#पुणे आंबेगाव शिवसृष्टी ते सिंहगड महाविद्यालय रस्त्यावरील अंबर पार्क सोसायटी समोर रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत असून त्यामध्ये दुचाकी वाहून गेल्या आहेत. #Pune#Punenews Punerains
शरद पवार साहेबांना आज पहिल्यांदाच इतकं भावनाविवश होताना पाहिलं... कोणत्याही संकटात परिस्थितीत हा माणूस कणभरही डगमगला नाही .. पण आज दादांच्या जाण्याने भावनिक झाला...! 💔
अजितदादा समजून घेताना
अनेकदा माणसं जशी भासवली जातात तशी नसतात. नावडतीचे मीठ अळणी समजून विरोधकांनी जनमानसात अजितदादांची प्रतिमा मलीन करण्यासाठी कुठलीही कमतरता ठेवली नाही. कुणावरही झाल्या नसतील इतक्या टीका, आरोप आणि बदनामी दादांच्या वाट्याला आल्या. ऐकीव माहितीवर लोकं सहजासहजी विश्वास ठेवतात म्हणून विरोधकांनी दादांवर केवळ आरोप आणि आरोपच केले. दादा नावाचा माणूस लोकांना कधी समजूनच दिला नाही. मुळात आपल्यावरील आरोपांना महत्त्व न देता आपले काम करत राहणे, हा दादांचा स्वभाव होता. बोलणारे फक्त बोलत राहतात, काम करणारे आपल्या कामातून त्यांना उत्तर देत असतात, हे दादांच्या राजकीय जीवनाकडे पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येते.
अजितदादा हे रेडिमेड नेतृत्व नव्हते, तर ते मातीतून उमललेले नेतृत्व होते. लहानपणापासूनच लोकांची कामे करत करत त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित होत गेले. लहानपणी रानच्या वस्तीला कुठे साप निघाला तर साप पकडण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा सर्पमित्र, १९७१ च्या दुष्काळात लोकांनी सोडून दिलेली जनावरे का��ेवाडी परिसरातील शेतांमध्ये धुडगूस घालत असताना आपल्या मित्रांच्या मदतीने ती जनावरे पकडून दूरवर सोडून देणारे तारणहार, स्वतःच्या शेतात राबून टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेणारा शेतकरी, स्वतःच्या गोठ्यांमध्ये गुरांना चारा पाणी घालून त्यांचे दूध काढणारा गोपाल, पोल्ट्रीच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय करता येतो हे दाखवून देणारा व्यावसायिक, रस्त्याने जातानाही आजूबाजूच्या झाडांवर लक्ष ���ेवून त्यांची जपणूक करणारा निसर्गप्रेमी अशा अनेक रुपात दादांचे सर्वांगीण नेतृत्व तयार झाले.
एखादा व्यापक प्रश्न सोडवायचा असतो तेव्हा दादांनी कधीही राजकारण केले नाही, याची असंख्य उदाहरणे देता येतील. राज्याच्या राजकारणात मनाचा मोठेपणा ठेवून काम करणारा नेता अशी दादांची ओळख होती. आघाडी सरकारच्या काळात झोपडपट्टी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा विषय प्रतिष्ठेचा न करता केवळ प्रश्न सुटला ���ाहिजे ��ा भूमिकेवर पद सोडणारे दादा, विधिमंडळात अर्थ विधेयकावर चर्चा करण्यापूर्वी अधिकाऱ्यांच्या बैठकीत विरोधी पक्षनेता एकनाथ खडसेंना बोलावून ‘यांना तुमच्या सूचना सांगा आणि काही विधायक बदल असतील तर करुन घ्या’ असे सांगणारे दादा, राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर स्वतःच्या पक्षाच्या कोट्यातली जागा विरोधी पक्षाच्या पांडुरंग फुंडकरांना देणारे दादा, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नकार असतानाह��� सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीवर त्यांच्या मतदारसंघातील एका प्रकल्पासाठी आपल्या सिंचन विभागातून १८० कोटी रुपयांची तरतूद करणारे दादा असे सर्वसमावेशक राजकारणाचे उदाहरण घालून देणारे दादा आपल्याला कधी समजूनच दिले नाहीत.
दादांची निर्णयक्षमता प्रचंड होती. लालमहालातील वादग्रस्त दादोजी कोंडदेव पुतळा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर दादांवर प्रचंड टीका झाली, पण दादा शेवटपर्यंत खऱ्या इतिहासाच्या बाजू��े ठामपणे उभे राहिले. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षकच होते, या भूमिकेसाठी ते विरोधकांच्या अनेक टीकांना सामोरे गेले. राज्याला महसुलाची गरज असतानाही तरुण पिढीच्या भवितव्यासाठी गुटखाबंदीचा धाडसी निर्णय दादांनीच घेतला. कबड्डी विश्वचषक जिंकणाऱ्या महिला संघाला १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय असो किंवा कोरोनाच्या काळात आषाढी वारी पालखी सोहळा न काढता संतांच्या पादुका विमानाने पंढरपूरला नेण्याचा घेतलेला निर्णय असो, असे निर्णय हीच दादांच्या राजकीय प्रगल्भतेची ओळख होती.
अनेकदा दादांचा स्वभाव फटकळ असल्याचे बोलले गेले. पण दादांचा हा फटकळपणा निरागस होता. त्यामध्ये कधीही समोरच्याचे मन दुखावण्याचा हेतू नव्हता. जागेवरच एखाद्याचे काम होईल किंवा नाही हे त्याला सांगणे, याला फटकळपणा म्हणत नाहीत. समोरच्याला काम होईल आशेवर ठेवून नंतर त्याला कामासाठी हेलपाटे मा���ायला लावणे, हे त्यांना पटले नाही. बोलण्याच्या भरात आपल्याकडून चुकीने ��खादा शब्द गेल्याची जाणीव झाल्यानंतर आत्मक्लेश करण्यातही दादांनी कमीपणा मानला नाही. ज्याचे मन मोठे असते, तीच व्यक्ती असे करू शकते.
अजितदादा समजून घेणे म्हणजे काय ? अजितदादा एक माणूस होते. माणूसपणाच्या मर्यादा त्यांनाही होत्या. पण या सगळ्या मर्यादांवर मात करत निर्व्यसनी, वक्तशीर, सत्यवचनी, उत्साही, प्रसंगी कठोर, लोकाभिमुख आणि कुटुंबवत्सल राहत आपले काम चोखपणे पार पाडत राहणे, ही दादांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होती. दादांची दूरदृष्टी, काम करताना त्यांनी घेतलेले निर्णय, त्या निर्णयांचे लोकजीवनावर झालेले परिणाम, त्यामुळे झालेले बदल आणि त्यातून लोकांच्या विकासात झालेली वाढ या गोष्टीही समजून घेतल्या तर दादा समजतील.
राजकारणात ज्यांच्याकडे राजकीय डावपेचांबरोबर राजकीय सौहार्दताही असते, अशा नेत्यांपैकी अजितदादा पवार हे एक
टेक्नॉलॉजी वर खूप कमी पुस्तकं मराठी भाषेत येतात, पायथॉन सारख्या प्रोग्रॅमिंग भाषेचे ज्ञान
आता मराठी मधून ही घेता येऊ शकत 🤗😍
ऑर्डर साठी @PABKTweets यांच्याशी
संपर्क साधावा 🤗
#मराठी#पुस्तकं#टेक्नॉलॉजी
शिंदे गटाची प्रवक्त्या बघा, जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारत होती..जिल्हाधिकाऱ्यांनीच आरसा दाखवला! महायुती मधील लोकांना जिल्हाधिकारी,पोलिसाना फोन करून आम्ही कसे झापतो हे रेकॉर्ड करण्याची घाणेरडी सवय लागली आहे... #प्रशासन
कितीही पानगळ झाली असली तरीही नव्याने बहरता यायला जमायला हवं...
आयुष्याचा धडा खूप मोठा आहे म्हणून बेरजेसाठी आधी वजा होणं शिकावं लागतं...
#मराठी#पालवी#आयुष्य
अरे, UPSC पास झालेल्या शेंबड्या,
बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल, स्विमिंग अशा अनेक खेळांमधे आरक्षण नाही.
किती ऑलिंपिक मेडल मिळतात रे भारताला??
बाकी DRDO, ISRO, BARC, INDIAN OIL, RBI, SEBI अशा अनेक सरकारी PSU मध्ये आरक्षण आहे तरीही ते जगात देशाचे नाव गाजवत आहे.
थोड तरी लॉजिकल बोल.
🙏
अजूनही भारतीयांना हा माणूस समजलाच नसेल तर..येणारा काळ तुमचा तुम्हाला लकलाभ..सत्य परिस्थिती पाहून आयुष्य जगा रे.. नाहीतर माणूस तोंडावर कसा पडतोय हे दिसतया..❤️
#राहूल_सर..🇮🇳🙏
राहुल गांधी जे काय बो���ला ते आधी नीट ऐका, नंतर चिंतन मनन करा, मग निष्कर्षावर या. जर न ऐकताच रिडीक्यूल करत असाल तर तुमच्या आत्ता पर्यंत च्या सगळ्या गुणपत्रिका आणि डिग्री ची सुरळी करून त्याच्यावर बसा. तुमचं लॉजिक मेलंय.