🔶मा.गृहमंत्री महोदय, @Dev_Fadnavis महाराष्ट्राचे भावी #PSI हरवले आहेत.तात्काळ शोधून द्या.
दोन दिवसापूर्वी @mpsc_office ने
प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अराजपत्रित गट-ब 2025 जाहिरातीत,
👉#PSI :- ZERO post
#SR:- ZERO
#ASO :- 03
#STI :- 279
पदे आहेत.
🔶 महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त झाला की काय ???
महिला अत्याचारात अग्रेसर ,कायदा सुव्यवस्थेचे लक्तरे दररोज वेशीवर टांगले जात असताना ,कार्यरत पोलीस प्रशासनावर प्रचंड कामाचा ताण असताना जाहिरातीत चक्क #PSI च्या शून्य जागा??????
बाकी काही नाही तर निदान
विधिमंडळातील मारामारी संपवायला
तरी भरती करावी लागेल ना.
🔶 मा.मुख्यमंत्री महोदय
2024 जाहिरातीत #MPSC कडे पाठवलेले 441 PSI मागणीपत्रक
लाडक्या बहीण योजनेमुळे परत मागवून
त्याला 50% कपात करणारे गृहमंत्र्यांना
2025 साठी एकही PSI पद द्यावे वाटत नाही ???????????
🔶 महसूलमंत्री @cbawankule महोदय आपल्या खात्याला 2024 मध्ये दुय्यम निबंधक श्रेणी -1 /मुद्रांक निरीक्षक एकही पद नको होते.
2025 मध्ये पण भरती नकोच का ?
सलग दोन वर्षे #SR ZERO post??????
गोरगरीबांच्या आयुष्याचा खेळ मांडला तुम्ही सर्वांनी.
🔶 सहायक कक्षाधिकारी #ASO फक्त 3 जागा
( #MPSC कार्यालयासाठी फक्त )
@CMOMaharashtra ला सहायक कक्षाधिकाऱ्यांची गरज संपली की काय ???
इकडे pay scale S 14 वरून S -16 वर आणायचा व जाहिरातच काढायची नाही.
किती हा दुटप्पीपणा ???????
🔶 @AjitPawarSpeaks दादा
279 पदांची #STI जाहिरात आहे.
आम्हालाही कल्पना आहे की बिंदूंनामावालीनुसार मागणीपत्रक तयार होते.
परंतु इतिहासातील् ही पहिली जाहिरात आहे ज्यात 279 जागामध्ये Open General ,open Female ला चक्क
" शून्य " जागा.
2014 ते 2019 मध्ये #BJP ने अशा अनेक जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या
ज्यात जाणूनबुजून category ला वंचित ठेवून जास्तीत जास्त जागा ह्या open ला असायच्या
👉उदा:- 2016 मध्ये काढलेली 750 PSI
पदभरती
ज्यात open ला 566 जागा
OBC, NT C, NT D ला ZERO
शून्य जागा
( category वर फक्त अन्याय)
झ
👉 पण यावर्षी अन्यायाचा प्रवास खुल्या प्रवर्गाला शून्य जागावर येऊन थांबला.
बरं का,
@AjitPawarSpeaks दादा
काँग्रेस आघाडी सरकार व महाविकास आघाडी सरकार असताना पण बिंदूनामावाली प्रकार होताच ना.
तेंव्हा सर्वसमावेशक जाहिराती प्रसिद्ध होतात तर #BJP सत्तेत असताना हा प्रवास शून्यावर येऊन का थांबतो ?????
आणि हो दादा स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी हे किती वर्ष ऐकायचं
की वित्त विभागाने मंजुरी दिली नाही म्हणून ह्या जागा आल्या नाही,त्या जागा आल्या नाही ?????????
तूर्तास् इतकंच......
बाकी स्पर्धा परीक्षा उमेदवार अति अन्याय सहन केल्यावर काय करतात हे वेगळं सांगणं नकोच.
धन्यवाद
@mieknathshinde@maha_governor@NANA_PATOLE@INCHarshsapkal@atullondhe@INCMaharashtra
जा.क्र.११७ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२५ काल प्रसिद्ध झालेल्या या जाहिराती मध्ये
राज्यकर निरीक्षक 279 पदापैकी 0 पदे खुला प्रवर्गासाठी साठी देण्यात आले आहेत.
अशी कशी आणि कोणती बिंदूनामावली वापरली शासनाने?
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#शून्यSTI
फडणवीस साहेब आपले शब्द कधीच पूर्ण करत नाहीत, हा व्हिडिओ मागील पावसाळी अधिवेशनातील आहे.
नोकरभरती मधील गट-क पदाच्या सर्व स्पर्धा परीक्षा 06 महिन्यात टप्याटप्याने MPSC कडे वर्ग होतील : देवेंद्र फडणवीस
पावसाळी अधिवेशन पार पडून वर्ष झालंय, सर्व गट-क पदाच्या जागा अजूनपर्यंत MPSC कडे वर्ग झालेल्या नाहीत. खासगी कंपन्यांमार्फतच हजार-हजार रुपये घेऊन भरती सुरू आहे. फडणवीस साहेब किमान स्वतःच्या शब्दांची तरी पूर्तता करा.
@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks@Awhadspeaks@INCHarshsapkal@AjitPawarSpeaks@supriya_sule@mpsc_office@satejp@AbhiPawarBJP .
मुख्यमंत्री साहेब @Dev_Fadnavis आपण गृहमंत्री या पदाचा चार्ज घेतला की जे पेपर फुटी मध्ये सहभागी होतात ते खूप खुश होतात कारण त्यांना माहिती आहे तपास काही होतच नाही. नुसते नावाला FIR होते आणि जे सुरवातीला पकडले जातात तेवढेच आरोपी राहतात त्याच पुढे काय होते हे सर्वांना माहिती आहे. आपली निष्क्रियता यांनी चांगली ओळखली आहे कृपया आपल्या खात्याकडे लक्ष द्या. आपण स्वतः मागील सरकार मध्ये गृहमंत्री असताना कबुल केले होते 48 FIR झाल्या आहेत मग एकदा त्या 48 केस ची प्रोग्रेस काय झाली ते पहा पण वरवरचे नका पाहू स्वतः लक्ष देऊन पहावे मग तुम्हाला समजेल आपण किती निष्क्रिय आहोत आणि मुलांवर किती अन्याय होत आहे.
आम्ही तलाठी भरतीचा घोटाळा उघडकीस आणला यात 200 बोगस मुले सापडली असती. सुरवातीला धाराशिव जिल्ह्यातील पहिले 2 टॉपर आम्हीच पकडून दिले आणि शेवट पर्यंत तेच आरोपी झाले त्याच्यापुढे तपास गेलाच नाही. म्हणजे पुरावे आम्हीच दिले, आरोपी आम्हीच सांगितले मग पोलीस करताय काय? धाराशिव पोलिसांनी पैसे खाऊन तलाठी भरतीची केस दाबली आणि कसलाच तपास केला नाही. परीक्षा ह्या ऑनलाईन असतात याचा तपास वेळेत केला तरच योग्य कारवाई होते पण आपली निष्क्रिय यंत्रणा पैसे खाऊन मस्तावली आहे. 200 प्रामाणिक मुलांचा प्रश्न होता तो आज ते बोगस मुले नोकरी करत आहेत. याला जबाबदार फक्त तुम्ही आणि तुमचा सरकार आहे हे लक्षात घ्या.
आता पर्यंत परीक्षा बाबत ज्या पण काही FIR झाल्या आहेत त्याबाबत एक SIT स्थापन करा आणि तपास होऊ द्या एवढी माफक अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra@Devendra_Office@mieknathshinde@AjitPawarSpeaks@DGPMaharashtra @OsmanabadPolice @OmRajenimbalkr@RRPSpeaks@satejp@bb_thorat@AUThackeray@anjali_damania@waglenikhil@Dhananjay4INC
हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. शासनाने त्वरित निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. मुलांच्या कष्टांवर पाणी फेरले जाऊ नये ही शासनाला विनंती आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
उद्या, परवा आणि तेरवा अशा सलग तीन दिवसांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे ट्रेन , एसटी बसमधून फोन येत आहेत की, ते रस्त्यातच अडकले आहेत. ते उद्या परीक्षा केंद्रावरही पोहचू शकत नाहीत. जर ते परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत तर त्यांची मागील कित्येक वर्षांची तयारी अशीच वाया जाईल. या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्वरीत निर्णय घेऊन आगामी तीन दिवसांत होऊ घातलेल्या या परीक्षा स्थगित करून पुढे योग्य त्या दिवसांत या परीक्षा घ्याव्यात, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी ही मागणी करीत आहेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
प्रति,
मा. रजनीश सेठ,
अध्यक्ष,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बेलापूर.
विषय: राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ पूर्वस्थितीतच घेण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध व फेरविचाराची मागणी.
महोदय,
राज्यसेवा आयोगातर्फे आज दिनांक २६ मे २०२५ रोजी निर्गमित केलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ ही २७, २८ व २९ मे रोजीच पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
हा निर्णय पूर्णतः अघोर, अमानवी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या आणि मानसिक आरोग्याच्या विरोधात असून आम्ही त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हाय अलर्ट जाहीर केलेला आहे. पुणे, मुंबई, कोकण, विदर्भात पुर, अतिवृष्टी, वीज खंडित होणे, वाहतूक ठप्प होणे या गंभीर अडचणी विद्यार्थ्यांपुढे उभ्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये रेड अॅलर्ट असून सुरक्षित प्रवास शक्य नाही. तरीही आयोगाने हे वास्तव, विद्यार्थ्यांचे निवास-प्रवास प्रश्न, वरील संकटे आणि परीक्षा एकत्र येणाऱ्या इतर महत्त्वाच्या शैक्षणिक/स्पर्धा परीक्षा याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
ही परीक्षा “समान संधी” या घटकातील मूलभूत तत्त्वांचा आणि मानसिक स्थैर्याच्या गरजेचा स्पष्ट उल्लंघन करत आहे. सर्व विद्यार्थी ‘परीक्षा केंद्रावर उपस्थित राहतीलच’ हे गृहीतक आयोगाने कसे घेतले?
या निर्णयामुळे ग्रामीण, महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील उमेदवारांवर अन्याय होतो आहे.
आपल्या प्रसिद्धीपत्रकातील पुढील विधाने खासकरून धक्कादायक आहेत:
“परिस्थितीचा परिणाम उमेदवारांच्या परीक्षा उपस्थितीवर झाल्यास, त्याची जबाबदारी उमेदवारांची असेल.”
ही भाषा म्हणजे एका सार्वजनिक आयोगाने जबाबदारी झटकून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवावर परीक्षा देण्यास भाग पाडणं आहे.
म्हणूनच, आम्ही खालील मागण्या अत्यंत ठामपणे मांडत आहोत:
१. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ तत्काळ पुढे ढकलावी.
२. परीक्षेची नवी तारीख एक आठवड्यांनंतर जाहीर करावी जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना योग्य नियोजन करता येईल.
३. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, समानता व मानसिक स्वास्थ्य या तत्त्वांचा विचार करून आयोगाने स्वतःहून पुढाकार घ्यावा.
विद्यार्थ्यांचे आयुष्य, मेहनत, आणि स्वप्ने आयोगाच्या नियोजनशून्यतेमुळे उध्वस्त होणार असतील, तर आम्ही सामाजिक, कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने याविरोधात आवाज उठवत राहू.
आपण हा निर्णय त्वरित मागे घ्यावा व नव्याने निर्णय घ्यावा ही विनंती नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आमची ठाम मागणी आहे.
आपला विश्वासू,
धनंजय शिंदे
मो. ९८६७६९३५८८
प्रत,
मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य
मा. हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी
@mpsc_office@Dev_Fadnavis@INCHarshsapkal@INCMaharashtra@Drsuvarnas@Mpsc_Andolan@CMOMaharashtra
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ – दिनांक: २७, २८, २९ मे
सध्या राज्यात अनेक जिल्ह्यांत सलग तीन दिवसांपासून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेषतः ज्या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षेची केंद्रे आहेत, त्या ठिकाणी High Alert जाहीर करण्यात आलेला आहे. ही परीक्षा सलग तीन दिवस चालणार आहे.
आजची परिस्थिती पाहता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मा. आयोगाने स्वतः पुढाकार घेऊन ही परीक्षा पुढे ढकलणे गरजेचे आहे. अन्यथा, या परीक्षेसाठी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची योग्य सोय करावी, ही नम्र विनंती.
कालपासून महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी अत्यवस्थ स्थिती निर्माण झाली आहे. कालच निरा कालवा फुटल्यामुळे परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पुणे-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. मुंबईत भरदिवसा अंधार पडला होता. आजच अधिकृतपणे मान्सून दाखल झाल्याचे जाहीर झाले असून, रस्ते बंद आहेत, लोकल ट्रेन सेवा विस्कळीत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या केंद्रावर पोहोचायचे तरी कसे?
विद्यार्थ्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी अशा परिस्थितीत परीक्षा केंद्रावर पोहोचणे आणि तेथे जाऊन परीक्षा देण्याची मानसिकता ठेवणे हे अत्यंत कठीण आहे. विशेषतः महिला उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
सर्व उमेदवारांना परीक्षा देण्याचा समान अधिकार आहे. वर उल्लेखित नैसर्गिक अडथळ्यांमुळे कोणत्याही उमेदवाराची संधी हिरावली जाणे अन्यायकारक ठरेल.
या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून आपण न्याय्य व संवेदनशील निर्णय लवकरात लवकर घ्यावा, ही नम्र विनंती.
@mpsc_office@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks #MPSC2024 #MPSCMain
#PostponeMPSC #SaveStudents #RainAlert #MPSCExam
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ दिनांक: २७, २८, २९ मे
सलग तीन दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य परिस्थिती असून पुढील काही दिवसांसाठी विशेषतः मुख्य परीक्षेचे सेंटर असलेल्या ठिकाणी High Alert जाहीर आहे. ही परीक्षा सलग तीन दिवस चालणार आहे.
काही ठराविक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अभ्यासाला वेळ हवा होता यासाठी परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते.
आजची जर परिस्थिती पाहता येथे तर विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे.
स्वतः मा. आयोगाने पुढाकार घेऊन ही परीक्षा पुढे ढकलली पाहिजे अन्यथा या सर्व विद्यार्थ्यांची सोय तरी केली पाहिजे.
कारण कालपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे, विद्यार्थ्यांसाठी आता त्यांची बाजू मांडणं महत्वाच आहे...
काल निरा कालवा फुटल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे,
पुणे सोलापूर हायवे पाण्यामुळे ठप्प पडला आहे,
मुंबईत भर दिवसा सर्वत्र अंधार पडला आहे आजच येथे मान्सून दाखल झाला आहे, रस्ते टप्पा, लोकल ट्रेन विस्कळीत या सर्व कारणांमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे विद्यार्थी आपापल्या सेंटर वरती पोचणार तरी कसे...?
जरी विद्यार्थ्यांनी अतोनात प्रयत्न करून सेंटरवर पोहोचले तरी परीक्षा देण्याची मानसिकता त्या विद्यार्थ्यांमध्ये असेल का...?
स्वतःचा जीव धोक्यात घालून तीन दिवस परीक्षेसाठी प्रवास करणं हे आयोग आणि शासनाला अपेक्षित आहे का...? उमेदवारांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण...?
विशेष म्हणजे महिला उमेदवारांच्या तर अनेक अडचणी असतात,
त्यांच्या गैरसोयीबद्दल
महाराष्ट्र शासन ,महिला आयोग ,प्रगतशील महाराष्ट्रामधील महिला नेत्या ह्यांनी पुढे येऊन बाजू मांडणार का...?
का प्रत्येक वेळेस काहीतरी दुर्घटना झाल्यानंतरच त्यावर सहानुभूती दाखवण्यासाठी पुन्हा पुढे येणार.
हीच आजच्या आपल्या आयोगाची आणि सरकारची परिस्थिती झालेली आहे घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचा आणि फक्त सहानभूती दाखवून सर्व विसरून जा.
आपण स्वतःहून आधीच खबरदारी घेऊन होणारा संभाव्य धोका टाळू शकतो.
सर्वांना सर्व परीक्षा देण्याचा समान अधिकार आहे त्यामुळे वरील कारणांनी जर एका उमेदवाराची परीक्षा देण्याची संधी हिरावली जाऊ नये हीच अपेक्षा.
या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या धोक्याचा विचार करून न्यायिक निर्णय लवकरात लवकर घ्यावा हीच आपणास विनंती.
धन्यवाद...🙏🌱
@mpsc_office@Drsuvarnas@MahaChiefSec@Maha_GoodGovern@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@AbhiPawarBJP@OfficeofUT@AUThackeray@OmRajenimbalkr@PatilKailasB@PawarSpeaks@supriya_sule@kolhe_amol@Jayant_R_Patil@RRPSpeaks@INCMaharashtra@INCHarshsapkal@Dhananjay4INC@RealBacchuKadu@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@SakalMediaNews@lokmat@LoksattaLive
@JayMaharashtrN
पुणे जिल्हा आणि परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून संततधार आहे. यामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत उद्या होणाऱ्या अभियांत्रिकी विभागासह इतर परिक्षांना उपस्थित राहण्यात विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हे लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना माझी नम्र विनंती आहे की, कृपया आपण विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून उद्या होऊ घातलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विचार करावा. धन्यवाद.
@ChDadaPatil
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट अ पदाची 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि..
कंबाईन गट ब साठी साध्या PSI च्या जागा वाढवायच्या म्हणलं की आर्थिक परिस्थिती कारण दिलं जातं...
हा अन्याय नेहमी कंबाईनच्या पोरांवरच का ?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#Combine_2024_जागावाढ
मा. @mpsc_office लिपिक टंकलेखक OPTING OUT लिंक रविवार पर्यंत सुरू ठेवावी जे काही इच्छुक असतील शेवटच्या दिवसापर्यंत विचार करणारे OPTING OUT बाबत चा ते बाहेर पडतील,आणि अस पण शनिवार रविवार तुम्हाला सुट्टीच असते मग काय समस्या तर नाही रविवार पर्यंत लिंक सुरू ठेवायला .
#OPTआऊट23लिपिक
@Rupalispeak@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@mpsc_office आदरणीय 'ताई' तुम्ही एमपीएससी विद्यार्थ्यांच्या बाजूने सतत उभे राहता "ॲग्री"च्या वेळेस सुद्धा आंदोलन तुमच्यामुळे चालू झाले होते ती मागणी मान्यही झाली.
आत्ताची जी काही राज्यसेवेची मूळ मागणीला बगल देऊन फक्त परीक्षा पुढे ढकलणे हे योग नाही.
या संदर्भात खालील प्रमाणे मागण्या होत्या.
#राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर झालाच, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे हे यश आहे. आदरणीय पवार साहेब नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले आणि आयोगाकडे पाठपुरावा केला त्याबद्दल साहेबांचे देखील आभार!
#MPSC ने आपली जबाबदारी पार पाडली आता #combine जागावाढीबाबत शासनानेही लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
मागील काही दिवसांपासून, MPSC उमेदवारांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. आज स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राज्य समन्वयक रमेश पाटील सर यांच्या नेतृत्वात विद्यार्थी प्रतिनिधींनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
१) राज्यसेवा परीक्षा काही दिवस समोर ढकलणे.
२) MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क जाहिरातीमधील सर्व संवर्गात जागा वाढ करणे.
या उमेदवारांच्या मागण्या आहेत.
राज्य सरकार आणि आयोगाला नम्र विनंती आहे, कृपया विद्यार्थांच्या मागण्यांना गांभीर्याने घेऊन आमच्या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात.
@mpsc_office@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Drsuvarnas@AUThackeray@PatilKailasB
मायबाप सरकार
गोरगरिबांच्या पोरासांठी निर्णय घ्याला का वेळ लागतोय
मा. @Dev_Fadnavis भाऊ तत्काळ @mpsc_office ला निर्देश द्या
महाराष्ट्रच भविष्य आज सकाळी पासून उन्हात बसला देवा भाऊ निर्णय घ्या आणि विद्यार्थाना दिलासा द्या
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या आदर्श मूल्यांनी अलंकृत अशी भारतीय राज्यघटना लिहून भारतात लोकशाही राज्य प्रस्थापित करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिले. हजारो वर्षांच्या गुलामीच्या बेड्या तोडून त्यांनी दलित समाजाला आणि महिलांना स्वाभिमानाचे, स्वातंत्र्याचे आणि समानतेचे आयुष्य बहाल केले. गुलामीचा आणि अन्यायाचा अंधकार दूर सारून पीडित दलितांचे जीवन प्रकाशित करणाऱ्या प्रज्ञासूर्यास जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!