आशाताई पवार...
सगळ्यात जास्त काळजी वाटते ती या माऊलीची...
जिवाचा तुकडा, आयुष्याचा - भविष्याचा आधार गेला...
आपल्या जिवंतपणी मुलाचा मृत्यू या माऊलीला पाहावा लागला...
शेवटचा स्पर्शही ही माऊली लेकाला करु शकली नाही... नियतीने ती संधी ही दिली नाही...
१३ दिवसाचं काय घेऊन बसलात ... ही माऊली शेवटच्या क्षणापर्यंत दादांच्या आठवणीतच जगेल...
बाकी, राजकारणाविषयी या क्षणाला न बोललेलचं बरं...
बाकीच्यांनी सोडली म्हणून आपण लाज सोडू नये एवढचं... !!!
कर्म कुणाचीच पाठ सोडत नाही... हे फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवाव...
बाकी, कुणी ना इथे कायमचा... ना कुणी अमर आहे...
आज श्वासांची सोबत... उद्या मरणाची खबर आहे... !!!
#अजितदादा #अजितपवार
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
सरकार अतिशय दुटप्पी भूमिका घेते आहे. विद्यार्थ्यांचा छळ करुन सरकारला काय मिळणार आहे ?
पण, जर ७ महिन्यांपासून PSI परीक्षेबाबत विद्यार्थी तुमच्याकडे मागणी करत आहेत, फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आहे तर मग विद्यार्थ्यांचे हाल का केले जात आहे ?
सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा आम्ही निषेध करतो. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब फाईलवर सही करावी आणि जीआर काढावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
अन्यथा, खबरदार हे आंदोलन इथे थांबणार नाही. न्यायासाठी हे आंदोलन आहे, न्याय मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही.
#PSIवयवाढ_1वर्ष_GR
#PSIवयवाढ
#MPSC
#विद्यार्थ्यांसोबतकाँग्रेस
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात 29 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीला ७ महिन्यांचा प्रशासकीय विलंब झाला, यामध्ये विद्यार्थ्यांचा काय दोष? सरकारच्या या दिरंगाईमुळे आणि गलथान कारभारामुळे अनेक पात्र गुणवत्ताधारक परीक्षार्थी 'ओव्हरएज' होऊन संधी गमावत आहेत. हा त्यांच्या भविष्यावर झालेला अन्याय आहे. अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये आले आहेत.
सरकारने प्रशासकीय चुकीची शिक्षा उमेदवारांना देऊ नये. गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थी वयोमर्यादेत वाढ करण्यासाठी सरकार दरबारी विनंती करत आहेत मात्र अजूनही सरकारने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. परीक्षार्थींच्या मागणीनुसार सरकारने तत्काळ वय मर्यादा कालावधी 1 जानेवारी 2025 गृहीत धरून परीक्षार्थी उमेदवारांना न्याय द्यावा.
परीक्षेची तारीख जवळ आलेली असताना विद्यार्थ्यांना कोणताही ठोस निर्णय न देता आशेवर झुलवत ठेवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांनी कित्येक वर्षांपासून केलेली मेहनत वाया जात आहे. सरकारने या सगळ्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, अन्यथा युवकांचा स्पर्धा परीक्षा यंत्रणेवरील विश्वास पूर्णपणे उडेल.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office
M.P.S.C विद्यार्थ्यासाठी परीक्षेची जाहिरात 7 महिने उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोगटात बसत नसल्याने परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाला,सर्व अधिकार्यांशी संपर्क करून तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
#mpsc
🔥 #PSI_परीक्षा अवघ्या ३ दिवसांवर!
वयोमर्यादा वाढीचा निर्णय तातडीने घ्या.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीवर अजूनही तोडगा नाही. महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुद्दामहून PSI वयोमर्यादा वाढीचा निर्णय लांबवत आहेत.
राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी चालवलेला हा क्रूर खेळ आहे.
ही केवळ निष्क्रियता नाही तर ही महायुती प्रणित अन्यायाची नीती आहे. मात्र सुशिक्षित विद्यार्थी हा अन्याय अजिबात सहन करणार नाहीत.
निवडणुकीत मतांसाठी तरुणांची आठवण येते,
पण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आला की फडणवीस सरकार निर्दयीपणे पाठ फिरवते.
हा प्रश्न प्रशासनाचा नाही, तर राजकीय इच्छाशक्तीचा आहे.
आणि ही इच्छाशक्ती महायुती सरकारकडे अस्तित्वातच नाही.
सरकारने ताबडतोब निर्णय जाहीर केला नाही,
तर काँग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरेल.
#PSI परीक्षार्थी एकटे नाहीत, काँग्रेस त्यांच्यासोबत उभी आहे.
🔥 हा लढा नोकरीचा नाही,
हा लढा तरुणांच्या स्वाभिमानाचा आणि न्यायाचा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
परीक्षेला काही दिवस उरलेत आणि सरकार अजूनही निवडणुकीच्या युती आघाडीत अडकलेलं आहे.विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी त्यांना काहीही देणंघेणं नाही.या मुजोरी आणि निष्क्रियतेमुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे.आता निर्णय घ्या नाहीतर विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू @CMOMaharashtra
PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा GR बाबत निर्णय होत नाहीय,
आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत निर्णय नाही झाल्यास.
विद्यार्थी गांधीवादी लढाई लढतील.🤝✊
अनुच्छेद- 19
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
PSI वयोमर्यादा वाढीसाठी शेकडो पत्रे आणि विनंत्या देऊनही सरकार ढिम्म आहे. ४ दिवसात परीक्षा असताना विद्यार्थी आजही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. विद्यार्थ्यांच्या या लढाईत माझा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल! 📢
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#MPSC #PSI_AgeRelaxation #JusticeForMPSCStudents
राज्यातील लाखो परीक्षार्थींना अभ्यासापेक्षा “न्यायासाठी” संघर्ष करावा लागत आहे.
महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ची जाहिरात तब्बल ७ महिने उशिरा निघाल्याने हजारो विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत.
फडणवीस सरकार व आयोगाच्या चुकीची शिक्षा लाखो परीक्षार्थींना का?
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis #MPSC #PSI
#महाज्योती, #सारथी, #बार्टी आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी, जागांची संख्या कमी करण्यात आली होती. सदर जागा वाढविण्यासाठी आज स्पर्धा परीक्षा समन्वय समिती तर्फे मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आलं आहे. याप्रश्नी आमचा पाठपुरावा सुरू असून, लवकरच #सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता.
@Dev_Fadnavis@save_atul@mieknathshinde@AjitPawarSpeaks@sharadlad81
विषय: महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2025 च्या जाहिरातीमध्ये जागावाढ करण्याबाबत 🙏🏻🙏🏻
STI (279 पदे) – पण Open Category = 0 जागा❌
मा. आ @AbhiPawarBJP साहेब 🙏🏻
आजही MPSC चा विद्यार्थी संकटात सापडला तर त्याला सर्व प्रथम आपणच आठवता.....
आणि त्याच हक्काने आजही सर्वजण आपणाकडे मदतीसाठी धाव घेतात...
खऱ्या अर्थाने MPSC विद्यार्थ्यांचे संकटमोचक आपणच आहात हे सबंध महाराष्ट्र जाणतो…
इतक्या दिवसांपासून अनेक Combine चे विद्यार्थी सातत्याने Combine जागा वाढीसाठी सरकारकडे मागणी करत आहेत🙏🏻
@AbhiPawarBJP सर, तुमचा हस्तक्षेप झाला, तर
#Combine_जागावाढीच्या_लढ्याला दिशा आणि वेग मिळू शकतो.
MPSC विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणीच्या क्षणी,
तुमचा पाठिंबा निर्णायक ठरलेला आहे.
#Combine_जाहिरात_2025
⏩️SR : सलग दुसऱ्या वर्षी 0 जागा.
⏩️ASO : केवळ 3 जागा, त्याही MPSC कार्यालयासाठीच.
⏩️STI : 279 जागा, परंतु Open साठी एकही जागा नाही.
⏩️PSI: 392
म्हणजेच, जे Open उमेदवार PSI साठी शारीरिक पात्रता निकषांमुळे किंवा वय मर्यादेमुळे अपात्र ठरतात, त्यांच्यासाठी संपूर्ण जाहिरातीमध्ये फक्त 1 जागा उपलब्ध आहे आणि तयारी करणारे विद्यार्थी मात्र लाखोंमध्ये आहेत.
अशा प्रचंड स्पर्धेत Open प्रवर्गातील उमेदवार कसे टिकणार?
आपल्याकडे विनंती आहे की SR, ASO, STI आणि PSI पदांची संख्या वाढवावी, जेणेकरून Combine च्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.
यामुळे 2025 ची भरती अधिक सर्वसमावेशक आणि न्याय्य ठरेल.
#Combine_जागावाढ_2025
पुन्हा एकदा धन्यवाद साहेब 🙏🏻🙏🏻
@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@AbhiPawarBJP
MPSC ची पूर्व परीक्षा 28 sept रोजी प्रस्तावित आहे. संबंध महाराष्ट्रभर परीक्षा केंद्र आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे...काही महामार्ग ही बंद आहेत ( सोलापूर - पुणे, सोलापूर- कोल्हापूर)...काही गावांना आणखी पाण्याचा वेढा आहे.. rescue operation सुरु आहे. त्यामुळे