एकीकडे कोट्यावधींच्या जाहीरातबाजीतून तरुणांना 'बेरोजगारीमुक्त राज्याचं' असं स्वप्न दाखवायचं, आणि दुसरीकडे त्यांचं भविष्य घडवण्याच्या सगळ्या वाटा बंद करून टाकायच्या हाच दुटप्पीपणाचा खेळ भ्रष्टयुती सरकार राज्यातील तरूणाईसोबत खेळत आले आहे.
* MPSC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करावं लागतं हे चित्र अत्यंत निराशाजनक आहे !
MPSC च्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा, एकत्रित (Combine) परीक्षेसाठी जागा वाढ व्हावी आणि आणि स्पर्धा परीक्षेतील प्रक्रियेला पारदर्शक ठेवा. इतक्या मागण्या आहेत आणि या मागण्या रास्त आहेत, तरीही राज्यसेवा आयोग आणि सरकार यावर गंभीर का नाही ?
#unemployment #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra
सरकारचे प्राधान्यक्रम कशाला ?
भाषणाची संधी मिळाली नाही, निधी मिळाला नाही, केंद्रीय मंत्र्यांसोबत स्नेहभोजन आणि चहापाणी
हे सर्व विषय MPSC विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा अधिक महत्त्वाचे सरकारला वाटतात का ?
महाराष्ट्रातील #MPSC परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी लढत आहे. हे चित्र अत्यंत निराशाजनक आहे!
#राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा,
#Combine परीक्षेसाठी जागावाढ व्हावी.
इतक्या मागण्या आहेत आणि हे विषय आयोग आणि सरकारच्या अखत्यारितील असूनही दुर्लक्ष का केले जात आहे? की सरकारसाठी हे महत्वाचे नाही?
महायुती मधील तिन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल मुख्यमंत्र्यांना साधं पत्र लिहून त्यांच्या मागण्या मांडायला वेळ नाही का? की ते महत्वाचं नाहीये? आपला निधी मिळाला की काम झालं असे आहे का?
सरकारच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण होत आहे. या आंदोलनाला सरकारने हलक्यात घेऊ नये आणि मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
@PawarSpeaks साहेब आता आपलाच आधार राहिला आहे विद्यार्थ्यांना , सरकार आणि MPSC काय हालचाल करीत नाहीत , शेवटची combine एप्रिल 2023 झाली होती त्यानंतर 2025 ला होत आहे ,जागा वाढ झाल्याशिवाय गट ब 2024 निकाल लावण्यात येऊ नये , कुणाकडे दाद मागणार ,शांततेत आंदोलन केले तरी पोलीस कारवाई करतात
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ नोटीफिकेशनच्या दिवसापासून कमीत कमी ४५ दिवस पुढे ढकला.
Combine परीक्षेसाठी सर्व संवर्गाच्या जागा सरकारने आयोगाला पाठवाव्या आणि जाहिरातीत जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत.
हे सर्व निर्णय तातडीने घ्या नाहीतर आम्ही पक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू.
: मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam
महाराष्ट्राची तरुण पोरं रात्रंदिवस राज्यसेवेचा अभ्यास करत जीवनाशी संघर्ष करत आहेत. PSI सारख्या पोस्टसाठी जागा रिक्त असताना देखील सरकार जागा जाहीर करत नाही, त्यातल्या त्यात 2024 exam 2025 मधे होऊन सुद्धा तुटपुंज्या जागा. हे फक्त वेळेचं वाया जाणं नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे.दुसरीकडे, पुण्यात शांततामय मागणीसाठी जमलेल्या MPSC विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे या राज्याच्या संवेदनशीलतेवर एक काळी छाया आहे. शिक्षण, संघर्ष, मेहनत करून प्रशासनात यायचं स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय.
राज्यसेवा 2024 चा निकाल दोन वेळा लागतो, सुधारित निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांचे 45 दिवस वाया जातात, आणि तरीही मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची साधी मागणी सरकार फेटाळते? हे फक्त तांत्रिक बाबी नाहीत, हे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, संघर्षाचा आणि संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे.महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Mpsc_Andolan
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
आमची सरकारला आणि आयोगाला नम्र विनंती आहे की,
विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ नोटीफिकेशनच्या दिवसापासून कमीत कमी ४५ दिवस पुढे ढकला.
Combine परीक्षेसाठी सर्व संवर्गाच्या जागा सरकारने आयोगाला पाठवाव्या आणि जाहिरातीत जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत.
हे सर्व निर्णय तातडीने घ्या नाहीतर आम्ही पक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू.
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
आमचे आंदोलन (11 एप्रिल 2025) आणि वास्तव (TREAD)
आंदोलनातल्या दोन प्रमुख मागण्या
1. राज्यसेवेमध्ये जे तांत्रिक आणि न्यायालयीन अडचण येऊ शकतात त्या दूर करणे आणि मगच मुख्य परीक्षा घेणे त्यासाठी मुख्य परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी.
2. कम्बाईन 2024 च्या जागा वाढ कराव्या.
शेवटचा मुद्दा म्हणजे शासनाद्वारे आरोप लावण्यात येतो की हे जे आंदोलन आहे ते क्लास वाल्यांकडून करण्यात आलेल आहे परंतु या बाबींमध्ये कोणतेही तथ्य नाही. मी स्वतः राज्यसेवा मेन्सला आहे आणि मी स्वतः आंदोलन सहभागी झालो होतो.(8/9)
त्यामुळे सरकारमार्फत जाणून-बुजून आमच्या जागा कमी करण्यात आलेला आहेत असे आम्हाला वैयक्तिक वाटतं. आमची शासनाकडून खूप काही अपेक्षा नाही परंतु आमच्या हक्काच्या 441 जागाचे मागणी पत्र पाठवलं होतं तेच परत पाठवावं आणि PSIच्या तसेच कम्बाइन जागा वाढ कराव्या.(7/9)
आणि 441 जागाच्या ऐवजी 216 जागा परत पाठवण्यात आल्या. आम्ही जेव्हा मंत्रालयात या संदर्भात चौकशी केली तेव्हा मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांमार्फत आम्हाला अशी माहिती देण्यात आली की 441 चुकून झालं होतं. चुकून एक दोन जागा वाढू शकतात 200 जागा कशा काय वाढणार? (6/9)
आमची छोटी मागणी आहे की सर्व तांत्रिक न्यायिक मुद्दे सोडून मगच राज्य सेवा मुख्य परीक्षा घ्यावी.
दुसरा मुद्दा म्हणजे कम्बाईन 2024 जागा वाढ.
गृह विभागाद्वारे PSI पदासाठी 441 जागाच मागणी पत्र पाठवलं होतं परंतु आरक्षणाची बिंदू नियमावली बदलण्यासाठी ते मागणी पत्र परत गेलं. (5/9)
सर्व परीने प्रयत्न केला परंतु आयोग याची दखल घेण्यास तयार, ना सरकार. सर्वांना परीक्षा 26 एप्रिल ला घ्यायची आहे हा एक प्रकारे परीक्षा रेटून घेण्याचा मुद्दा आहे. भविष्यात ही प्रक्रिया न्यायालयात अडकू शकते आणि आम्हाला अनेक वर्ष जॉइनिंग मिळणार नाही म्हणून आमचा हा प्रयत्न होता. (4/9)