विकास हा प्रत्येक गावात पोहोचला. शहरी आणि ग्रामीण भागात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकास साधण्यामध्ये सहकार क्षेत्राचं मोठं योगदान आहे. मला विश्वास आहे की, या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशात सहकार क्षेत्राला एक नवी दिशा मिळेल.
महाराष्ट्र राज्य हे सहकार क्षेत्रात प्रथम क्रमांकावर असेल असा विश्वास मी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं केंद्रीय सहकारमंत्री अमितजी शहा यांना देतो. आपल्या महाराष्ट्रात पायाभूत सुविधेसाठी ८० हजार कोटींची विकासकामं केंद्राच्या मदतीनं सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज तसंच शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा विकास हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगानं होऊ शकतो. देशाला आज नरेंद्र मोदीजी यांच्याशिवाय पर्याय नाही. जगानं त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात मी अमितजी शहा यांच्याशी चर्चा केली. लवकरच हे काम आपण मार्गी लावू असा शब्द त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला डोळ्यासमोर ठेऊन मला दिला.
राज्यातील उपसा सिंचन योजनांना सवलतीच्या दरानं वीज पुरवण्यासाठी ६७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. जनाई- शिरसाई उपसा सिंचन योजनेची दुरुस्ती, पुरंदर उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून गुंजवणी योजना मार्गी लावण्यात येईल. खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याच्या २ हजार २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्याचं नियोजन आहे. त्यामुळे साडेतीन टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील सिंचन योजना मार्गी लावण्याचेही प्रयत्न करण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी विविध योजनांमधून मिळालेल्या लाभाचा उपयोग कुटुंबाच्या उन्नतीसाठी करावा.
जेजुरी येथे 'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रम मुख्यमंत्री मा. श्री. @mieknathshinde जी आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले.
जेजुरीच्या पवित्र भूमीत मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेऊन सगळीकडे सुजलाम् सुफलाम् वातावरण निर्माण व्हावं, राज्यात मोठे उद्योग यावेत याची प्रार्थना केली. जेजुरी विकासासाठी १०९ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचं सहकार्य मिळत आहे. ८० हजार कोटींची कामं केंद्र सरकारच्या सहकार्यानं करण्यात येत आहेत. विकासासाठी महामार्ग महत्त्वाचे असून पालखी महामार्ग वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. विमानतळ, रस्ते, उद्योग, कालवे करताना जमिनीची आवश्यकता असते. विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या भविष्याची काळजी घेण्यात येईल.
श्री क्षेत्र जेजुरी येथे मुख्यमंत्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्यासह श्री खंडोबाचे पूजन केले व मनोभावे दर्शन घेतले. राज्यात सर्वदूर पाऊस पडू दे आणि माझा शेतकरी बांधव समाधानी होऊ दे. राज्यात सर्व जाती धर्मामध्ये सलोखा नांदू दे. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटावा, उद्योगपतींनी राज्यात मोठी गुंतवणूक करावी. तसंच पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, अशी प्रार्थना खंडेरायाचरणी केली.