@Dhananjay4INC@mpsc_office
तांत्रिक संवर्ग समाविष्ट झाले खरे पण याबाबत तत्परतेने काम होतांना दिसत नाही.
गेल्या वर्षभरात गट ब , गट क जाहिरात प्रसिद्ध झाली , मात्र यात नव्याने समाविष्ट झालेले तांत्रिक पदांचा समावेश नाहि, का ?
तांत्रिक संवर्गातील विद्यार्थ्यांनी फक्त प्रतिक्षेत राहायच ??
#JE#CEA
राज्यातील WRD, WCD, PWD आणि नगरपरिषद (NP) मधील रिक्त पदांसाठी तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवावे आणि भरती प्रक्रिया विलंब न करता सुरू करावी.
तसेच WCD मधील अभियांत्रिकी संवर्गासाठीचा कोटा ६०% पर्यंत वाढवून अभियंता विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. वर्षानुवर्षे भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो अभियंता उमेदवारांच्या भविष्याशी खेळ थांबवावा.
रिक्त पदे भरून रोजगार द्या, अभियंत्यांवर अन्याय थांबवा!
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis
#Rojgar #WCD #WRD
#DhananjayShinde
#Dhananjay_Shinde
PMC भरती परीक्षेतील गैरव्यवहाराची SIT मार्फत सखोल चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करावी आणि पुणे महानगरपालिकेने पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह पुनर्परीक्षा तातडीने घ्यावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही. पारदर्शक भरती हा विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे, उपकार नाही!
@INCHarshsapkal@PMCPune@Dev_Fadnavis@degree_holders@CongressRojgar
#PMC #Congress #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
आज ड्रग इन्स्पेक्टर पेपर संदर्भात काही महत्त्वपूर्ण साक्षी पोलीस यंत्रणांकडे नोंदवल्या जाणार असून राज्यभरातील विद्यार्थ्यांचे त्याकडे लक्ष आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणी पारदर्शक तपास महत्त्वाचा आहे. चार दिवसांपूर्वी आयोगाची भेट घेतली असता विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी लिंक जाहीर करण्याचा त्यांनी शब्द दिला होता, अद्यापही लिंक उपलब्ध केलेली नाही, या दिरंगाईचे कारण काय?
आज अत्यंत महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांकडे येणार आहेत, त्यामुळे आयोगाने आता तरी दिरंगाई न करता आजच्या आज FIR नोंद करून घ्यावा! प्रकरणाचे गांभीर्य पोलिसांनीदेखील विसरू नये!
#DrugInspectorExam #पेपरफुटी #MPSC #StudentsJustice #स्पर्धापरीक्षा #PaperLeak
🚩 रोजगार न्याय यात्रा 🚩
ऑगस्ट क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन : ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६
महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या रोजगाराच्या हक्कासाठी, त्यांच्या स्वप्नांना आणि संघर्षाला आवाज देण्यासाठी “रोजगार न्याय यात्रा” आयोजित करण्यात येत आहे. या ऐतिहासिक यात्रेच्या पूर्वतयारीसाठी मी स्वतः रोजगार न्याय यात्रेच्या नियोजन व व्यवस्थापन करणाऱ्या कोअर टीमसोबत शनिवार दिनांक १ ऑगस्ट व रविवार दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उपस्थित राहणार आहे.
या काळात पुणे शहर आणि परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, अभ्यासिका चालक, विद्यार्थी संघटना, युवक संघटना तसेच रोजगाराच्या प्रश्नावर काम करणाऱ्या विविध घटकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहे.
पुणे हे महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षा चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. येथे लाखो तरुण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. मात्र आज त्यांच्या समोर अनेक गंभीर आव्हाने उभी आहेत :
🔹 लाखो शासकीय पदांची भरती रखडलेली आहे.
🔹 भरती प्रक्रियेतील विलंब, अनिश्चितता आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.
🔹 पेपरफुटी आणि परीक्षा गैरप्रकारांमुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
🔹 रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे महाराष्ट्रातील तरुणांमध्ये वाढती निराशा दिसून येत आहे.
रोजगार न्याय यात्रा ही केवळ एक राजकीय कार्यक्रम नसून महाराष्ट्रातील तरुणांच्या स्वप्नांसाठीचा, त्यांच्या हक्कांसाठीचा आणि न्याय्य रोजगार व्यवस्थेसाठीचा जनसंवादाचा प्रवास आहे.
या यात्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न, अडचणी, सूचना आणि अपेक्षा थेट जाणून घेऊन त्या प्रभावीपणे शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व विद्यार्थी मित्र, शिक्षक, युवक कार्यकर्ते, अभ्यासिका चालक आणि सामाजिक संस्थांना मनापासून आवाहन आहे: चला, या संवादाचा भाग बना. आपल्या अनुभवांनी, सूचनांनी आणि सहभागाने रोजगार न्याय यात्रेला दिशा द्या.
विद्यार्थी मित्रांना विशेष आवाहन :
आपल्या परीक्षा, भरती प्रक्रिया, रोजगाराच्या संधी, पेपरफुटी, पारदर्शकता किंवा इतर कोणत्याही प्रश्नांबाबत आपले मत, सूचना आणि अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवा.
📩 कृपया खालील क्रमांकावर WhatsApp संदेश पाठवा :
📱 धनंजय शिंदे : ९८६७६ ९३५८८
📱 प्रसाद : ९५०३४ ७२२६३
आपला प्रत्येक प्रश्न, अनुभव आणि सूचना रोजगार न्याय यात्रेच्या माध्यमातून प्रभावीपणे पुढे मांडण्याचा प्रयत्न केला जाईल.
✊ रोजगारासाठी संघर्ष
✊ पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी संघर्ष
✊ महाराष्ट्राच्या तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष
@INCHarshsapkal@mpsc_office@degree_holders@Mpsc_Andolan@VastavKatta@FutureMpsc12@PunyachiMPSC@MPSCstudsRight
🚩 रोजगार न्याय यात्रा 🚩
आज वित्त व लेखा सेवेतील भरती प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थी प्रतिनिधींसमवेत व्हीसीद्वारे आढावा बैठक घेतली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध मागण्या, सूचना आणि भूमिका यावेळी समजून घेतल्या.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचा सखोल, वस्तुनिष्ठ आणि सर्वंकष अभ्यास करून कारणमीमांसेसह सुधारित अहवाल सादर करण्याचे संबंधित समितीला निर्देश दिले. निर्णय प्रक्रियेत गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देतानाच कोणत्याही विद्यार्थी घटकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यासही सांगितले.
सर्व संबंधित घटकांच्या सूचना, मते आणि वस्तुनिष्ठ बाबींचा संतुलित विचार करून पारदर्शक, न्याय्य आणि व्यापक हिताचा निर्णय घेणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी वित्त व लेखा सेवेतील काही पदांमध्ये वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणते व्यवहार्य पर्याय अवलंबता येतील, याचा सविस्तर अभ्यास करून अभिप्राय सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.
विद्यार्थ्यांचे हित, गुणवत्तापूर्ण प्रशासन आणि पारदर्शक निर्णयप्रक्रिया यांचा समतोल साधत सर्व संबंधितांना न्याय मिळेल, यासाठी शासन कटिबद्ध असून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सूचनेचा योग्य सन्मान राखत पुढील निर्णय प्रक्रिया राबविणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
@Dev_Fadnavis आदरणीय @CMOMaharashtra ,
म्हाडा (MHADA) मधील रिक्त पदांमुळे हजारो अभियंते नवीन भरती जाहिरातीची प्रतीक्षा करत आहेत. कृपया म्हाडाची नवीन भरती जाहिरात (JE, AE व इतर पदे) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती. @shambhurajdesai@mieknathshinde
@Dhananjay4INC आमचे पण तीच मागणी आहे.. यासाठी समिती कोणती होती त्याचा अहवाल..
अभियांत्रिकी संघटना यांना विचारात घेतले का?
40 टक्के एवढा जास्त कोटा का?
असे प्रश्न आहे ? आणि अधिकारी यांनी पण स्पष्टता द्यावी.
@SanjayDRathods
@Dhananjay4INC आमचे पण तीच मागणी आहे.. यासाठी समिती कोणती होती त्याचा अहवाल..
अभियांत्रिकी संघटना यांना विचारात घेतले का?
40 टक्के एवढा जास्त कोटा का?
असे प्रश्न आहे ? आणि अधिकारी यांनी पण स्पष्टता द्यावी.
@SanjayDRathods
औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यासंदर्भात MPSC चे सचिव यांची स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसोबत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि या पेपरफुटीच्या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष तसेच फॉरेन्सिक तपासणी कालबद्ध मर्यादेत करण्याची आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत या भरती प्रक्रियेतील नियुक्त्यांना स्थगिती देण्याची मागणी केली.
यासंदर्भात पोलिसांच्या माध्यमातून चौकशी करण्याचं, तसंच विद्यार्थ्यांना त्यांची तक्रार नोंदविण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. अपेक्षा आहे की, दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ही चौकशी होईल, जेणेकरून कोणत्याही प्रामाणिक विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. पारदर्शक चौकशी वेळेत न केल्यास मात्र विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही.
@mpsc_office
#औषध_निरीक्षक #MPSC #पेपरफुटी
मृद व जलसंधारण विभागातील ४०% कृषी अभियांत्रिकी कोट्याबाबत सरकारने पारदर्शकता ठेवावी.
मृद व जलसंधारण विभागाने कृषी अभियांत्रिकी उमेदवारांसाठी ४०% कोटा निश्चित करण्यामागील कायदेशीर, तांत्रिक आणि सांख्यिकीय आधार तात्काळ सार्वजनिक करावा.
हा निर्णय कोणत्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार घेण्यात आला? कोणता अभ्यास करण्यात आला? संबंधित विभाग, तज्ज्ञ, अभियांत्रिकी संघटना आणि सर्व संबंधित शाखांशी सल्लामसलत करण्यात आली होती का? हा प्रश्न कृषी अभियांत्रिकी विरुद्ध स्थापत्य अभियांत्रिकी असा अजिबात नाही. कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनाही समान न्याय आणि संधी मिळायलाच हव्यात. मात्र, कोणत्याही शाखेला कोटा देताना तो वैज्ञानिक अभ्यास, वस्तुनिष्ठ आकडेवारी आणि विभागाच्या प्रत्यक्ष गरजांवर आधारित असणे आवश्यक आहे.
सरकारने तात्काळ सार्वजनिक करावे:
✔️ ४०% कोट्याचा अभ्यास अहवाल.
✔️ तज्ज्ञ समितीच्या शिफारशी (असल्यास).
✔️ निर्णयामागील सांख्यिकीय व प्रशासकीय कारणमीमांसा.
✔️ विभागाच्या मनुष्यबळ गरजांचे विश्लेषण.
जर हा निर्णय पुरेशा अभ्यासाशिवाय किंवा व्यापक सल्लामसलत न करता झाला असेल, तर सर्व संबंधित भागधारकांशी चर्चा करून त्याचा फेरआढावा घेण्यात यावा.
हा प्रश्न मेरिट, समान संधी, पारदर्शकता आणि लाखो तरुणांच्या रोजगाराचा आहे. कोणत्याही शाखेवर अन्याय न करता सर्वांना न्याय मिळेल, अशी धोरणे सरकारने स्वीकारली पाहिजेत. मा. जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड आणि राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांनी या विषयात हस्तक्षेप करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी.
काँग्रेसच्या पुणे–मुंबई रोजगार यात्रेदरम्यान आम्ही न्याय्य, पारदर्शक आणि गुणवत्ताधिष्ठित भरती प्रक्रियेची मागणी राज्यभर मांडणार आहोत.
रोजगारात पारदर्शकता हवी, न्याय्य संधी हवी!
✊🇮🇳
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@SanjayDRathods@naikindranil@RVikhePatil@girishdmahajan@degree_holders@Mpsc_Andolan
@RRPSpeaks महत्त्वाची बातमी!!
तक्रारदाराचे आरोप बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यास, मा. सचिवांनी सांगितल्याप्रमाणे आयोगाची प्रतिमा मलीन केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाणार आहे का ?
आयोगाने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी.
@mpsc_office@bhimanwar@LoksattaLive
औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीसंदर्भात बनावट तक्रार असल्याचे जे पत्र आयोगातील ‘सूत्राच्या’ हवाल्याने सध्या व्हायरल केलं जात आहे, ते आयोगाच्या ‘सुत्रांनी’ व्यवस्थित वाचलेलं दिसत नाही किंवा ज्यांनी लिहून घेतलं त्यांचा अभ्यास फारच कच्चा दिसतो….
१) “आयोगाचा पेपर असल्याचे चेष्टेने म्हटलं’’, याचा अर्थ स्क्रीनशॉट खरे आहेत. आयोगाकडे / FDA कडे चेष्टेत कुणी तक्रार करतं का?
२) “तपास केल्यानंतर पेपर #MPSC चा नसल्याचे निदर्शनास आले,’’ चेष्टेत सांगितले होते तर तपास का केला?
३)‘‘ती प्रश्नपत्रिका इतर टेस्ट सिरीजची होती,”याचा अर्थ व्हॉट्सअप प्रश्नपत्रिका आली होती आणि टेस्ट सिरीजचे ९० प्रश्न जसेच्या तसे आले असतील तर आता ही टेस्ट सिरीज कोणती?
४) “२२ मार्च २०२६ रोजी परीक्षा झाल्यानंतर सदर प्रश्न टाइप करून २० मार्च २०२६ रोजी पाठवले होते’’, याचा अर्थ काय?
५) आधीचे नाव / सही आणि आताच्या पत्रातील नाव / सही वेगळी कशी?
दबाव टाकून धमकावून विद्यार्थ्यांकडून लिहून घेतलं पण सत्य हे कधीच झाकत नाही आणि ते झाकण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याच्याकडून अनेक चुका होऊन तो आणखी उघडा पडतो, असंच काहीसं औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला नसल्याच्या खुलाशाबाबत झालं आहे...तरुणाई हुशार आहे, कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, सत्य तर समोर आणूच..!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#औषध_निरीक्षक_पेपरफुटी #MPSC #PaperLeak #StudentsDemandJustice #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या
भाजपा सरकारमध्ये पेपरफुटीची मालिका कधी थांबणार?
आता MPSC औषध निरीक्षक भरतीचाही पेपरफुटीची घटना समोर आला आहे. 22 मार्चला परीक्षेपूर्वी प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सॲपवर व्हायरल झाले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये संशयास्पद वाढ झाली असून, दोन उमेदवारांनी पुराव्यांसह महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
भाजपा सरकारच्या काळात सतत संशयास्पद परीक्षा आणि पेपरफुटीच्या घटना समोर येत आहेत. देशात NEET पेपरफुटी झाली, महाराष्ट्रात TET पेपरफुटी झाली, राजस्थानातील जयपूर येथे पॅरामेडिकल परीक्षेत घोटाळा झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली. उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटीची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली. आता MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भाजपा सरकार विद्यार्थ्यांप्रती, शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रक्रियेच्या निष्पक्षतेबाबत किती गंभीर आहे, हे वारंवार समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमधून दिसून येते.
वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की, MPSC औषध निरीक्षक भरती पेपरफुटी संदर्भात दोन उमेदवारांनी दाखल केलेल्या तक्रारीची आणि त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांची तत्काळ, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी. भाजपा महायुती सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये.
भाजपा महायुती सरकारने विद्यार्थ्यांना आणि जनतेला पेपरफुटी थांबणार की नाही? याचे उत्तर द्यावे.
@CMOMaharashtra
#Exam #Students #MPSC
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता पेपर फुटी बाबतचा मुद्दा @andharesushama यांनी Press conference मध्ये मांडून पेपर फुटी बाबत पाठपुरावा करणाऱ्या उमेदवारांना आणखी बळ दिले. पुणे मनपा प्रशासनाने याबाबत आता तरी गांभीर्याने विचार करून पदभरती प्रक्रिया सदोष पद्धतीने राबवावी ही नम्र विनंती.