जर तुमच्याकडे पेपर तपासणीची व्यवस्था नसेल तर दुसऱ्याला कॉपी करण्याचा नादात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा आणि परीक्षांचा खेळ होऊ देऊ नका..!डिस्क्रिप्टिवच्या अट्टहासामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापातुन जावे लागत आहे @Objective2027@EA_OfficialMH#mpsc@RRPSpeaks
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सोबत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर 30 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीची प्रसारमाध्यमांनी घेतलेली दखल...
#Mpsc#mpsc#MPSC
मागील आठवड्यातील सर्व घडामोडींचे एकच उत्तर — OBJECTIVE PATTERN 2027!
🔹 Agriculture Main 2024 — पुनर्तपासणीच्या मागणीचा मुद्दा.
🔹 Engineering Services 2023 — विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात उपस्थित केलेला प्रश्न.
🔹 FSO 2023 — न्यायालयीन चौकशीची मागणी.
🔹 MPSC Main 2025 — उत्तरपत्रिका पुनर्तपासणीचा मुद्दा.
या सर्व घडामोडी एकच गोष्ट अधोरेखित करतात — MPSC परीक्षांमधील पारदर्शकता, उत्तरपत्रिका तपासणीतील विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकरणांवर लढण्यापेक्षा परीक्षा पद्धतीतच आवश्यक सुधारणा करण्याची वेळ आली आहे.
विद्यार्थ्यांचा विश्वास, समानता आणि पारदर्शकतेसाठी एकच ठाम मागणी!
🔥 OBJECTIVE PATTERN 2027 — विद्यार्थ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी!
#mpsc #MPSC #Mpsc
A kind request to the maharashtra cm @Dev_Fadnavis . As all candidates from Maharashtra are demanding more transparancy in MPSC examination, it should be taken with OBJECTIVE pattern only, students are frustrated due to continuous papers leaks , less vacancies etc
Check below,
महाराष्ट्रातील विद्यार्थी PSI/STI खालच्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करायचे. राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची असल्यामुळे ती परीक्षा पूर्ण व्हायला २ ते ३ वर्षे लागायची. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षक मिळायचे नाहीत, तर थेट कर्नाटक राज्यातील विद्यापीठांतून पेपर तपासून घ्यावे लागायचे.
परंतु ही अनियमित परीक्षा पद्धत मोडून काढून राज्यसेवा, इंजिनिअरिंग, एफएसओ (FSO) यांसारख्या सर्व परीक्षा एमपीएससी (MPSC) अंतर्गत अत्यंत पारदर्शक, सोप्या आणि सुरळीत बनवण्यामागे कोणाचे सर्वात मोठे योगदान असेल, तर ते तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांचे होते. त्यांनी श्री सुधीर ठाकरे साहेबांना एमपीएससीचे अध्यक्ष बनवले आणि असा एक पॅटर्न आणायला सांगितला ज्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवणारी (Student-Focused) परीक्षा पद्धत येईल.
त्यानंतर २०१२ पासून वस्तुनिष्ठ (Objective/MCQ) पॅटर्न आला आणि २०२४ पर्यंत तो एकदम सुरळीतपणे कार्यरत राहिला.
आमची मागणी आहे की: २०२५ आणि २०२६ च्या घोळानंतर २०२७ पासून Objective पॅटर्न पुन्हा आलाच पाहिजे.
@prithvrj@BaliramDoleyINC@Dhananjay4INC@Nikhil_A_Patil@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
आम्ही कुणाच्या बापाच्या जीवावर नाही, स्वतःच्या कष्टाच्या जोरावर अधिकारी व्हायला निघालोय!”
त्यासाठी प्रदर्शकतेचा एकच दागिना.
Only objective.
ते पण 2027 पासूनच..
नाद फक्त objective चा... 🔥🔥🔥🔥🔥
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@Dhananjay4INC#Objective.......
बायकोसोबत भांडण झालंय?द्या कमी मार्क.!
भांडण मिटले?द्या जास्त मार्क!
मार्केट पडले?द्या कमी मार्क.!
मार्केट वाढले?द्या जास्त मार्क.!
पेपरतपासणीची अशी लहरी पद्धत असल्यावर राडा तर होणारच!
टॅलेंट वाचवायचे असेल तरobjectiveपरत आणा.!
#objective2027@Objective2027@EA_OfficialMH#mpsc
आदरणीय धनंजय शिंदे सर,
मी तुम्हाला नम्र विनंती करतो की, स्पर्धा परीक्षेसाठी Descriptive की Objective पॅटर्न हवा, यावर तुमच्या Telegram चॅनेलवर एक पोल (Poll) घ्यावा.
या पोलद्वारे महाराष्ट्रातील बहुजन आणि सामान्य विद्यार्थ्यांचे खरे मत काय आहे, हे स्पष्टपणे सर्वांसमोर येईल.
धन्यवाद!
@Dhananjay4INC@BaliramDoleyINC