राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, बेरोजगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, २०१४ पासून नवीन पदभरती झाली नाही, लाखो पदे रिक्त आहेत. सरकार नवीन भरती का करत नाही ? शिक्षणव्यवस्था, आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, पण सरकारला त्याच्याशी काही एक देणं घेणं नाही. राज्याला आर्थिक दिवाळखोरीत ढकलणाऱ्या सरकारने राज्याच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. #विधिमंडळअर्थसंकल्पीयअधिवेशन
21 फेब्रुवारी रोजी अमरावतीत मृदा आणि जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती. यात परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनीच पेपर फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी एकूण 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे अमरावतीत युवक काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरत आंदोलन केलं आहे.
जलसंधारण विभाग भरती
🎯TCS कंपनीच्या विभागीय प्रमुख & इतर 2 कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रव्यवस्थापकास अटक
🎯 25 लाखाचा भाव, 11 जणांना अटक, प्रकरणाची व्याप्ती यापेक्षा मोठी.
🎯 एवढं उघड होऊनही जर TCS कंपनीस जाब विचारायचाच नसेल, तर क्लिनचीट देऊन मोकळे तरी व्हा.
@mieknathshinde
शेवटी संशय हा खराच ठरला!
#TCS कंपनी चा विभागीय प्रमुख रोहन अडसड याला जलसंधारण विभाग पेपरफुटी मध्ये अटक!
२५ लाखात नोकरी विकण्याचा घृणास्पद प्रकार!
विभागाचा अधिकारी फरार! तब्बल ११ अटकेत,अजून बरेच संशयाच्या भोवऱ्यात!
@Dev_Fadnavis साहेब तुम्हाला खरंच गरिबांच्या पोरांशी (१/२)
जलसंधारण विभाग पेपरफुटी प्रकरणात दोन दलालास अटक !
@Dev_Fadnavis साहेब,आपण स्वतः गृहमंत्री आहात,अजूनही आपल्याला पेपर फुटला म्हणून पुरावा लागतोच का?
भरती रद्द करा आणि नव्याने घ्या. निवडणुकीच्या काळात रोष ओढवून घेणे योग्य होणार नाही.
#WCD_Reexam@CMOMaharashtra@SanjayDRathods
उत्तरप्रदेश पोलीस भरतीचा पेपर फुटल्यानंतर यूपी सरकारने तत्काळ परीक्षा रद्द केली. पण आपल्या महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे-पवार सरकार इतके निगरगट्ट आहे की #तलाठी भरती, जलसंधारण #WCD भरती पेपरफुटीचे सर्व पुरावे असूनही परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाहीत. महाराष्ट्रातील परिस्थिती युपी-बिहार पेक्षाही वाईट झाली असून, जनतेने प्रस्थापितांना निवडणुकीत धक्का दिल्याशिवाय बदल घडणार नाहीत.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AUThackeray@RRPSpeaks@VijayWadettiwar@RVikhePatil@SanjayDRathods .
.@Uppolice आरक्षी नागरिक पुलिस के पदों पर चयन के लिए आयोजित परीक्षा-2023 को निरस्त करने तथा आगामी 06 माह के भीतर ही पुन: परीक्षा कराने के आदेश दिए हैं।
परीक्षाओं की शुचिता से कोई समझौता नहीं किया जा सकता।
युवाओं की मेहनत के साथ खिलवाड़ करने वाले किसी भी दशा में बख्शे नहीं जाएंगे। ऐसे अराजक तत्वों के खिलाफ कठोरतम कार्रवाई होनी तय है।
सरळसेवा भरती मधील कॉपी प्रकरणात विभागातील अधिकारी, परीक्षा घेणारी कंपनी, केंद्रचालक आणि केंद्रावरील काम करणारे कर्मचारी यांची अभद्र युती आहे.
या युतीमुळे प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या अनेक उमेदवारांच्या आघाड्या नष्ट झाल्यात.
येणारी निवडणूक पेपरमधील कॉपी प्रकरणावर झालीच पाहिजे.
सन्माननीय विरोधी पक्ष नेते विजय साहेब, अशाच प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाचा पेपर सुद्धा फुटला होता, तरीही सुद्धा कसलीही कारवाई झाली नाही आणि आता त्या उमेदवारांना नियुक्ती देत आहेत.
जलसंधारण विभाग (WCD) परीक्षेत अमरावती केंद्रावर विभागाचा अधिकारीच कॉपी पुरवताना पकडला गेलाय.
अजुन किती घोळ आणि घोटाळ्यांचे पुरावे सरकारला हवेत?
तलाठी भरतीत इतका गदारोळ होऊनही सरकार भरती रेटत असताना सध्या सूरू असलेल्या परीक्षांतील जागाही लबाडांनी बळकावल्यात.
कुंपण शेत खातंय..!
गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नोकर भरतीची वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या लाखो तरुण तरुणींचे "खलनायक" आहेत !!!
@AAPMaharashtra@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
अनेकदा सांगूनही हे गोंधळलेलं सरकार #पेपरफुटी च्या घटनांना #Serious पणे घ्यायला तयार नाही. ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाले त्या ठिकाणी सेंटर्स देऊ नका अशी वारंवार मागणी करूनही घमंडी सरकार कार्यवाही करत नसेल आणि त्याच सेंटर्सवर परीक्षा घेत असेल तर सरकारही या गैरप्रकारांमध्ये सहभागी आहे, हेच आज पुन्हा सिद्ध झालं.
आज अमरावतीत गैरप्रकार घडला, उद्या दुसरीकडे घडेल, पण हे सरकार काहींही कारवाई करणार नाही. हे सरकार विद्यार्थ्यांना गृहीत धरून चाललंय. पेपरफुटी विरोधातील या लढ्यात मी तर सोबत आहेच पण आता विद्यार्थ्यांना स्वतःही लढा उभारावा लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
वाशिम येथील पेपर फुटी प्रकरण 2 जानेवारी रोजी झाले होते, 2 जानेवारी रोजी गुन्हा नोंद झाला होता. काल आम्ही तपास अधिकारी यांच्याशी संपर्क केला त्यांनी अजून त्या मुलीला पेपर फोडून चिट्टी द्वारे उत्तर कोणी दिली हे सुद्धा शोधले नाहीये तपास काहीच झाला नाहीये जर असे असेल तर आरोपी कधी पकडले जातील आणि या असल्या प्रकरणामुळे प्रत्येक परीक्षेमध्ये पेपर फुटतात त्यांना माहिती पुढे तपासात काहीच होत नाही पेपर फोडणाऱ्यांचं मनोबल वाढते लातूरमध्ये पण असाच प्रकार झाला होता तिथे पण काहीच झाले नाहीये एवढे निष्क्रिय गृहमंत्री असेल तर हे होणारच आहे गृहमंत्री साहेब डोळे उघडा आणि बघा काय चाललय आपल्या खात्यात जर तुम्हाला गृहमंत्री पद झेपत नसेल तर ते सोडा उगाच प्रामाणिक आणि गोरगरिबांच्या मुलांच्या आयुष्याचे वाटोळ करू नका.
@TCS ला ब्लॅक लिस्ट मध्ये टाका
@Dev_Fadnavis@Devendra_Office@CMOMaharashtra@NANA_PATOLE@RRPSpeaks@VijayWadettiwar@iambadasdanve@Awhadspeaks@abpmajhatv @Dhananjay_AAP @KunalNitinRaut@LoksattaLive@ShivSenaUBT_@SVW790@supriya_sule@TV9Marathi@VBAforIndia
अजून एक घोटाळा.
5 जानेवारीला वक्फ बोर्डाची भरती परीक्षा झाली.विविध जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली.हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.60 जागांसाठी ही परीक्षा होती.
परीक्षा झाल्यानंतर पुढील 10 दिवसात निकाल लावण्यात येईल अस IBPS या परीक्षा घेणाऱ्या कंपनीने जाहीर केले होते.हा निकाल प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मेल आयडी वर पाठवणे अपेक्षित होते.
10 दिवसात निकाल लागला नाही.वाट पाहून परीक्षार्थी कोर्टात गेले.6 फेब्रुवारीला सुनावणी झाली.त्यावेळी वक्फ बोर्डाने अफेडीव्हेट दिले की,"आम्ही निकाल लावला आहे.!"
आता गम्मत पुढे आहे.
निकाल लागलाच नव्हता.बोर्डाने तो निकाल लावला 16 फेब्रुवारीला.तो ही संध्याकाळी 7.30 वाजता.त्यात ही फक्त कट ऑफ लिस्ट लावण्यात आली.म्हणजे 6 तारखेला कोर्टात शपथपत्रावर जे काही वक्फ बोर्डाने लिहून दिले होते,तो जुमला होता.
इतकंच नाही.या वक्फ बोर्डवर काम करणारे एक कर्मचारी आहेत.R.U.shaikh अस त्यांचं नाव.त्यांची मुलगी आणि जावई या दोघांची देखील निवड या वेळी करण्यात आली.
सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाठवने अनिवार्य असताना IBPS या कंपनीने फक्त 60 लोकांचेच निकाल जाहीर केले आहेत.बाकीच्या विद्यार्थ्यांना कसलाही मेल पाठवण्यात आलेला नाही.
मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत या समाजातील काही पैसेवाली मंडळी विकृत खेळ खेळत आहेत.
माननीय हाय कोर्टाला खोटं शपथपत्र सादर करणे,हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे,याचा अधिकार वक्फ बोर्डाला कोणी दिला आहे..? राज्य सरकार यावर काही कारवाई करणार आहे की नाही...?