विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आलेली मुख्��मंत्री #युवा_कार्य_कौशल्य_विकास_प्रशिक्षण योजना संपुष्टात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील लाखो बेरोजगार युवकांना या योजनेच्या माध्यमातून गाजर दाखवून त्यांची मते महायुती सरकारने घेतली. पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही योजना संपुष्टात आणण्याचा निर्णय घेणे म्हणजे बेरोजगार युवकां��ी चेष्टा करण्यासारखे आहे. त्यांच्या भविष्याशी, त्यांच्या स्वप्नांशी खेळण्याचाच हा प्रकार होय. अनेक नियुक्त बेरोजगार युवकांना प्रतिमहा दहा हजार रुपयांचे मानधनही सरकारने अद्याप दिलेले नाही. सरकार जनतेची कशाप्रकारे फसवणूक करत आहे, हे दिसत आहे.
माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी संबंधित बेरोजगार युवकांना थकीत मानधन तातडीने द्यावे, ही योजना संपुष्टात न आणता या योजनेला तत्काळ मुदतवाढ देऊन युवकांच्या हाताला काम द्यावे.
.
.
#Youth #Maharashtra #rojgar #Skill #DhirajDeshmukh #DhirajVilasraoDeshmukh #Latur #LaturGramin
.
.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde