◆बऱ्याच वर्षापासून महावितरण चा अभ्यास करत असणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत-
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@MSEDCL
https://t.co/MxLnkab4sZ
लक्षद्वीप सिर्फ द्वीपों का एक समूह नहीं है; यह परंपराओं की एक कालातीत विरासत है और इन लोगों की भावना का एक प्रमाण है।
मेरी यात्रा से उम्मीद है कि भारत के लोग मालद्वीप की जगह लक्षद्वीप को प्राथमिकता देंगे ll
https://t.co/89GOmWlsqq
संदर्भ : आप महाराष्ट्र / ०५०१२०२४/००१.
प्रति,
मा. लोकेश चंद्र जी,
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
महाराष्ट्र राज्य
विषय : महावितरण मधील नोकरभरती जाहिरातीतील त्रुटी व विद्यार्थ्यांच्या मागण्या.
संदर्भ : महावितरण जाहिरात क्र. ७/२०२३ (AE) आणि जाहिरात क्र. ८/२०२३(JE)
महोदय,
आपल्या खात्यातील महावितरण कंपन्यांमध्ये कनिष्ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी वरील जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुका आढळून आल्या आहेत. या संबंधांत शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या खात्याशी पत्रव्यवहार देखील केला आहे.
कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे.
अनेक दिवसांनी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील वरील चुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृपया यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
तसेच या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्हाला सोमवार दिनांक ८ जानेवारी किंवा मंगळवार दिनांक ९ जानेवारी, २०२४ रोजी वेळ द्यावी हि विनंती.
धन्यवाद,
#Increase_AE_JE_Vacancy #No_GATE_For_MAHADISCOM
#CancelGATEforAE
#MH_Domecile_Compulsory
@mieknathshinde@Dev_Fadanvis@MSEDCL@CMDMSEDCL@SandeepPathak04@AjitPawarspeaks@maha_governor
महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी ३१/१२/२०२३ रोजी जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुका आढळून आल्या आहेत. त्यामुळे युवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Mahatransco, Mahagenco कंपन्या सहाय्यक अभियंता पदासाठी IBPS द्वारे परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया राबवते. परंतु Mahadiscom कंपनीतील सहाय्यक अभियंता पदासाठी कोणतीही पूर्व सूचना न देता GATE exam चे मार्क्स ग्राह्य धरून भरती करण्यात येणार आहे. GATE ची अनिवार्यता ही गंभीर असून, यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांना डावलले जाण्याची शक्यता जास्त आहे. हा मराठी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय आहे. त्यामुळे Mahadiscom ने सुद्धा GATE ची सक्ती रद्द करून IBPS द्वारे परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे.
तसेच कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा महावितरणच्या परीक्षेसाठी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र सक्तीचे असताना महावितरणच्या जाहिरातीमध्ये त्याचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र Domicile सर्टिफिकेट सक्तीचे करणेही गरजेचे आहे.
Mahatransco, Mahagenco, Mahadiscom या तिन्ही कंपन्यांची सूत्रधार कंपनी एकच असताना जाहिरातबाज सरकारने भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात चुका करून सावळा गोंधळ घातला आहे.
राज्य सरकारला माझी विनंती आहे की, या जाहिरातीमध्ये लक्ष घालून तांत्रिक चुका दूर कराव्यात व युवकांना न्याय द्यावा..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray@OmRajenimbalkr@MSEDCL@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
#Mahadiscom_AE_JE_Vacancy
#Increase_Vacancy_2023
#No_GATE_For_MAHADISCOM
#Maharashtra_Domecile_Compulsory
विषय :-१) महावितरण मधील जाहिरात क्र.७/२०२३(AE)आणि जाहिरात क्र.८/२०२३(JE) जागा वाढ करणे बाबत
२)महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ मधील AE संवर्गाची GATE सक्ती रद्द करून IBPS द्वारे परीक्षा घेऊन निवड करणे बाबत.
@AjitPawar@Dev_Fadnavis@mieknathshinde@Devendra_Office