@pcmcindiagovin मनपा मध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता तसेच आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग तसेच लिपिक संवर्गाची तसेच इतर हजारों पदे रिक्त आहेत. याबाबत @pcmcindiagovin ने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.
प्रति, मा. @JaykumarGore साहेब
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या हजारो पदांमुळे ग्रामीण विकासावर परिणाम होत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. कृपया #ZPRecruitment प्रक्रिया तातडीने सुरू करून तरुणांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
अनेक वेळा घोषणा करून देखील जलसंधारण विभागाचा आकृतीबंध अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Maha_GoodGovern
@mybmc किती अंत पाहताय??? गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची सुमारे 40,000 पोरं गेली 2 वर्षे चातका सारखी निकालाची वाटं पाहतायत!! @Dev_Fadnavis जी आपण स्वतः वकील आहात! मा.मुंबई हायकोर्ट स्पष्ट सांगतंय की मूळ जाहिरातीनुसार प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी कोणतीही आडकाठी नाही!! मुंबई मनपा चे कौन्सिल राम आपटे कोर्टात झालेला युक्तिवाद सांगतायत व तसा लेखी कायदेशीर सल्ला द्यायला तयार आहेत पण गेली 2आठवडे @TawdeRitu ताई संबंधित अधिकाऱ्यांना सांगतायत की सल्ला घ्या!! विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर ताई ज्या स्वतः अभियंता आहेत आणी प्रोटोकॉल बाजूला ठेवून राम आपटे साहेबांना भेटायला जाऊ या असं संबंधित अधिकाऱ्यांना सांगतायत, मग घोडं कुठं आडलंय?? @mybmc नैराश्यापोटी पोरांनी जर एखादं चुकीचं पाऊल उचललं तर त्याची सर्वशी जबाबदारी @DGPMaharashtra ही संबंधित मुंबई मनपा अधिकाऱ्यांची राहील याची @CPMumbaiPolice नोंद घ्यावी!!@CMOMaharashtra @mieknathshinde@SunetraA_Pawar@INCHarshsapkal@RRPSpeaks
पुणे मनपाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २२,२३,२९ तारखेला आहे आणि आज १० एप्रिल आहे.उमेदवारांना परीक्षा आहे हे वर्तमानपत्रातून समजते परंतु पुणे मनपा प्रशासनाला याबाबत अजूनही अधिकृतरित्या तारखा जाहीर करायला किंवा नोटिफिकेशन प्रसिद्ध करायला वेळ भेटत नाही का....?
@PMCPune@MDNagpure
@Kalesh_75@cbawankule@Dev_Fadnavis जे मुलं भूकरमापक भरती प्रक्रिया च्या प्रतीक्षा यादीत आहेत त्यांना सेवेत न घेता खाजगी संस्थाद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा अट्टहास कशासाठी ? खाजगी उमेदवार न घेता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देऊन त्यांना न्याय द्यावा ही विनंती. @cbawankule@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब सद्यःस्थितीत अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात पदभरती बाबत " कालबद्ध कार्यक्रम" जाहीर करून विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पुन्हा नवीन घोषणा नको ही नम्र विनंती. खालील ट्विट देखील आपलेच आहे.
राज्यात नक्की कोण कोणाला वेड्यात काढत आहे याचे उत्तर द्या आणि ५०० रुपये जिंका?
A)राज्य सरकार लोकसत्ता पेपर ला वेड्यात काढत आहे?
B)लोकसत्ता बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहे?
C)जलसंपदा विभाग वरील दोघांना वेड्यात काढत आहे की सगळे मिळून बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहेत?
अखेर राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या प्रयत्नामुळे PMC कनिष्ठ अभियंता परीक्षा पुढे ढकलली, त्याबद्दल सरकारचे आभार..
सदरील परीक्षा पुन्हा घेत असताना परीक्षा केंद्र TCS ION केंद्रांवरच घ्यावी, ही विनंती..!
@Dev_Fadnavis@mieknathshinde
@mohol_murlidhar साहेब पीएमसी JE ची एक्झाम फक्त टीसीएसआय वरती घ्या खाजगी सेंटर दिले आहे ते पण खूप दूर दूर चारशे पाचशे किलोमीटर दूरवरचे हे दुसऱ्यांदा घडतय प्लीज काहीतरी करा.
राज्यातील सर्व स्पर्धात्मक आणि भरती परीक्षा अनेक वर्षांपासून अधिकृत, सुरक्षित आणि विश्वासार्ह TCS iON केंद्रांवर सुरळीतपणे पार पडत आहेत. मात्र 25 जानेवारी 2026 रोजी होणारी पुणे महानगरपालिका ज्युनियर अभियंता परीक्षा अचानक खाजगी, कमी दर्जाच्या आणि खराब रेटिंग असलेल्या केंद्रांवर घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आणि गोंधळ निर्माण झाला आहे.
उमेदवारांकडून आधीच भरमसाठ परीक्षा शुल्क आकारूनही, स्वतःच्या शहरापासून 300–400 किमी दूर खाजगी केंद्रावर परीक्षा द्यावी लागणे हे अत्यंत गैरसोयीचे व अन्यायकारक आहे. प्रवासाचा खर्च, राहण्याची सोय, वेळेची उधळपट्टी, धावपळ आणि मानसिक ताण या सर्वांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या तयारी व आत्मविश्वासावर होत आहे.
यापूर्वी अनेक भरती परीक्षांमध्ये खाजगी केंद्रांवर तांत्रिक बिघाड, गैरप्रकार, अव्यवस्था आणि व्यवस्थापनातील त्रुटी दिसून आल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास आधीच कमी झाला आहे. अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिका सारख्या महत्त्वाच्या भरती प्रक्रियेसाठी खाजगी, कमी दर्जाच्या केंद्रांचा वापर करणे हे पूर्णपणे अव्यवहार्य आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे.
आज राज्यभरातील हजारो उमेदवार अचानक जाहीर झालेल्या दूरच्या केंद्रांमुळे त्रस्त आहेत. खाजगी केंद्रांचा निर्णय तातडीने मागे घेऊन परीक्षा केंद्रांचे पुनर्नियोजन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसानीसाठी पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील. या संपूर्ण लढ्यात NSUI विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभी आहे. अधिकृत TCS iON केंद्रांवरच परीक्षा घ्या. विश्वास, सुरक्षितता आणि पारदर्शकतेशी तडजोड मान्य नाही.
यावेळी NSUI चे महासचिव निशांत देशमुख, प्रदेश महासचिव अँड. कौस्तुभ पाटील,कृष्णा साठे, आदित्य भिसे, NSUI चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@Maharashtransui