IBPS RRB Clerk व MPSC मार्फत घेतली जाणारी समाजकल्याण विभागाची परीक्षा दिनांक १८ ऑगस्ट रोजी, तसेच MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा व IBPS Clerk परीक्षा दिनांक २५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी समाज कल्याण आणि राज्य सेवा परीक्षा या दोन परीक्षा आयबीपीएसकडून होणाऱ्या बँकिग/ क्लर्क परीक्षेच्या दिवशीच अनुक्रमे १८ आणि २५ ऑगस्टला होत आहेत. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने याचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. राज्यभरातून विद्यार्थी याबाबत मला संपर्क करत आहेत. आपल्या राज्यातील मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून या विषयाची गांभीर्याने दखल घेत मी राज्य लोकसेवा आयोगाकडून होणारी परीक्षा तातडीने पुढे ढकलावी अशी विनंती अध्यक्ष, @mpsc_office यांच्याकडे केली आहे.
मा.@mpsc_office@Drsuvarnas ma'am
🔶#MPSC exams & IBPS exam dates Overlapping issue
18th August
25th August
संदर्भात आपणास......
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष,
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते,
काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते
यासह
मा.मंत्री यशोमती ताई ठाकूर,
मा.सतेज पाटील,
मा.विश्वजीत कदम
खासदार मा.सुप्रियाताईं सुळे
मा.अमोल कोल्हे
तसेच
मा.बच्चूभाऊ कडू
मा.कैलास पाटील
यांच्यासाह वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी व राजकीय नेते यांनी या लाखो उमेदवारांतर्फे आपणास call द्वारे, tweet द्वारे,ई-मेल द्वारे विनंती केली आहे.
🔶 यासोबतच वेगवेगळ्या Print media व main stream media ने हा मुद्दा ठळकपणे आपल्या निदर्शनास आणून दिलेला आहे.
आपण मात्र स्वतः चुका करून उपाय काढण्याऐवजी मौन धारण केले आहे.
स्वतः ढिसाळ नियोजन करायचे व त्याचा बळी गोरगरीब उमेदवारांना करायचा.
इतके दिवस हा प्रकार मनमानी कारभार असा होता,परंतु आता याला "मुजोरी"
हा एकच शब्द पुरेसा आहे.
🔶 #MPSC ने एक लक्षात घ्यावे वरीलपैकी कोणालाही कधीच आपल्या कारभारात हस्तक्षेप करण्याची हौस ,गरज नव्हती व नसणार.
पण लाखो गोरगरीब उमेदवारांचे हित सर्वात जास्त महत्वाचे आहे हे विसरू नका,आपला मनमानी कारभार नाही....
आपण वारंवार चुका करत आहात,
त्या दुरुस्त करण्यात आपल्याला कमीपणा वाटतो का ??
🔶 समाजकल्याण परीक्षेची
वर्षभर परीक्षेची तारीख जाहीर न करणे हे आपल्याला शोभले का?
ते वेळेवर केले असते तर आज ही वेळ आली नसती
निवडणुका वर्ष असते त्यावर्षी फेब्रुवारी त परीक्षा घेतली जाते.
परंतु आपण एप्रिल मध्ये त्याचे नियोजन केले होते विसरलात काय?
मराठा आरक्षणसंदर्भात किरकोळ तांत्रिक बाबीची पूर्तता वेळेत न केल्यामुळे आपण चक्क तीन वेळेस परीक्षा postpone केली.
ते कोणत्या नियमात होते????
तेंव्हा पण वेळोवेळी आपल्या चुका निदर्शनास आणून दिल्याच होत्या ना.
पण आपण तेंव्हा देखील दुर्लक्ष केले व
दुष्परीणाम उमेदवारांना भोगावे लागले.
🔶 "लोकसेवा" याचा अर्थ आपणास कळतो ना?
तात्काळ notification काढून ह्या उमेदवारांना न्याय द्यावा.
IBPS exam नियोजित असताना आपण त्याच दिवशी MPSC परीक्षा तारीख जाहीर करतात,
यात उमेदवारांची चुक काय???
त्यांना दोन्ही परीक्षा देण्याचा अधिकार आहे,तो मिळालाच पाहिजे
@NANA_PATOLE@VijayWadettiwar@AdvYashomatiINC@satejp@ShindePraniti@vishwajeetkadam@supriya_sule@RealBacchuKadu@KailasPatilOffc@PawarSpeaks@mieknathshinde@atullondhe@RahulAsks@abpmajhatv@NDTVMarathi@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@kharge@RahulGandhi@chennithala@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews @News18lokmat @SakalMediaNews@LoksattaLive@lokmat@mataonline@ashish_jadhao@waglenikhil@_prashantkadam@aajtak@mumbaitak@pudharionline@LokshahiMarathi@kolhe_amol
#agree
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra लवकरात लवकर काय तो निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करावी ही आपणास नम्र विनंती आहे. अनेक उमेदवार मानसिक ताणाखाली आहेत. कृषी जागा वाढ करून सर्व सामान्य उमेदवारांना न्याय द्या.
@dhananjay_munde@AbhiPawarBJP@CMOMaharashtra
राज्यातील स्पर्धा परीक्षा बाबतीत प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा बघायला मिळाला आहे. २५ ऑगस्ट रोजी आधीच बॅकिंग सेवेसाठीची IBPS आणि UPSC ची प्रवेश परीक्षा अशा दोन मोठ्या परीक्षा एकाच दिवशी होत असताना MPSC ने राज्यसेवा परीक्षा देखील त्याच दिवशी ठेवली आहे. विशेष बाब इतर दोन परीक्षा वर्षातून एकदाच होतात.
असे असताना दुसरीकडे कर्नाटक सरकारने तिथे होणारी KPSC परीक्षा एक आठवडा पुढे ढकलली आहे. जेणेकरून कोणताही विद्यार्थी दुसऱ्या परीक्षेला मुकणार आणि त्यांची वर्षभराची मेहनत वाया जाणार नाही. महाराष्ट्र सरकारने देखील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या परीक्षा एकाच दिवशी होणार नाहीत याबाबत सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.
@CMOMaharashtra
IBPS RRB CLERK व MPSC समाज कल्याण परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट 2024 रोजी तसेच नागरी सेवा पूर्व परीक्षा (राज्यसेवा परीक्षा) 2024 व IBPS CLERK परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे.
दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्यामुळे दोन्ही फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार असून सोबतच एक परीक्षा न देता येण्याची खंत राहून मानसिक त्रास त्यांना होवू शकतो.
विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता MPSC ने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा आणि समाज कल्याण अधिकारी परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे.
IBPS RRB Clerk व MPSC मार्फत घेतली जाणारी समाजकल्याण विभागाची परीक्षा दिनांक १८ ऑगस्ट रोजी, तसेच MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा व IBPS Clerk परीक्षा दिनांक २५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी या सर्वच परीक्षांसाठी अर्ज केलेले आहेत. IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा लक्षात घेता इतर राज्यांतील राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तारखा निश्चित केल्या जातात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मात्र अशी कोणतीही काळजी घेतली जात नाही. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या परीक्षा आल्याने महराष्ट्रातील असंख्य तरुणांना हक्काची संधी नाकारण्याचं पाप होत आहे.
याची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षा व समाज कल्याण अधिकारी परीक्षांच्या तारखा बदलून महाराष्ट्रातील युवकांना न्याय द्यावा ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
येत्या १८ व २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी `एमपीएससी' व `आयबीपीएस'च्या परीक्षा होत आहेत. या परीक्षांना राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर २४ व २६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेचे केंद्र दूरच्या शहरात आल्यास २५ तारखेला परीक्षाकेंद्रावर पोचण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ उडणार आहे. `एमपीएससी'कडून यंदा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने पेपर देण्यासाठी शेवटची संधी आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने पावले उचलावीत.
#MPSC #IBPS
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २५ ऑगस्ट रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा ठेवली आहे. परंतु याच तारखेला बॅंकींग सेवेसाठीची आयबीपीएस आणि युपीएससीची प्रवेश परीक्षा एसआयएसी पण होणार आहेत. वरील परीक्षा वर्षांतून एकदाच होतात. त्यामुळे एमपीएससी राज्यसेवा देणाऱ्यांना या परीक्षांना मुकावे लागेल. तरी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की महाराष्ट्रामधील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता या तीनही परीक्षा एकाच दिवशी होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावे.
@CMOMaharashtra
@NANA_PATOLE प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टींसाठी आम्ही झगडत राहायचे आहे का ? जाहिरात येण्यापासून ते नियुक्तीसाठी सर्व स्तरावर फक्त आमची फरफट होते. ही कधी थांबणार ? कृपया आता तरी आमचा विचार सरकारने करावा आणि आमच्या रास्त मागण्या मान्य करून दिलासा द्यावा.
@NANA_PATOLE पोरांच्या आयुष्याशी खेळण्याच काम सरकार करत आहे....
दोन परीक्षा एकाच दिवशी घेऊन
कृषी जागा मंजूर असूनही आयोगाकडे वेळेत नाही पाठवणे...
म्हणजे व्यवस्था ह्या कल्याणकारी आणि अजून काही....?