#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्या मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी २८ ऑगस्ट रोजी सिंचन भवन पुणे येथे उपोषण सुरु केले होते. त्या दिवशी मी सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांशी भेट घेऊन, हा विषय निकाली काढण्याची विनंती केली असता ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ११ तारखेला प्रकरण न्यायालयासमोर येणार असल्याचे सांगत उपोषण सोडण्यासाठी मी विद्यार्थ्यांना विनंती केली होती, त्यानुसार विद्यार्थ्यांनी देखील उपोषण मागे घेतले होते.
परंतु, आता ११ तारखेला सुनावणीसाठी सदरील प्रकरण लिस्ट झाले नसल्याची बाब समोर आली आहे. एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात, परंतु तरीही शासनाने यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा व विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळावा हि विनंती.
एखादी गोष्ट ज्या वयात आणि वेळेत भेटायला पाहिजे तेव्हाच भेटली तरच त्यात आनंद असत
नाहीतर खिडकी जवळची सीट शेवटच्या स्टॉप आल्यावर भेटून काय फायदा.
उशीरा येणारे निकाल
उशिरा येणाऱ्या जाहिराती
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी माणूस आहे रे.
त्याच आयुष्यं इतर माणसं इतकंच असते...
कधी समजणार आहे
@degree_holders WRD_JE_2019 ही exam शासनाच्या 1998 च्या GR नुसार पार पडलेली आहे..त्यात High court, supreme court चा प्रश्नच येत नाही..exam ला अडथळे आणून काहीही साध्य होणार नाही..पण वेळ मात्र वाया जातोय..नवीन GR साठी कोर्ट मध्ये जावं..ह्या पार पडलेल्या exam साठी नाही...
#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या संदर्भात मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची भेट घेऊन हा विषय निकाली काढण्याची विनंती केली.त्यांनी देखील त्वरित जलसंपदा विभागाच्या सचिवांशी संपर्क करून सद्यस्थिती जाणून घेतली.या विषयाची सुनावणी ११ सप्टेबर रोजी असून त्यासाठी अत्यंत नामांकित वकील विद्यार्थ्यांची बाजू मांडणार असून विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर त्वरित नियुक्त्या देण्याबाबत देखील त्यांनी आश्वासित केले आहे.
न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूनेच लागणार असा विश्वास आहे.गेल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री साहेबांशी याविषयी चर्चा केली असून मी स्वता या विषयी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे.त्यामुळे सद्या सुरु असलेला पाउस व उपोषणात विद्यार्थिनी भगिनींची असलेली संख्या बघता आपण हे उपोषण त्वरित मागे घ्यावे अशी आपला मोठा भाऊ विनंती करतो.
प्रत्येक वर्षी डिग्री धारकांसाठी भरती होते पण चार वर्षांपासून एखाद्या वेळी भरती होणाऱ्या डिप्लोमा च्या भरती प्रक्रियेत खोडा घालणाऱ्या डिग्री धारकांच्या अवैध मागण्या मान्य करून गरीब डिप्लोमा धारकांवर अन्याय करणार का?#DiplomaForJE@mieknathshinde@Dev_Fadnavis@NANA_PATOLE
आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा श्री @DombivlikarRavi जी यांची भेट घेतली. "अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले राज्यातील हजारो होतकरू विद्यार्थी मागच्या ३-४ वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट - ब (अराजपत्रित) संवर्गातील व स्थापत्य
1/3