आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घातलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात, ज्या ठिकाणी आपण स्वतः घरोघरी जाऊन बंडखोरांना माघार घेण्यासाठी मनवले, त्याच नागपूर मतदारसंघात, संघाचे मुख्यालय असलेल्या भागात भाजपला पराभव बघावा लागला, याचा अर्थ स्पष्ट आहे……
आपल्याला ट्विट डिलीट करावे लागले, याचे दुःख आहेच; पण आपल्या डिलीट झालेल्या ट्विटमध्ये दिसत असलेला सत्तेचा एवढा ईगो बरा नव्हे. असो, समजू शकतो. कदाचित निवडणूक बॅलेटवर झाली होती, याचा आपल्याला विसर पडला असावा, म्हणून आधीच ट्विट झाले असेल…
विजयी उमेदवार अभिजित वंजारी यांचे अभिनंदन, मतदानरूपी आशीर्वाद देणाऱ्या पदवीधरांचे आभार, लढणाऱ्या सर्व उमेदवारांनादेखील शुभेच्छा!
@Dev_Fadnavis@INCMaharashtra@wanjarri
मित्रानो,Tweetsचा महापूर येऊ द्या आज.
मागणीची तीव्रता दिसण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत.objective patternपुन्हा सुरू करण्यासाठी प्रत्येकाने tweet टाका.Account नसेल तर नवीन काढा.
18 october
10 AM to 12 PM ..
@Objective2027@Mpsc_Andolan@mpsc_office@RRPSpeaks@Nikhil_A_Patil
मा. मुख्यमंत्री महोदय
#MPSC साठी पुर्ण वेळ सचिव मिळणेबाबत
👉 श्री. महेंद्र हरपाळकर पुर्ण वेळ सचिव असताना त्यांच्याच 3 अधिकाऱ्यांनी #Druginspector चा पेपर फोडला, parking मध्ये देवाणघेवाण झाली.
गेल्या 2-3 महिन्यापासून राज्यभर विद्यार्थी रस्त्यावर उतरले हे मी सांगण्याची गरज नाही, आपणास ठाऊक आहेच.
👉इतक्या गंभीर परिस्थितीत @mpsc_office साठी पुर्ण वेळ सचिवाची Urgency असताना आपण अतिरिक्त कारभार देऊन सचिव देणार असाल तर हे " दुष्काळात तेरावा महिना " होय.
त्यांच्या busy schedule मधून ते सचिव पदासाठी असा किती वेळ देतील याचा विचार शासनाने केला नाही काय???
👉 #MPSC चा कारभार गेल्या
4-5 वर्षापासून/ साधारणतः 2021 पासून संपूर्णतः ढेपाळलाआहे.अधोगतीची वाटचाल तिथूनच सुरु झालेली आहे.
🔸 विषय फक्त एका पेपरफुटीचा नसून अनेक गंभीर गोष्टी समोर येतील नक्कीच ( तपास व्यवस्थित झाला तरच )
👉VIMP
श्री. भीमनवार @bhimanwar . हरपाळकर
हे येण्यापूर्वी #MPSC त सर्व आलबेल ( all is well )होते असे बिल्कुल नाही.
साधारणतः 2021 पासून कुंपणच शेत खात आले आहे नेहमीच.
अटकेत असलेले लेंडवे, नखाते, मराठे पुरता विषय मर्यादित नाही.त्यामुळे पकडले तितकेच व तेच चोर असे नव्हे.
🔸@Tukaram_IndIAS
यांच्याकडे मी स्वतः, इतर विद्यार्थी प्रतिनिधी, उमेदवार यांच्याकडुन माहिती सादर केली जाईलच.
परंतु तूर्तास महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा
उमेदवारांतर्फे आपणास विनंती करतोय, तात्काळ
#MPSC साठी पुर्ण वेळ सचिव नियुक्त करावा.
परिस्थिती गंभीर आहे, त्यानुसार पाऊले उचलावीत
🙏🙏
@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@INCHarshsapkal@vishwajeetkadam@satejp@SakalMediaNews@LoksattaLive@lokmat
मी समितीच्या संपर्कात आहे. (चाणक्य)
असे जर क्लासचालक म्हणत असतील तर
स्वतःच्या आर्थिक हितासाठी पाहिजे तसा अभ्यास क्रम समिती मार्फत प्रयत्न होतोय का???
#Objective
९०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी व्हि राधा मॅडम यांच्या समितीसमोर #Objective ची मागणी केली होती.
मॅडम नी देखील याबाबत सर्वांचा विचार घेऊन निर्णय होईल
बाकी सगळे #detail विद्यार्थीनी दिले आहेत
कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता #Objective बाबतचा निर्णय जाहीर करावा..
मुख्यमंत्री साहेब पूर्णतः खोटे बोलत आहेत. पेपर जानेवारीमध्ये फुटला किंवा पेपर त्यांच्या काळात फुटला नाही, हे कोणी सांगितले?
पार्किंगमध्ये पेपर कधी दिला? १९ मार्च, २० मार्चला दिला गेला. शिवाय, परीक्षेपूर्वी पेपर फुटला, असे FIR मध्ये स्पष्टपणे नमूद आहे. तेव्हा आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
आयोगाचे अध्यक्ष हटवण्यासाठी राज्य सरकारने केवळ राज्यपालांना कलम ३१७ अंतर्गत पुढील कारवाईसाठी महामहिम राष्ट्रपतींकडे विनंती करण्याचा सल्ला द्यावा. राज्यपाल अथवा राज्य सरकारला कलम ३१७ नुसार चौकशी करण्याचा अधिकारही नाही आणि तसे बंधनही नाही. चौकशीचा अधिकार केवळ सर्वोच्च न्यायालयाला, तेही महामहिम राष्ट्रपतींच्या आदेशानंतर आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, भ्रष्ट भीमनवरांसाठी कर्णाची मैत्री निभावू नका. राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या आणि आयोगाच्या अध्यक्षांना कलम ३१७ नुसार हटवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ठराव करा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #पेपरफुटी
#MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha
फडणवीस, मध्यरात्री नेमकी कशाची भीती वाटत आहे?
आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विभागाच्या आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आदिवासी विद्यार्थी मुंबईत दाखल झाले आहेत.
मात्र, मध्यरात्री ३ वाजता, मुंबई पोलिसांकडून या विद्यार्थ्यांना मध्येच अडवण्यात आले. विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले, त्यांची धरपकड करण्यात आलीय.
इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांवर दडपशाही करत त्यांना धमकावले जात असून, “केसेस करू” अशी धमकी दिली जात आहे. विद्यार्थ्यांना घेऊन आलेली एक बसदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून, विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्यात आले आहे.
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी आलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर आंदोलन सुरू होण्याआधीच अशा प्रकारे दडपशाही करणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध!
सुलतान फडणवीस,
विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी पोलिसी बळाचा वापर करून त्यांना धमकावणे म्हणजे लोकशाही मूल्यांची गळचेपी आहे.
विद्यार्थ्यांना धमकावून त्यांचा आवाज दाबता येणार नाही!
आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या या लढ्यात काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे!
@MahaPolice@Dev_Fadnavis@drashokuike_mla
In solidarity with all MPSC aspirants and @RRPSpeaks, who is leading the agitation for their rights.
More than 20 lakh MPSC aspirants have been affected by repeated paper leaks and are demanding the resignation of the MPSC Chairman.
The govt must listen to these young people and address their demands. They are the future of Maharashtra.
The Cockroach Janta Party stands firmly with all MPSC aspirants in their fight for justice and accountability.
@andharesushama
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने होत होती.
आज मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकतेने समजून घेतल्या असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास आहेच.
यासोबतच राज्यसेवा तसेच इतर परीक्षांच्या Objective Pattern ची विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करण्यात आलेल्या 75,000 जागांच्या भरतीबाबतही मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्याचा विचार हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम असला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मकतेने संवाद साधून त्यावर मार्ग काढण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच महत्त्वाचा आहे.
विद्यार्थीहितासाठी संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक मार्ग हाच आमचा प्रयत्न.!
:- निखिल पाटील
@Dev_Fadnavis@mpsc_office@CMOMaharashtra