स्पर्धा परिक्षा देणाऱ्या प्रामाणिक युवांवर अन्याय होऊ नये म्हणून राज्य सरकारने पेपरफुटीविरोधात कायदा केला असला तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. किमान शिक्षेची तरतूद नसणे, दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास अधिक शिक्षेची तरतूद नसणे, हा गुन्हा करणाऱ्या संघटीत गुन्हेगारांविरोधात कठोर शिक्षेची तरतूद नसणे अशा अनेक त्रुटी त्यामध्ये आहेत. म्हणून त्यात सुधारणा करण्याच्या हेतूने विधानसभेत ‘महाराष्ट्र स्पर्धा परिक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध विधेयक २०२५’ हे खासगी विधेयक मांडले. या महत्त्वाच्या विधेयकावर सखोल चर्चा होऊन पेपरफुटीविरोधी कायदा अधिक कठोर आणि परिपूर्ण होण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही या विधेयकाला पाठींबा द्यावा, असं माझं आवाहन आहे.
#पावसाळीअधिवेशन२०२५
#MonsoonSession2025
#खासगीविधेयक
#पेपरफुटी
#सरळसेवा_MPSC_मार्फत_घ्या#सरळसेवा_शुल्क_कमी_करा
प्रमुख मागण्या :
१. तीन महिन्यांच्या आत सर्व गट-क परीक्षा MPSC कडे वर्ग कराव्या.
२. TCS/IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांचे शुल्क प्रति अर्ज सरसकट ५०० रुपये करण्यात यावेत.
विलेपार्लेतील जैन मंदिरावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या 'त्या' इंजिनिअरला सन्मानाने परत आणा, बदली रद्द करण्याची मागणी https://t.co/Kr6FdPNMLg #Mumbai#JainTemple#BMC
पुण्यातील मंचरमध्ये वार्तांकन करताना एका पत्रकार महिलेवर भ्याड हल्ला झाला आहे. @SakalMediaNews ने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रात सामान्य महिला तर सोडाच आता पत्रकारही सुरक्षित नाहीत.
राज्यकर्ते म्हणतात ते बरोबर आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि महायुतीवाले महाराष्ट्राचा बिहार केल्याशिवाय राहणार नाही..
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#महाराष्ट्र #महिलासशक्तिकरण #महिला #WomenEmpowerment
घ्या, अंबानी मॅडमसुद्धा आता सुंदर, शुद्ध मराठीत बोलत आहेत मग आता कुठे आहेत ते टीका करणारे?
मराठी माणसाबद्दल दुजाभाव करणारे, मराठी-गुजराती किंवा मराठी विरुद्ध इतर भाषिकांत भांडण लावणारे त्यांनी तरी आता डोळे उघडावेत.
ज्यांना नेहमी मराठी भाषेवर टीका करायची सवय आहे, त्यांनी अंबानी मॅडमचं मराठी ऐकावं किती प्रेमाने आणि आदराने त्या बोलत आहेत.
पण दुर्दैवाने, काही मंडळी मुद्दाम ‘मराठी विरुद्ध हिंदी’ अशी खोटी कथा पसरवत आहेत, समाजात फूट पाडण्यासाठी आणि खऱ्या मुद्द्यांपासून लक्ष हटवण्यासाठी.
“जन्माने नाही, पण कर्माने मराठी” असणारे अनेकजण आज मराठी जपत आहेत, मराठीत बोलत आहेत, आणि ती अभिमानाने जगत आहेत.
मराठी भाषेचा सन्मान करा कारण अजूनही काही जण अपमानास्पद शब्द वापरून तिचा तिरस्कार करत आहेत.
त्यामुळेच जेव्हा काही घटना घडतात, तेव्हा त्या चुकीच्या पद्धतीने समाजमाध्यमांवर पसरवल्या जातात आणि दोष मात्र मराठी माणसालाच दिला जातो.
महाराष्ट्राने आजवर सगळ्यांना प्रेमाने स्वीकारलं आहे मग सर्वांनीही प्रेमाने वागावं आणि एकमेकांच्या भाषेला, संस्कृतीला आदर द्यावा.
#मराठी
#महाराष्ट्र
@ShelarAshish RMC पोर्टल ही काय नवीन भानगड आहे? बेरोजगार लोकांची आर्थिक लूट करण्याचे नवीन साधन तर नाही ना? सरकार ने सर्व सरळसेवा MPSC कडे देणार असल्याचे सांगितले आहे पहिलेच पुन्हा आता त्यात बदल नको. सर्व सरळसेवा भरती ही फक्त आणि फक्त MPSC द्वारे एकाच वेळी ऑफलाईन पद्धतीने झाली पाहिजे.
गुरूपौर्णिमे निमित्त उपमुख्य मंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले!
धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमे निमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले,
दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले!
त्यानंतर: मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली!
तूर्त इतकेच!
बाकीचा तपशील लवकरच!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AUThackeray
@
सरकारी नोकऱ्या खासगी दुकानात विक्रीस, भाजप सरकारचा काळा कारभार!”
#महाराष्ट्र_द्रोही “फडणवीस -शिंदे-पवार” सरकारने रोजगार हमी विभागाच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या खासगी एजन्सीकडे सुपूर्द करण्याची लाजिरवाणी निविदा काढली आहे.
हे तर उघड उघड सरकारी यंत्रणेचं खासगीकरण आहे. क्लार्क, ड्रायव्हर, शिपाई, अधिकारी… सर्व खाजगी हातात! पगार देतील खासगी एजन्सी, भरती, प्रशिक्षण, बदलीचा निर्णयही एजन्सीकडे!
यामुळे आरक्षण संपणार, भ्रष्टाचार वाढणार, कामगारांचे हक्क नाहीसे होणार, गोपनीयता धोक्यात येणार, जबाबदारी कुणाचीच नसेल! फडणवीसांनी गुपचूप हा घोटाळा कशासाठी सुरू केला?
लोकशाहीला खासगी ठेकेदारीत रूपांतरित करणारे हे भाजप सरकार दलालांचे सरकार आहे, जनतेचे नाही.
या निर्णयाच्या विरोधात आगामी काळात राज्यातील परीक्षार्थीना रस्त्यावर उतरून संघर्ष करावाच लागेल !
#खासगीकरण_बंद_करा #BJPFail #भाजपघोटाळा
#सरळसेवा_MPSC_मार्फत_घ्या #सरळसेवा_शुल्क_कमी_करा
@INCHarshsapkal@VarshaEGaikwad@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
भाजपचे दुटप्पी धोरण पहा !
एकीकडे हे मंत्री लोढा BMC मध्ये पालक म्हणून बसतात ती पालिका अनधिकृत जैन मंदिर तोडते. त्यानंतर लोढा मोर्चा काढून विरोध दर्शवितात. ज्या मराठी अधिकाऱ्याने कारवाई केली त्याची बदली करतात.
आता कोर्टाने कारवाई योग्य असे म्हटले. लोढा आता राजीनामा देणार का ?
साहेब तुम्ही एक वर्षापूर्वी आम्हाला विधिमंडळ मध्ये शब्द दिला होता सर्व परीक्षा ह्या 6 महिन्यात MPSC कडे देतो आता एक वर्ष होऊन गेले तरी तुम्ही तुमचा शब्द पाळत नाहीयेत. लवकरात लवकर सर्व परीक्षा ह्या MPSC कडे द्या आणि होतकरू आणि प्रामाणिक मुलांना न्याय द्या.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
#सरळसेवा_MPSC_मार्फत_घ्या
#सरळसेवा_शुल्क_कमी_करा
आदरणीय देवेंद्रजी,
महाराष्ट्र शासनाचे सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महामंडळे यांची नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे द्यावी.
@Dev_Fadnavis