#महापारेषण व #महावितरण भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी असून या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे तसेच या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष Contract Period रद्द करावा, या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या आहेत. ऊर्जामंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, ही विनंती…!
@Dev_Fadnavis
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
#No_GATE_For_MAHADISCOM
MAHATRANSCO RECRUITMENT-running process ❎, crawling process ✅
Patience level of aspirants has crossed its limit and resulted into the STRIKE.
#Conduct AE and ITI entry level exams before election# @Mahatranscoltd@Dev_Fadnavis@mieknathshinde@abpmajhatv @TV9Marathi@lokmat
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२७०८०४
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
ऊर्जामंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय: महावितरण मधील विद्युत अभियंता पदभरती संदर्भातील उमेदवारांच्या मागण्यांबाबत.
महोदय,
वरील विषयाच्या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येत आहे की महावितरण मधील "विद्युत अभियंता पदभरती" मध्ये ऊर्जा विभागाने टाकलेल्या अटी/शर्तीमुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याची भावना आहे. उमेदवारांच्या मागण्या पुढीलप्रमाणे.
१. GATE परीक्षेची सक्ती रद्द करावी.
२. "स्किल इंडिया" च्या आधारे मेरिटनुसार नियुक्त झालेल्या ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग अप्रेंटिस (Graduate engineer Training Apprenticeship) विद्यार्थ्यांनी आयुष्यातील एक वर्ष महावितरण मध्ये विना वेतन काम केले आहे. अशा विद्यार्थ्यांना अनुभवाच्या आधारावर महावितरण पदभरती मध्ये प्राधान्य मिळावे.
३. कनिष्ठ अभियंता पदांची जागवाढ
४. महाराष्ट्र शासनाची पदभरती असल्याने अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात यावे.
या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येत आहे कि विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा व त्यांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@Dev_Fadnavis