मा. @mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा महाघोटाळा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही.
@Dev_Fadnavis महोदय,
ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा???
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे हरवल्या आहेत???
👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.
👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे !
शिक्षण सेवक म्हणून मिळणारे मानधन हे अतिशय तटपुंजे आहे. वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील अनेक शिक्षण सेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. घरभाडे, प्रवास खर्च यातच मोठा खर्च होत असल्याने कुटुंब चालविणे देखील अवघड आहे. त्यातच ३० ते ३५ वयोगटातील अधिकाधिक उमेदवारांची निवड झाली असल्याने त्यांचा सेवाकाळ देखील कमी असणार आहे. तरी राज्य शासनाने शिक्षण सेवक रद्द करून नियमित पगार सुरू करावा. तसेच प्रलंबित भरती Phase -२ देखील विधानसभा आचारसहिंतेपूर्वी पूर्ण करावी.
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
75 वा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.💐 75 हजार पद भरती चि घोषणानाच राहिली आहे. कोणती पण भरती प्रक्रिया ही नियमानुसार करण्यात आली नाही.शिक्षक भरती प्रक्रिया मध्ये 31 जानेवारी नंतर 100 gr काढले घोटाळे झाले याला जबाबदार कोण? एक तरी भरती प्रक्रिया नियमानुसार करावी.@Dev_Fadnavis
पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी डी टी एड बी एड स्डुडंट असोसिएशनच्या वतीने बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. पवित्र पोर्टलद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था मधील इंग्रजी माध्यमाच्या पदविका शिक्षकांना नियुक्त करण्याबाबतचे पत्रक तात्काळ रद्द करून गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. आज त्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच त्यांच्या मागण्यांबाबत शिक्षक आयुक्तांबरोबर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
@Mha_Teacher
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं असून इंग्रजीला प्राधान्य देताना मराठीवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ अशी मराठीची गोडवी गायची आणि मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय करायचा ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. केंद्र सरकारकडून भरती करताना माध्यमाऐवजी गुणवत्तेचा विचार केला जातो. त्याप्रमाणे राज्य सरकारने इंग्रजी-मराठी असा भेदभाव न करता गुणवत्तेवरच शिक्षक भरती करावी, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
पुरोगामी महाराष्ट्रात आता अन्याय होत असताना प्रश्न सुद्धा विचारले जाऊ नये का? अशी हुकुमशाही आणि मुजोरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही.. शिक्षणमंत्र्यांनी सर्व अभियोग्यता धारकांची माफी मागून तात्काळ गुणवत्तेनुसार #शिक्षक_भरती करावी..
@dvkesarkar@mieknathshinde@Dev_Fadnavis
शिक्षक पदाची सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या आणि संवैधानिक मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या महिला अभियोग्यताधारकाला शिक्षणमंत्र्याने जी डिस्क्वालिफाय करण्याची धमकी दिली तिचा जाहीर निषेध. हिम्मत असेल तर वेळेत भरती करून दाखवा.
@dvkesarkar@mieknathshinde#शिक्षणमंत्री_राजीनामा_द्या.
स्वतः वर कायम ‘अन्याय’ झाला असं म्हणून दुसऱ्या गटात सामील होणारे नेते जर
‘अन्याय’ होत असणाऱ्या जनतेशी असं वागत असतील तर मग कसली श्रद्धा आणि सबुरी?
राज्यात अजूनही ६५,१११ जागा रिकाम्या आहेत. असणाऱ्या शिक्षकांवर ताण आहे. मग कसला शैक्षणिक दर्जा टिकवला जातोय?
#यामिनीदळवी_आपलीअँकर
तुम्ही सत्तेत आहात म्हणून सर्वसामान्य घरातील मुलं नोकरीच्या आशेने तुमच्याकडे येतात.
तुमची सत्ता त्यांच्या जीवावर आहे. ते तुमच्यावर अवलंबून नाहीयेत.
त्यांच्याशी बोलण्याची जर ही भाषा असेल तुमची तर येत्या काळात राज्यातली जनता याच भाषेत तुमच्यासोबत बोलेल.
शिक्षणमंत्र्यांची धमकीची भाषा ऐका...
एकाही जागेची जाहिरात न काढता शिक्षक भरतीची परीक्षा घेणाऱ्या मंत्र्यांच्या अरेरावीच्या भाषेचा जाहीर निषेध 👎
बिहार वाल्यांनी तीन महिन्यात सव्वा लाख शिक्षक भरले यांचं सुरुय पोर्टल, बिंदूनामावली आणि पोकळ घोषणांचा पाऊस...
जाहिरात कधी काढणार?