अमृत म्हणा, विष म्हणा
काही फरक पडत नाही
वेळेवरती चहा हवा
बाकी काही म्हणणं नाही
सकाळ सकाळ उठल्या उठल्या
याच्या शिवाय पर्याय नाही
पेपर वाचत दोन घोट घेता
स्वर्ग दुसरीकडे कुठे नाही
दूध थोड कमी चालेल
पण साखरे शिवाय पर्याय नाही
हो पत्ती थोडी जास्त टाका
त्याच्या शिवाय मजा नाही
आपल्याला फार अशी गरज नसते कुणाची.. मी तर समाधानीच असतो.
रोज दिवसाचे चोवीस तास न अडखळता जातात तर आणखी काय हवंय...
कुठेही अडकून न राहता पुढे पुढे जात राहणं, हेच तर हवं असतं ना आयुष्याकडून..
गुंगावून टाकणारा सुसाट वेग... देहभान विसरायला लावणारा कामाचा उरक..
मित्रांसोबत #अर्धाकोप ..
ज्या आपल्या कधीच होत नाहीत, याचा विचार कशाला...
ज्या होत आहेत आणि ज्या झाल्या आहेत तेच अंतिम सत्य मानून ध्येय पूर्ती करावी.. कदाचीत तेच हवे असेल नशिबाला..
#अर्धाकोप
१५ डिसेंबर काय आणि २१ मे काय...
आमच्यासाठी रोजच आंतरराष्ट्रीय चहा दिवस❤️
कारण "चहाला वेळ नसते, प��� वेळेला चहा हवाच"
#आंतरराष्ट्रीय_चहा_दिवस #च्या #अर्धाकोप