मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या असल्या तरीही अशा प्रकारची अट नाहीये.
अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde , मा. उपमुख्यमंत्री @dev_fadnavis व मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ही अन्यायकारक अट रद्द करून तत्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत.
मुंबई महापालिका भरतीची अन्यायकारक अट रद्द करा.
यूपीएससीत #कलेक्टर होताना जितक्या अटी नसतील तितक्या अटी मुंबई महानगरपालिकेच्या भरतीत आहेत.
पदवी/दहावीत एकही विषय राहिलेला नको, पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असला तरच उमेदवारांनी अर्ज करावा अशी अजब अट मुंबई महानगरपालिकेने ठेवली आहे.
कला, वाणिज्य, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल असे सर्वच पदवीधर अर्ज करणार आहेत, डिग्री मध्ये कधीतरी एखादा विषय राहतोच, परंतु यामुळे उमेदवारांचा अर्ज करण्याचा हक्क हिरावून घेता येणार नाही.
MPSC, UPSC, रेल्वे, किंवा कोणत्याच स्पर्धा परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट आजवर आम्ही बघितलेली नाही.
मुंबई महापालिकेने ही अट कायम ठेवल्यास भरती १००% कोर्टात अडकून पडेल कारण उमेदवारांचा परीक्षा देण्याचा हक्क कोणीही हिरावू शकत नाही.
मुंबई महापालिका प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे, कृपया अशा अन्यायकारक अटी रद्द करून तत्काळ शुद्धिपत्रक काढावे.
@mybmc@IqbalSinghChah2@AUThackeray@rautsanjay61@mieknathshinde@DrSEShinde@RRPSpeaks@iambadasdanve@VijayWadettiwar@PatilKailasB@AbhiPawarBJP@niranjandtweets@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@ShivSenaUBT_@MNVS_Adhikrut@mnsadhikrut@RajThackeray@ssaunik .
IAS अधिकारी होण्यासाठी ATKT ने पदवी पास झालेला उमेदवार असला तरी चालतो...
पण BMC च्या लिपिक पदासाठी 'पहिल्याच प्रयत्नात & 45% गुणांसह' 12, पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
@mybmc ?
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावरील https://t.co/a8tnTAc9rF या लिंकवर Recruitment>Chief Personnel Officer>Executive Assistant(Previous Designation: Clerk) Recruitment Advertise-2024 या प्रमाणे जाऊन किंवा https://t.co/M0oUELPVnC या लिंकवर देखील भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येईल. जाहिरातीतील सर्व सूचनांचे इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचन करावे.
तसेच, जाहिरातीच्या लिंकखाली ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची स्वतंत्र लिंक दिलेली आहे. ती पुढीलप्रमाणे- https://t.co/hcDEHbVNmr
कार्यकारी सहायक पदासाठी दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ मिनिटे या कालावधीदरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
#MyBMCUpdates
#Declare_Clerk_result#publish_combine_Advertisement#MPSC
♦️मा. आयोगास व शासनाला कळकळीची विनंती आहे की, विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा विचार करून लवकरात लवकर #Combine पूर्व परीक्षा जाहिरात 2024 जास्तीत जास्त पदासाठी काढावी. तसेच खूप दिवसापासून रखडलेला क्लार्क मुख्य परीक्षा 2023 चा निकाल आयोगाने लवकरच जाहीर करावा. विलंब जर होणार असेल तर निदान दोन ओळीचे प्रसिद्धीपत्रक काढून कारण कळवावे, यामुळे तयारी करणाऱ्या मुलांना पुढचे नियोजिन करता येईल.
👉 कदाचित ही क्लार्क 2023 ची परीक्षा, निकाल काही मुलांचा शेवटचा असेल. तसेच, तयारी करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेची, संयमाची परीक्षा न घेता मा. आयोगाने क्लार्क मुख्य 2023 चा निकाल लवकरात लवकर लावावा ही नम्र विनंती...🙏🙏
@mpsc_office@MahaDGIPR@CMOMaharashtra@LoksattaLive@SakalMediaNews@lokmat@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews@TV9Marathi
@mieknathshinde आपल्या बेजबाबदारपणामुळे विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागत आहे. सामाजिक न्याय मंत्री म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पाहायला वेळ आहे का आपल्याकडे? नसेल तर नैतिक जबाबदारी म्हणून स्वतः राजीनामा देऊन दुसऱ्याकडे जबाबदारी सोपवा.
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD@maha_dma@CMOMaharashtra@VijayWadettiwar@mieknathshinde@Dev_Fadnavis@DrSEShinde@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE
#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule@maha_governor
लातूर मधील तलाठी घोटाळा बाबत धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. काही जिल्ह्यातील टॉपर मुले ज्यांना 200 प्लस मार्क आहेत ते एकाच गावचे आहे शिवाय ते लातूर मधील एका सेंटर चालक चे जवळचे नातेवाईक आहेत शिवाय हे टॉपर त्याच सेंटर वर वनरक्षक भरती पर्यंत कामाला होते. किती हा योगायोग आहे. यांचा आणि अभ्यासाचा काडी मात्र संबंध नाहीये. तरी यांना 200 प्लस मार्क आहेत आणि अभ्यास करणारे विद्यार्थी वेडे आहेत लायब्ररी मध्ये अभ्यास करत बसतात आणि वेडी आशा करतात की आम्हाला सरळसेवा मधून नौकरी मिळेल. असेच प्रकार प्रत्येक जिल्ह्यात झाले आहेत. हे फक्त उदाहरण आहेत. जर लातूर मधील सेंटर ची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी केली तर सर्व सत्य समोर येईल पण यात सर्व जण सहभागी आहेत अशी शंका आहे कारण बाकीचे बरेच जन ज्यांनी लातूर सेंटर वरून परीक्षा दिली आहे आणि मार्क जास्त आहेत त्यांचे घरचे उच्च स्तरीय सरकारी अधिकारी आहे. सब मिली भगत आहे. गरिबांच्या होतकरू मुलांनी फक्त अभ्यासच करायचा का? मायबाप सरकार डोळे उघडा आणि चौकशी करा सत्य समोर येईल. जे वनरक्षक पर्यंत त्याच सेंटर वर जॉब करत होते तिथेच तलाठी च सेंटर आला आणि त्यांना 200 प्लस मार्क किती भारी आहे ना हे.
लक्ष द्या @RVikhePatil@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@maharevenue @Dhananjay_AAP @RRPSpeaks@VijayWadettiwar@SVW790@abpmajhatv@KunalNitinRaut@LoksattaLive@Awhadspeaks@AAPMaharashtra@PatilKailasB@ShivSenaUBT_@TV9Marathi@VBAforIndia@zee24taasnews@ShivsenaUBTComm@AUThackeray@waglenikhil