@pemetansk Sir please can you share this whole document or link to get this complete pdf so we can attach it as reference while submitting our application to our dept
@Dev_Fadnavis Sir,
MAHATRANSCO चा भोंगळ कारभार तब्बल एका वर्षानंतर Form Filled आणि काही पोस्टच्या CBT Exam झाल्या नंतर Total Recruitment Cancel करण्यात आली आहे
महाराष्ट्रातील दोन ते अडीच लाख Electrical engg,ITI आणि poly च्या विद्यार्थ्यांना मध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे
#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३) परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करणे, GATE परीक्षेची अट रद्द करणे या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या असून विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार उर्जा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता वरिष्ठांकडे पाठपुरावा करून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच विद्यार्थ्यांना अपेक्षित असा सकारात्मक निर्णय होईल हा विश्वास आहे.
#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३)परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाला महाराष्ट्राचा रहिवासी दाखला सक्तीचा नसल्याने इतर राज्यातील तरुणही यासाठी अर्ज करतील परिणामी राज्यातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होऊ शकतो. त्यामुळे सदर परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करावा.
तसेच या परीक्षेसाठी GATE परीक्षेच्या १०% गुणांची अट टाकल्याने GATE परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. वास्तविक GATE परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार फारच कमी असतात, तसेच भरमसाठ परीक्षा शुल्क असल्याने बहुतांश उमेदवार GATE देणंही टाळतात. त्यामुळे महापारेषण, महानिर्मितीसाठी ज्याप्रमाणे GATE परीक्षेची कुठलीही अट नाही त्याप्रमाणे महावितरणनेही GATE परीक्षेची अट शिथिल करण्यासंदर्भात विचार करावा ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis