महाराष्ट्रातील विद्यार्थी PSI/STI खालच्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करायचे. राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची असल्यामुळे ती परीक्षा पूर्ण व्हायला २ ते ३ वर्षे लागायची. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षक मिळायचे नाहीत, तर थेट कर्नाटक राज्यातील विद्यापीठांतून पेपर तपासून घ्यावे लागायचे.
परंतु ही अनियमित परीक्षा पद्धत मोडून काढून राज्यसेवा, इंजिनिअरिंग, एफएसओ (FSO) यांसारख्या सर्व परीक्षा एमपीएससी (MPSC) अंतर्गत अत्यंत पारदर्शक, सोप्या आणि सुरळीत बनवण्यामागे कोणाचे सर्वात मोठे योगदान असेल, तर ते तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांचे होते. त्यांनी श्री सुधीर ठाकरे साहेबांना एमपीएससीचे अध्यक्ष बनवले आणि असा एक पॅटर्न आणायला सांगितला ज्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवणारी (Student-Focused) परीक्षा पद्धत येईल.
त्यानंतर २०१२ पासून वस्तुनिष्ठ (Objective/MCQ) पॅटर्न आला आणि २०२४ पर्यंत तो एकदम सुरळीतपणे कार्यरत राहिला.
आमची मागणी आहे की: २०२५ आणि २०२६ च्या घोळानंतर २०२७ पासून Objective पॅटर्न पुन्हा आलाच पाहिजे.
@prithvrj@BaliramDoleyINC@Dhananjay4INC@Nikhil_A_Patil@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
Sunday Wisdom!"अती घाई-संकटात नेई" याचा प्रत्यय #MPSC च्या संदर्भात खालील घटनांमधून.
•वैकल्पिक विषयांसह वर्णनात्मक मुख्य परीक्षेची शिफारस जून २०२२ मधे स्विकारत तत्संबंधित जुलै २०२२ च्या घोषणेत सुधारीत योजना लगेच मुख्य परीक्षा २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय.तयारीसाठी पुरेसा अवधी न दिल्याने परीक्षार्थींचे पुण्यात मोठे आंदोलन व निर्णयाची अंमलबजावणी दोन वर्षे पुढे ढकलणे क्रमप्राप्त.
•जुलै २०२६ मधील गट क च्या जाहीरातीत पूूर्व परीक्षेेचे निर्धारीत धोरण बदलत ती ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्याचा निर्णय थेेट जाहीरातीतून घोषित.विद्यार्थ्यांंचे पुन्हा आंदोलन,शासनाचा हस्तक्षेप व निर्णयाची अंमलबजावणी २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याची पाळी.
•गैरप्रकाराची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच अन्य पर्यायांची चाचपणी न करता दि.१३ मे २०२६ रोजी 'ऑप्टींग आऊटचा' पर्याय रद्द करत बहुुसंंवर्गीय पदांसाठी प्रतीक्षा यादी न ठेवण्याचेही सुतोवाच त्याच परिपत्रकात.उप निबंधक/कर निरीक्षक इ. संवर्गात बर्याच उमेदवारांची दोन पदांवर निवड झाल्याने व पदपसंंतीचा पर्याय न दिल्याने (प्रतिक्षा यादी अभावी पदे रिक्त राहूनही संधी गमावण्याच्या भितीने) उमेदवारांत असंतोष.प्रसार माध्यमे व समाज माध्यमांतून याची दखल.परिणामी रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतून शिफारस करण्याचे नंंतर स्पष्टीकरण देण्याची आयोगावर वेळ.
•औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पुरेशी चौकशी न करता वा संयम न बाळगता लगेच गैरप्रकार न झाल्याचा निर्वाळा देणारे पत्रक व त्यात तक्रार खोटी निघाल्यास आयोगाची प्रतिमा मलीन करण्याबाबत फौजदारी कार्यवाहीची तंबी. मात्र शेवटी पेपरफुटी झाल्याची कबुली नि आयोगातील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अटकेने तोंडघशी पडण्याची नामुष्की.
तात्पर्य आयोगाची तत्परता स्वागतार्ह मात्र परिक्षार्थ्यांच्या भवितव्याला प्रभावीत करणारे निर्णय व तत्संंबधीत घोषणां ह्याचा ताळमेळ बसवतांना परिणामांचा दूरगामी व सांगोपांग विचार करणे आयोगाच्या प्रतिमेेच्या दृष्टीने हितावह!
V.राधा समितीची विश्वासार्हता तळाला नेऊन ठेवणारे वक्तव्य धर्माधिकारी यांनी केले आहे. राज्य सरकारने तत्काळ SIT नेमून समिती सोबत काही lobbying करण्यात येत आहे का यातील सत्यता पडताळून पाहावी..
#mpscobjective@Objective2027
Objective असो वा Descriptive, विद्यार्थी आपलेच आहेत!
2022-23 मध्ये जेव्हा मी Objective पॅटर्नसाठी आंदोलन करत होतो, तेव्हा Descriptive पॅटर्नची मागणी करणारे विद्यार्थीही माझ्या संपर्कात होते. आम्ही कधीही विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला नाही. दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांच्या भावना आणि मागण्या समजून घेतल्या.
आज पुन्हा Objective पॅटर्नची मागणी होत असेल आणि स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विषय V. Radha समितीसमोर मांडण्याची भूमिका घेतली असेल, तर दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांना आपापली भूमिका मांडू द्या. समिती काय निर्णय घेते, हे पाहूया.
मात्र, Descriptive चे क्लास चालवणारे काही स्वयंघोषित " चाणक्य" थेट समोर येऊन, “आम्ही V. Radha यांच्या संपर्कात आहोत, आम्ही हे करू, ते करू,” अशा प्रकारची भाषा वापरून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, तर हा प्रकार नैतिकतेला धरून नाही.
क्लासचालकांनी स्वतःच्या व्यावसायिक हितासाठी विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये हस्तक्षेप करू नये. कोणाच्या संपर्कात असल्याचा दावा करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर दबाव आणता येईल, अशा भ्रमात राहू नका.
अणि मग तस होणारच असेल तर सौ सोनार की, एक लोहार की!
आमच्यासाठी Objective आणि Descriptive या दोन्ही बाजूंचे विद्यार्थी समान आहेत. दोघांच्याही भावना आहेत, दोघांच्याही मागण्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची बाजू मांडू द्या. समितीला स्वतंत्रपणे निर्णय घेऊ द्या.
ही विनंती समजा, सूचना समजा किंवा इशारा समजा; पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नात अनावश्यक हस्तक्षेप करू नका.
विद्यार्थ्यांचा लढा विद्यार्थ्यांनाच लढू द्या. त्यांच्या भविष्याचा निर्णय क्लासचालकांच्या दबावातून नव्हे, तर विद्यार्थ्यांचे हित, गुणवत्ता आणि पारदर्शक प्रक्रियेच्या आधारे झाला पाहिजे!
#MPSC #ObjectivePattern #DescriptivePattern
@Dev_Fadnavis@VRadhaIAS@NANA_PATOLE@INCHarshsapkal@vishwajeetkadam@satejp
MPSC च्या भोंगळ कारभारावर मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित..!
आयोगाच्या जुन्या कागदपत्रांच्या विल्हेवाटीचा विषय काल मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या तात्काळ निदर्शनास आणून दिला. यावेळी त्यांनीही आयोगाच्या या कारभाराबाबत चिंता व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
मुळात, चौकशीच्या पार्श्वभूमीवर जुन्या कागदपत्रांच्या विल्हेवाटीचा निर्णय घेतलाच का गेला? GR मागे घेतला म्हणजे जबाबदारी संपत नाही. या निर्णयामागील कारणं स्पष्ट झाली पाहिजेत आणि संबंधित कागदपत्रे सुरक्षित राहिली पाहिजेत.
MPSC हा अधिकाऱ्यांचा कारभार नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला विषय आहे.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे; आता गरज आहे ठोस कार्यवाहीची आणि जबाबदारी निश्चित करण्याची.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे तर तो न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील..!
- निखिल पाटील
#MPSC #विद्यार्थीहित #देवेंद्रफडणवीस
MPSC ला जुनी कागदपत्रे रद्दी काढून नष्ट करण्याची एवढी घाई का झाली आहे? एवढा ‘चक्रम’पणा का? न्यायिक चौकशी आयोगाचा आणि मा. तुकाराम मुंडे साहेबांच्या धाकाचा हा परिणाम आहे का? आयोगाचं संपूर्ण शुद्धीकरण करायचं असेल तर सर्व जुनी कागदपत्रं देखील तपासणं गरजेचं आहे, तरच सत्य बाहेर येईल. त्यामुळं आयोगाच्या सचिवांनी किंवा सरकारने तत्काळ दखल घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत रद्दी नष्ट करण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्याच्या सूचना द्याव्यात...!
@Dev_Fadnavis@mpsc_office@Tukaram_IndIAS
#MPSC #MPSC_आयोग
विजय विद्यार्थी एकजुटीचा…
विजय विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा…
विजय विद्यार्थ्यांच्या चिकाटीचा…
महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या मार्गाने गेल्या अकरा दिवसांपासून पुण्यात सुरु असलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला अखेर यश आलं. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सत्याग्रहाला भेट देऊन आंदोलकांशी यशस्वी चर्चा केली आणि २०२१ पासूनच्या सगळ्या पेपरफुटीच्या चौकशीसाठी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ च्या चौकशी कायद्यानुसार न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना केली. विशेष म्हणजे आयोगाच्या सचिवपदी स्वच्छ प्रतिमेचे आणि धडाडीचे सनदी अधिकारी मा. तुकाराम मुंडे साहेब यांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये न्या. पी. डी. नाईक, पोलीस अधिकारी लखमी गौतम, सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांचाही समावेश आहे. ही चौकशी पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी विद्यार्थ्यांच्या दबावामुळं MPSC अध्यक्ष भिमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं येत्या दोन महिन्यात चौकशीच्या माध्यमातून ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होऊन आयोगातील सर्वच आजी-माजी भ्रष्ट अध्यक्ष, सदस्य आणि अधिकारी या सर्वांचाच खरा चेहरा पुढं येईल.
महत्त्वाचं म्हणजे यापुढील सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा, राजस्थानच्या धर्तीवर १०० रुपयांच्या कार्डवर वर्षभरातील सर्व परीक्षा घेण्याचा, वेळेत निकाल, प्रतिक्षा यादी लावणं, रिक्त जागा भरणं, जागांमध्ये वाढ यासह विद्यार्थ्यांच्या इतर १४ मागण्याही सरकारने मान्य केल्या. तसंच विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचं आणि विद्यार्थी, क्लासचालक व टेलिग्राम चॅनल चालक यांना दिलेल्या नोटीसाही मागे घेण्याचं सरकारने मान्य केलं. हा विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक एकजुटीचा विजय आहे. याबाबत सत्याग्रह सुरु असताना उपोषणाला बसलेले आणि गेली अकरा दिवस रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन! विद्यार्थी सत्याग्रहाची सांगता अशा प्रकारे गोड होताच पुण्यातील एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनस्थळी असलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला… हा जल्लोष आणि हा आनंद शब्दांच्या पलिकडे होता, यातूनच विद्यार्थी या भ्रष्ट व्यवस्थेला किती वैतागले आहेत, हेच स्पष्ट होतं.
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेले सर्वपक्षीय नेते मंडळी, आदरणीय पवार साहेब, खा. सुप्रियाताई, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, सोशल मिडिया इन्फ्ल्युएन्सर, माध्यमांचे प्रतिनिधी, सोशल मिडियात व्यक्त होणारी मंडळी यांच्यासह या आंदोलनातील सर्व संयोजक, त्यांचे सर्व सहकारी, क्लास चालक या सर्वांनी दिलेल्या पाठबळाचं हे यश आहे. याबाबत या सर्वांचे आभार! सरकारचा दबाव असतानाही सहकार्याची भूमिका घेतलेले पोलिस प्रशासन तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनातून यशस्वी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणारे मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांचेही आभार! आंदोलनादरम्यान, सामाजिक दायित्त्वाच्या भावनेतून विद्यार्थ्यांच्या जेवणाची काळजी घेणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात मंडळींचेही मनापासून आभार..!
आता सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे चौकशी आयोगाकडून वेळेत निष्पक्ष पद्धतीने चौकशी होईल आणि MPSC सारख्या महत्त्वाच्या संस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड मुळासकट काढून या संस्थेला पुन्हा पुनर्वेभव प्राप्त होईल आणि या संस्थेच्या माध्यमातून राज्याला गुणवत्ता असलेले प्रामाणिक अधिकारी मिळतील, असा विश्वास आहे.
या आंदोलनाचा एक भाग होण्याची संधी विद्यार्थ्यांनी विश्वासाने दिली याबाबत त्यांचे मनापासून आभार..!
#MPSCविद्यार्थी_सत्याग्रह #MPSCProtest
#विद्यार्थी_एकजूट #सत्याग्रहाचा_विजय
#विद्यार्थ्यांचा_विजय
माथाडी कामगार निरीक्षक परीक्षेत Normalisation च्या नावाखाली मोठा घोळ झाला असून, ठराविक सेंटर्सवरील ठराविक विद्यार्थ्यांना फायदा देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी दिलेल्या कागदपत्रांवरून दिसून येत आहे. संबंधित विभागाने याबाबत तत्काळ खुलासा करावा. परीक्षांमध्ये असे घोळ अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.
पुणे में पिछले 6 दिनों से MPSC के छात्र आयोग के अध्यक्ष के इस्तीफे की मांग को लेकर आंदोलन कर रहे हैं। कुछ छात्र अपनी मांगों को लेकर अनशन पर भी बैठे हैं। पेपर लीक जैसी घटनाओं की वजह से हजारों विद्यार्थियों के सपने टूट रहे हैं। वर्षों की मेहनत, समय और पैसा दांव पर लगाने वाले इन विद्यार्थियों के भविष्य के साथ खिलवाड़ हो रहा है।
यह लड़ाई सिर्फ MPSC के छात्रों की नहीं, बल्कि महाराष्ट्र के उन तमाम युवाओं की लड़ाई है, जो ईमानदारी और मेहनत के बल पर अपने भविष्य का निर्माण करना चाहते हैं। इन विद्यार्थियों के अधिकार और उनके भविष्य की लड़ाई में आज मैं भी उनके साथ शामिल हो रहा हूँ।
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#भिमनवारांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे
#आता_माघार_नाही #MPSCProtest
यह पुणे में कल रात 11 बजे की तस्वीर है... पेपर लीक से परेशान हज़ारों छात्र नेशनल मीडिया कि नज़रों से दूर आंदोलन कर रहे हैं.. सुबह 4 बजे तक वहां रहकर हमने रिपोर्टिंग की है.. पूरी खबर आज शाम 7 बजे...
देवेंद्र फडणवीस साहेब, रात्रीचे ११:३० वाजले तरी हजारो विद्यार्थी आपल्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढत आहेत. हा केवळ विद्यार्थ्यांचा आक्रोश नाही, तर त्यांच्या भविष्याची चिंता आहे.
स्वतःच्या हक्कासाठी तरुण पिढीला रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरावे लागणे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. MPSC सारख्या संस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी राजीनामा द्यावा, ही विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे.
@Dev_Fadnavis
#StudentProtest #StudentPower #MPSC #MPSCStudents #StudentsRights #विद्यार्थीआंदोलन #MPSCChairman
एमपीएससीमधील दिरंगाई व गैरव्यवहारांमुळे राज्यातील तरुण नैराश्य आणि चिंतेत आहेत. सचिवांप्रमाणेच अध्यक्षांवरही तातडीने कारवाई करून त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे.
चौकशीच्या नावाखाली निव्वळ वेळकाढूपणा न करता आयोगाचे संपूर्ण शुद्धीकरण करावे आणि परीक्षेत पारदर्शकता आणावी.
#VijayWadettiwar #MPSC #MPSCExam #MPSCStudents #MPSCAspirants #MPSCProtest #MPSCRecruitment #MPSCTransparency