'#महाराष्ट्र_स्थापत्य_अभियांत्रिकी_सेवा_परीक्षा_२०२० चा अंतिम निकाल लागून एका वर्षाहून अधिकचा कालावधी उलटला तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीपासून आझाद मैदानावर #उपोषण सुरु केलंय ,परंतु शासनाने अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही.
काही तांत्रिक अडचणी असतील तर तज्ञांशी बोलून मार्ग काढता येईल. गेल्या महिन्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट-ब चे विद्यार्थी सिंचन भवन, पुणे येथे आंदोलनाला बसले असताना त्यांची बाजू शासनाकडे मांडून अधिकारी व विद्यार्थ्यांची चर्चा घडवून आणली होती, आज तो विषय अंतिम टप्प्यात आहे.
आझाद मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांशी शासनाने चर्चा करायला हवी, परंतु शासन चर्चाच करणार नसेल तर प्रश्न सुटतील कसे? आपलं घरदार सोडून हे विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. त्यात विद्यार्थिनीही आहेत. शासनाने थोडी तरी संवेदनशीलता दाखवावी. युवावर्गाला अशा प्रकारे गृहीत धरणं योग्य नाही. शासनाने त्वरित दखल घ्यावी, ही कळकळीची विनंती!
@RRPSpeaks@rohitrrpatilncp https://t.co/pL8pvg6I8c
एमपीएससी अभियांत्रिकी परीक्षा २०२० चा निकाल लागून दीड वर्ष झाल्यावरही नियुक्ती मिळत नसल्याने १९६ बेरोजगार अभियंता यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. आपण आझाद मैदानावर येऊन भेट दिल्यास सर्वांचे मनोबल वाढेल.
#उपोषण#आझाद_मैदान#०२_ऑक्टोबर_पासून
https://t.co/pVPHmcsTZl
196 अधिकाऱ्यांवर अशीच वेळ आली आहे...
कोणी भाजी विकत आहे,कोणी शेतात काम करत आहे,हाताला लागेल ते काम करत आहेत अधिकारी. 10% EWS मुळे 90% (ST , SC, OBC ,VJNT & SBC) या सर्व मुलांची नियुक्ती सरकारने अजून पर्यंत दिलेली नाही आहे हे कितपत योग्य आहे
एमपीएससी अभियांत्रिकी सेवा २०२० उत्तीर्ण उमेदवार ३ वर्षापासून नियुक्तीची वाट बघत आहेत. समकालीन सर्व परीक्षेतील उमेदवारांना नियुक्त्या मिळत असताना स्थापत्य अभियंता च्या नियुक्त्या रखडल्या आहेत.मायबाप सरकारने १ मे रोजी आम्हाला ही नियुक्त्या द्याव्यात#MES2020 #उपोषण#MES2020Joining
#mpsc घरातील बेताची परिस्थिती सांभाळत गावातून पुण्यात येऊन अभ्यास करून नोकरीसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना नियुक्तीसाठी सुद्धा भांडावे लागते आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया.
@rautvin