डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. महसूल विभागाने आचारसंहितेमध्ये तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली असताना देखील जलसंपदा विभागातील काही अधिकारी आचारसंहितेचं कारण देत असल्याचं समोर येत आहे. वास्तविक पाहता आचारसंहितेदरम्यान नियुक्त्या देण्यावर मर्यादा असल्या तरी निकाल लावण्यावर नाहीत, त्यामुळे जलसंपदा विभागाने निवड यादी जाहीर करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तात्काळ दिलासा द्यावा व विद्यार्थ्यांची फरफट थांबवावी ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@Deepakk75058621
ZP उर्वरित परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे.
@girishdmahajan
WCD परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर होणार?
पुरवठा निरीक्षक वेळापत्रक नाही , आदिवासी विभाग भरती वेळापत्रक नाही MIDC वेळापत्रक नाही.
या सर्व परीक्षांचं वेळापत्रक या आठवड्यात जाहीर करा....@CMOMaharashtra#सरळसेवावेळापत्रक
आरोग्य भरती २०२३
तातडीने निकाल जाहीर होऊन आचारसंहितेपूर्वी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जातील याची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी.
निकाल, कागदपत्र तपासणी आणि नियुक्त्या यासाठी विभागाने वेगळा डेस्क तयार करून गतिमान भरती प्रक्रिया राबवावी...
@TanajiSawant4MH@AjitPawarSpeaks
संदर्भ : आप महाराष्ट्र / १४०१२०२४/००१
प्रति,
मा. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
विषय : अर्थ व सांख्यिकी सरळसेवा भरती २०२३ *IBPS original निकाल (with IBPS watermark) जाहीर करणेबाबत.
महोदय,
वरील विषयान्वये आपणांस कळवण्यात येत आहे कि दिनांक ९ जानेवारी, २०२४ रोजी अर्थ व सांख्यिकी विभागाने सरळसेवा भरतीसाठी अंतिम निवड यादी जाहीर केली होती. त्यानंतर त्यामध्ये बदल करून पुन्हा १० जानेवारी, २०२४ रोजी निवड यादी जाहीर केली. यात काही चुका आढळल्या. त्याचप्रमाणे कोणतीही प्रतिक्षा यादी जाहीर केली नाही. महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या परीक्षा जेव्हा IBPS ने घेतल्या होत्या, तेव्हा त्या विभागांनी IBPS ने दिलेल्या मूळ PDF ला निवड यादी देण्याआधी जाहीर केले होते. यात सर्व पात्र (४५% पेक्षा जास्त गुण मिळवणारे) विद्यार्थांचा समावेश असतो. संचलनलायाने ही प्रक्रिया न करता थेट कागदपत्र पडताळणी साठी काही विद्यार्थ्यांना बोलावले होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
यासंदर्भात IBPS कडून आलेली मूळ PDF (IBPS water mark सहित) जाहीर करावी विद्यार्थ्यांची हि मागणी आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी विभागाशी संपर्क साधला असता सबंधित अधिकारी प्रतिसाद देत नाहीत. या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि IBPS कडून आलेली मूळ PDF (IBPS water mark सहित) जाहीर करण्याचे आपण आदेश द्यावेत, जेणेकरून सर्व परीक्षार्थींना त्यांनी मिळवले गुण व प्रतिक्षा यादी बद्दल संपूर्ण माहिती पारदर्शकपणे मिळेल.
धन्यवाद,
@AjitPawarSpeaks@Mpsc_Andolan@punyachiMPSC@degree_holders
अर्थ व सांख्यिकी विभागाने result declare केलेत पण ते ibps ने दिलेला result नाही ना ibps logo ना official stamp sign, waiting list पण नाही, आम्हाला मदत करा original result आमच्या समोर यायला हवा आम्हाला आमचे मार्क्स तरी कळू दे किती आहेत. Pdf मध्ये statistics चे spelling पण चुकीचे🙏
@RVikhePatil @AROM_GOM
तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही?
आता कोणता मुहूर्त शोधत आहे शासन?
26 जानेवारी ला नियुक्ती पत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावावा लागतो विसरले की काय?
सर्व उमेदवार वाट पाहत आहेत जाहीर करा निकाल चला पटकन .....मुहूर्त शोधत बसू नका.
#तलाठीनिकाल
जिल्हा परिषद पदभरती मधील प्रस्तावित ७०% पदांच्या परीक्षा पार पडून बराच कालावधी लोटला आहे.बाकीच्या पदांच्या परीक्षा होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे त्यामुळे @girishdmahajan साहेबांनी लक्ष घालून झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी सूचना करावी.विनंती
#ZP_Results@PuneZp
#परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION#पेपरफूटीवर_कडक_कायदा#75000_मेगा_भरती#सरळसेवा_भरती
♦️ सरळसेवा भरती च्या जाहिराती टाकल्या त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश्यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासगी परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 सरळसेवा भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्व विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने होतील तेवढे प्रयत्न करावेत हिच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी.. 🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil
नोकर भरतीच्या परीक्षा सायबर कॅफे सारख्या आयटी केंद्रात घेण्यात येतात, खासगी परीक्षा केंद्र मॅनेज होत असल्याने #परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION असावे. महाराष्ट्रातील पेपर काही दलालांव्दारे वारंवार फोडण्यात येत आहेत, राजस्थान आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर कठोर #पेपरफुटीवर_कायदा_करा
#तलाठी_भरती#75000_भरती#सरळसेवा
♦️तलाठी भरती आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली काय??🤔🤔
@RVikhePatil
आत्तापर्यंत तलाठी भरती तयारी करणारे उमेदवार केवळ घोषणा व #GR पाहून खुश झाले होते. पण लाखो तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आशेवर सरकारने पाणी फेरले आहे, असं आता त्यांना वाटतं आहे आता या तलाठी पदभरती संदर्भात उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था असून वेगवेगळे तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. यामुळे तलाठी भरती नेमकी केव्हा होते हाच मोठा प्रश्न उमेदवारांना भेडसावत आहे.
👉 यावर महसूलमंत्री यांनी तलाठी भरती कधी होणार हे पक्क सांगावं?? यामुळे 36 जिल्ह्यातील साडेचार हजाराहून अधिक तलाठ्यांचे रिक्त पदे भरण्यासाठी तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळेल.. 🙏🙏
@RVikhePatil@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे.
👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे..
👉 75000 भरती प्रक्रिया पैकी राहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही.
यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP