@rohang912@AskarShyam@CMOMaharashtra@girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती.
भोंदू बाबासाठी लाखो लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यासाठी तात्काळ बैठक, नवीन GR आणि यासाठी वेळ मिळतो, परंतु गेल्या ३–४ वर्षांपासून जलसंपदा विभागात आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम आणि कनिष्ठ अभियंता भरती जाहिरात प्रलंबित आहेत ,यासाठी वेळ का मिळत नाही?
@girishdmahajan@RVikhePatil
@RVikhePatil महाराष्ट्रातल्या तमाम अभियंता वर्गातील विद्यार्थ्यांना आस लागली आहे 2023 ला मान्यता मिळालेल्या जलसंपदा पदाच्या जाहिरातीची.... आपणास विनंती आहे सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. 🙏
@cm maharashtra
@Dev_Fadnavis@deven
@RVikhePatil जलसंपदा विभाग भर्ती (यांत्रिकी/ स्थापत्य/ विद्युत) schedule द्यावे. आपणास शक्य असल्यास भर्ती लवकरात लवकर करावी 2023 पासुन सर्व वाट बघताय, कृपया आपण यात स्पष्टता द्यावि.
'जलसंपदा'च्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा...
📍मंत्रालय, मुंबई
आज मंत्रालयात मित्रा संस्थेचे मा. प्रविणसिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
विश्वनेते पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली राज्याला जलसंपन्न करतानाच महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. बैठकीस कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. धुमाळ तसेच गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. संतोष तिरमनवार यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत MRDP अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच त्या संदर्भातील उपाययोजनांवर सखोल विचारविनिमय झाला. यामध्ये कृष्णा (K8) ते भीमा (K4) नदीजोड प्रकल्पाचा आढावा घेऊन या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.
तसेच Low Hanging Fruit या संकल्पनेअंतर्गत राबविता येणाऱ्या Hybrid Infrastructure Model बाबत माहिती देण्यात आली. याशिवाय Floating Solar Policy संदर्भातील आवश्यक बाबी, संभाव्य अंमलबजावणीची दिशा आणि त्यातून होणारे फायदे याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीदरम्यान उपस्थित सदस्यांनी संबंधित विषयांवर आपले मत व सूचना मांडत पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक दिशा निश्चित करण्यात आली. राज्याच्या जलव्यवस्थापनाला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.
#JalSampada #MaharashtraDevelopment #WaterManagement
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
ऑक्टोबर 2023 मध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती करायला वित्त विभाग परवानगी दिली होती. आज 3 वर्ष उलटून गेले तरी जलसंपदा विभाग सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे या कारणाखाली 3 वर्ष चालढकल करत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis
🔶मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis साहेब
आपण 9 फेब्रुवारीला Recruitment reforms संदर्भात आढावा बैठक घेतली याचे आम्ही स्वागत करतो.
ज्यात आपण सेवा प्रवेश नियम, आकृतीबंध इ.संदर्भात निर्देश दिले.
🔶 मुख्यमंत्री महोदय
मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो
की #WRD चे सेवा प्रवेश नियम
( कनिष्ठ अभियंता विद्युत/स्थापत्य/यांत्रिकी ) ची कार्यवाही गेल्या एक वर्षापासून का सुरु आहे याची विचारणा
मंत्री महोदय
@RVikhePatil@girishdmahajan यांना करून
हे recruitment rules तयार असून देखील का publish केले जात नाहीत ?
याची सखोल माहिती तात्काळ घ्यावी
व पुढील योग्य ती कार्यवाही करावी
ही विनंती समस्त अभियांत्रिकी
उमेदवारांकडून मी आपणास करत आहे.
👉 सेवा प्रवेश नियमाचा प्रवास
मंत्रालय ते मा. @maha_governor असा किती काळ सुरु राहणार आहे ??
महामहीम @maha_governor महोदय....
recruitment rules तयार करण्यासाठी इतका प्रदीर्घ कालावधी लागणे हे सरकारचे व प्रशासनाच्या अधोगतीचेच लक्षण नाही काय ?????
महोदय आपण हा मुद्दा गंभीरतेने घ्यावा ही नम्र विनंती करतो
🙏🙏
🔶 @SanjayDRathods साहेब आपण संबंधिताना #WCD चा आकृतीबंध तात्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश देऊनही काही महिने लोटले आहेत.
बरोबर ना.....???
मृद जलसंधारण अधिकारी वर्ग आपल्या निर्देशाचे पालन करत नाहीत काय ??
कोण आहेत हे झारीतले शुक्राचार्य ???
👉 @SanjayDRathods साहेब
आपण मृद जलसंधारण पदभरतीची
जाहीरपणे तब्बल 9 वेळा घोषणा केली
आहे.
बरोबर ना.....???
किमान आतातरी यात तात्काळ कार्यवाही करावी ही नम्र विनंती.
🔶 @Dev_Fadnavis साहेब
वरील दोन्ही #WRD, #WCD
संदर्भातील मुद्द्यांची गंभीरतेने तात्काळ दखल घ्यावी ही बेरोजगार लाखो अभियांत्रिकी उमेदवारांच्या वतीने नम्रपणे विनंती करतो
🙏🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@MahaDGIPR@NANA_PATOLE@INCHarshsapkal
नाशिक महानगरपालिकेतील AE/JE/CEA पदांच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेदरम्यान अनेक उमेदवारांना फॉर्म भरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. तरी उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी अर्ज सादरीकरणाची अंतिम तारीख किमान १५ दिवस वाढवावी.
@mieknathshinde@NashikCorp@CMOMaharashtra
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-२८८, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)-३१ आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक-९६ पदे भरण्यात यावी ही विनंती.
@jaljeevan_maha@GulabraoRPatil@MeghnaBordikar